*शुभ कालावधी*
सकाळी ८.२३ ते सकाळी ९.२७ - सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे, मुलाखत, सरकारी नोकरी.
सकाळी ९.२७ ते सकाळी १०.३० - शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी, नृत्य, करमणूक.
सकाळी १०.३० ते सकाळी ११.३३ - बुध - व्यापार, गणित, वाचन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिषी, मार्केटिंग, भाषण, दळणवळण,
सकाळी ११.३३ ते दुपारी १२.३६ - चंद्र - चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, प्रेम, द्रव पदार्थ, श्री. महादेव उपासना, प्राणायाम, छंद, मानसिक शांतता.
दुपारी १२.३६ ते दुपारी १.३९ - शनी - लोखंड खरेदी, तेल, नोकर चाकर, कष्ट, मेहनत, त्याग.
दुपारी १.३९ ते दुपारी २.४२ - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म.
दुपारी २.४२ ते दुपारी ३.४५ - मंगल - जमीन व्यवहार, शेती, क्रीडा, कोर्ट, वादविवाद, स्पर्धा, तंत्रज्ञान.
दुपारी ३.४५ ते दुपारी ४.४८ - सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे.
दुपारी ४.४८ ते संध्याकाळी ५.५१ - शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी, नृत्य, करमणूक.
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.
ऑगस्ट २०२६ महिन्यातील मुहूर्त
साखरपुडा - ३,४,५,८,९,१३,१५,१६,१८,२०,२२,२३.
डोहाळजेवण - १६,१७,२०,२३,२६
बारसे - १,३,५,१५,१६,३०
जावळ - ५,९,२६,२७,२८.
गृहप्रवेश - ३,५,९,१५,१७,२०,२३,२८,३०
२७ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर मंगळ रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. आध्यत्मिक स्वभाव असतो. इतरांची दुःखे दूर करावीत असे तुम्हाला वाटत असते. भिन्न लिंगी व्यक्तींबद्दल अधिक आकर्षण असते. तुम्ही स्वबीमनी आणि निग्रही आहात. आत्मविश्वास भरपूर असतो. दुरबलना मदत करणे आवडते. भावनाप्रधान, अनाकलनीय आणि लहरी स्वभाव आहे. दुसऱ्याच्या हाताखाली काम करणे आवडत नाही. स्वतःच्या विचरांबद्दल आग्रही असतात. तुमच्यात जबरदस्त इश्चशक्ती आणि करारीपणा आहे. तुम्ही निर्णभय आहात. धैर्यवान आहात. इतरांवर हुकूमत गाजवणे तुम्हाला आवडते. तुम्ही सुदृढ आहात. विकारणावर मात करता आली पाहिजे. त्यासाठी ध्यान धारणा आवश्यक आहे. तुमचं स्मरण शक्ती चांगली आहे. तुम्ही कष्टाळू, हुशार आणि योग्य निर्णय घेणारे आहेत. तुम्हाला वारसा हक्काने इस्टेट आणि कला मिळतात. भूतकाळातील चुकांमधून आणि अनुभवातून तुम्ही शिकतात. वैवाहिक जीवनातील समस्यांचा तुमच्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. तुम्ही आक्रमक, लढाऊ आणि धाडसी आहात. ध्येयपूर्ती झाल्याशिवाय तुम्ही थांबत नाहीत. सहसा तुमचा कधीही पराभव होत नाही. मिल्ट्री, पोलीस याच्यात तुम्ही उत्तम चमक दाखवू शकतात. तुम्ही स्पष्ट वक्ते आहात मात्र शब्द जपून वापरला पाहिजे. मनाने तुम्ही विशाल आहात आणि मानवी जीवनाचे तुम्हाला उत्तम जाण आहे. तुम्ही इतरांना उत्साह देतात. कितीही प्रतिकूल परिस्थिती असले तरी तुम्ही त्यातून बाहेर पडू शकतात. तुमचा स्वभाव तापट आहे. मैदानी खेळ आणि व्यायाम याचे तुम्हाला आवड आहे. भिन्नलिंगी व्यक्तींकडे तुम्ही आकर्षित होतात. लैंगिक भावनांवर तुम्ही नियंत्रण ठेवले पाहिजे. तुम्हाला कधीही कशाची भीती वाटत नाही. मैत्रीसाठी तुम्ही काहीही करू शकतात. दुर्बल लोकांबद्दल तुम्हाला दया वाटते. तुम्हाला गूढ अनुभव येतात. प्रवासामुळे तुमचा दृष्टिकोन सुधारतो आणि सहनशीलता निर्माण होऊ शकते. तुम्ही काळाच्या पुढचा विचार करू शकतात. तुमच्या आवडीनिवडील बद्दल तुम्ही ठाम असतात. तुमचे तत्व तुम्ही कधीही सोडत नाहीत. चाकोरी बाहेरील संबंध टाळणे हिताचे आहे.
