राहुकाळ – दुपारी १.३० ते ३.००
दिशाशूल – दक्षिण दिशा
शुभ रंग – पिवळा, केशरी, पांढरा
शुभ अंक – ३, ७, ९
आज चांगला दिवस आहे.
*श्रीरामनवमी, दुर्गाष्टमी*
चंद्र त्रिकोण मंगळ, चंद्र त्रिकोण बुध, चंद्र युती गुरू.
२६ मार्च रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुम्ही कार्यक्षम आहात. कामातील सातत्य वाखाणणी करण्या योग्य असते. दुर्बल लोकांवबद्दल तुम्हाला आपुलकी असते. तुम्ही जन्मतःच उत्तम व्यवस्थापन कौशल्य घेऊन आलेले असतात. तुम्ही मनाने चंचल असतात. वरून बलवान दिसले तरी आतून अस्वस्थ असतात. तुम्हला नीट नेटकेपणा आवडतो. तुम्ही जेथे असतात तेथे स्वछता, टापटीप असते, फुलांचा गुच्छ असतो. अचूक रंगसंगती, सौंदर्य इत्यादी तुमची वैशिष्टये आहेत. मित्र मैत्रिणी सोबत प्रवास करण्याची तुम्हाला आवड असते. तुम्ही नशीबवान आहेत. तुम्हाला उत्तम आर्थिक स्थैर्य लाभते. भिन्न लिंगी व्यक्तींशी तुमचे सहसा जमत नाही. वादविवाद होतात. आळशीपणा अवडत नसला तरी कधीकधी तो जाणवतो आणि त्याने नुकसान होते. प्रेम प्रकरणात तुम्हाला सहसा यश येत नाही. घराबद्दल तुम्हाला ओढ असते. तुम्ही उत्स्फूर्त आणि उत्साही असतात मात्र तुम्हाला भावना व्यक्त करता येत नाहीत.
व्यवसाय:- भौतिक शास्त्र, गणित, किचकट विषय, संशोधन, व्यवस्थापन, कंपनी सेक्रेटरी.
शुभ रंग - काळा.
मेष (Aries)
उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. नवीन कामात यश मिळेल. आर्थिक लाभाचे संकेत.
उपाय: भगवान श्रीरामाचे नामस्मरण करा आणि केशर तिलक लावा.
वृषभ (Taurus)
कौटुंबिक सौख्य वाढेल. धनप्राप्तीचा योग. दैनंदिन कामे सहज पूर्ण होतील.
उपाय: लक्ष्मीला पिवळी फुले अर्पण करा.
मिथुन (Gemini)
तुमच्या राशीत चंद्र आहे. प्रतिष्ठा वाढेल. बुद्धिमत्तेचा योग्य उपयोग होईल. निर्णय लाभदायक ठरतील.
उपाय: गणपतीला दूर्वा अर्पण करा आणि विष्णू स्तोत्र पठण करा.
कर्क (Cancer)
मन शांत राहील. आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.
उपाय: शिवलिंगावर जल अर्पण करा.
सिंह (Leo)
मित्रांकडून सहकार्य मिळेल. नवीन संधी मिळतील. आर्थिक लाभ होईल.
उपाय: सूर्याला अर्घ्य द्या व रामरक्षा स्तोत्र पठण करा.
कन्या (Virgo)
कार्यक्षेत्रात यश मिळेल. वरिष्ठांची कृपा राहील. जबाबदाऱ्या वाढतील.
उपाय: हनुमानाला गूळ-चना अर्पण करा.
तुळ (Libra)
भाग्याची साथ मिळेल. प्रवास लाभदायक. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.
उपाय: विष्णूला पिवळे फुल अर्पण करा.
वृश्चिक (Scorpio)
संमिश्र दिवस आहे. आरोग्याची काळजी घ्या. अचानक बदल संभवतात.
उपाय: हनुमानाला सिंदूर अर्पण करा.
धनु (Sagittarius)
संबंधांमध्ये गोडवा राहील. जोडीदाराची साथ मिळेल. नवे करार फायदेशीर ठरतील.
उपाय: गुरू मंत्राचा जप करा व पिवळे वस्त्र धारण करा.
मकर (Capricorn)
कामात व्यस्त राहाल. मेहनतीचे फळ मिळेल. आरोग्य चांगले राहील.
उपाय: शनिदेवाला काळे तीळ अर्पण करा.
कुंभ (Aquarius)
सर्जनशील कामात यश मिळेल. मुलांकडून आनंद मिळेल. प्रेमसंबंध दृढ होतील.
उपाय: गणपतीला दूर्वा अर्पण करा.
मीन (Pisces)
घरगुती वातावरण आनंदी राहील. आई-वडिलांची साथ मिळेल. मानसिक शांतता लाभेल.
उपाय: विष्णूला खीर अर्पण करा व तुळशी प्रदक्षिणा करा.
आजचा शुभ विचार:
“श्रद्धा आणि परिश्रम यांची सांगड घातली, तर यश नक्कीच तुमच्या पावलांशी येते.”
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.