असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य गुरुवार, २७ नोव्हेंबर २०२५

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य गुरुवार, २७ नोव्हेंबर २०२५
  • Positive News
  • नोव्हेंबर 27 2025

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य गुरुवार, २७ नोव्हेंबर २०२५

 धनिष्ठा नक्षत्र. चंद्र मकर आणि कुंभ राशीत चंद्र केंद्र बुध–शुक्र
 चंद्र केंद्र हर्षल योग
आज शुभ दिवस आहे. 
ध्रुव योग.
 मेष (Aries)

आजचा दिवस प्रेरणेने भरलेला. कामात नवे बदल करण्याची इच्छा वाढेल. चंद्र–हर्षल योगामुळे अचानक मिळालेल्या संधी आर्थिक लाभ देऊ शकतात. मित्रांकडून विशेष मदत मिळेल.

 वृषभ (Taurus)

कामाच्या ठिकाणी संयम आवश्यक. वरिष्ठांकडून अचानक काही अपेक्षा वाढतील. चंद्र–शुक्र केंद्र योगामुळे प्रेमसंबंधात उबदारपणा येईल. खर्च थोडा वाढणार.

 मिथुन (Gemini)

धनिष्ठा नक्षत्राचा प्रभाव प्रवास, शिक्षण आणि नवे करार यासाठी लाभदायक. चंद्र–बुध केंद्र योगामुळे निर्णयशक्ती उत्तम. कायदेशीर कामात गती येईल.

 कर्क (Cancer)

आर्थिक बाबतीत सुधारणा. चंद्र–हर्षलच्या योगामुळे अचानक पैसा येण्याची शक्यता. मानसिक स्थैर्य हवे; कोणीतरी भावनिक पातळीवर त्रास देऊ शकते.

 सिंह (Leo)

संबंधांमध्ये स्पष्टता आवश्यक. जोडीदाराशी छोट्या गोष्टीतून मतभेद. व्यावसायिक क्षेत्रात मात्र प्रगती. नवे क्लायंट मिळण्याची शक्यता.

 कन्या (Virgo)

आरोग्याची विशेष काळजी घ्या. पचनासंबंधी त्रास वाढू शकतो. चंद्र–बुध केंद्र योगामुळे कामे अचूक पद्धतीने पूर्ण होतील. ऑफिसमध्ये तुमचे कौतुक होईल.

 तुळ (Libra)

मनोरंजन, क्रिएटिव्ह काम, आणि मुलांच्या बाबतीत आनंद देणारा दिवस. चंद्र–शुक्र केंद्र योग प्रेमभावना वाढवेल. आर्थिक बाजूही स्थिर.

 वृश्चिक (Scorpio)

घरगुती वातावरणात बदल किंवा दुरुस्तीचे काम. भावंडांशी संवाद वाढेल. चंद्र–हर्षल योगामुळे वैयक्तिक आयुष्यात अचानक घटना घडू शकतात. बहुतेक सकारात्मक!

 धनु (Sagittarius)

लहान प्रवास, मिटिंग्स, चर्चासत्रे यासाठी उत्तम दिवस. चंद्र–बुध योगाने संवाद प्रभावी. नवीन संपर्कांमुळे कामात गती येईल.

 मकर (Capricorn)

धनिष्ठा नक्षत्राचा तुमच्यावर विशेष प्रभाव. आर्थिक लाभ, स्थिरता आणि नवे उत्पन्नस्रोत सुरू होण्याची शक्यता. कुटुंबात आनंददायी घटना.

 कुंभ (Aquarius)

चंद्र दुपार नंतर तुमच्या राशीत. आत्मविश्वास वाढेल. चंद्र–शुक्र केंद्र योग व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक करेल. चंद्र–हर्षल योगामुळे अचानक मोठी संधी मिळू शकते.

 मीन (Pisces)

मनावर जुने विचार, आठवणींचा प्रभाव. ध्यान किंवा अध्यात्माकडे ओढ वाढेल. कामाची गती कमी होऊ शकते. आरोग्य जपा. गुंतवणुकीत सावधानता आवश्यक.

-ज्योतिषाचार्य मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

संबंधित बातम्या