व्यवसाय:- पोलीस, मिलिटरी, गुप्तहेर, राजकीय क्षेत्र, व्यावसायिक क्षेत्र, डॉक्टर, केमिस्ट, राजकीय लेखन, पत्रकार, फायर ब्रिगेड.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार.
शुभ रंग:- पांढरा, पिवळा, तांबडा.
शुभ रत्न:- पुष्कराज, मोती आणि माणिक.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
गुरुवार, २७ ऑगस्ट २०२६
श्रावण शुक्ल चतुर्दशी / सकाळी ९.०९ नंतर पौर्णिमा. वर्षा ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521
राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००
"सकाळी ९.०० पर्यंत चांगला दिवस आहे." *नारळी पौर्णिमा. शुक्ल यजुर्वेदीय श्रावणी.*
चंद्र नक्षत्र - धनिष्ठा.
राशी - मकर / दुपारी १.३६ नंतर कुंभ.
रवी युती बुध.
बुध षडाष्टक नेपच्यून.
टीप:
नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)
कार्यक्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. रवी-बुध युतीमुळे संवादकौशल्य प्रभावी राहील. महत्त्वाची कामे सकाळच्या वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आर्थिक नियोजन यशस्वी ठरेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो)
भाग्याची साथ लाभेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभाग वाढेल. प्रवासाचे योग संभवतात. शिक्षण आणि बौद्धिक क्षेत्रात यश मिळेल. वरिष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा)
आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. अचानक खर्च होण्याची शक्यता आहे. संशोधन, तांत्रिक आणि गुप्त विषयांमध्ये प्रगती होईल. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका.
कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो)
वैवाहिक आणि भागीदारीच्या क्षेत्रात सकारात्मक घडामोडी होतील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या चर्चा यशस्वी होतील. व्यवसायातील करार आणि व्यवहार काळजीपूर्वक पूर्ण करा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे)
कामाचा ताण वाढू शकतो. मेहनतीचे चांगले फळ मिळेल. विरोधकांवर मात करण्यात यश मिळेल. नोकरी-व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो)
मित्रांचे आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. सर्जनशील कार्यात यश मिळेल. प्रेमसंबंधात सकारात्मक घडामोडी होतील. एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.
तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)
कौटुंबिक विषयांकडे लक्ष द्यावे लागेल. घरातील वातावरण आनंददायी राहील. मालमत्ता आणि घरासंबंधी कामे मार्गी लागतील. आर्थिक बाबतीत स्थैर्य मिळेल. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु)
पराक्रम आणि आत्मविश्वास वाढेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. संवादातून महत्त्वाची कामे साध्य होतील. लहान प्रवास लाभदायक ठरतील. नवीन योजना सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे.
धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)
आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत आहेत. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. बोलण्यातील प्रभावामुळे कामे मार्गी लागतील. नवीन खरेदीचा योग संभवतो. सामाजिक संपर्क वाढतील.
मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी)
राशीस्थानी चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. नवीन योजना आणि उपक्रम सुरू करण्यासाठी अनुकूलता राहील. कामात यश मिळेल. सकाळचा वेळ विशेष लाभदायक ठरेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा)
दुपारी राशीस्थानी चंद्र येत असल्याने आत्मविश्वास वाढेल. अचानक एखादी चांगली संधी मिळू शकते. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. मित्रांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय शांतपणे घ्या.
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची)
खर्च वाढण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. दूरच्या प्रवासाचे किंवा परदेशाशी संबंधित कामाचे संकेत आहेत. मानसिक शांतता राखणे आवश्यक राहील. गुप्त लाभाची शक्यता आहे.
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521