असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य , गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य , गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६
  • Positive News
  • ऑक्टोबर 15 2026

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य , गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६

गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६. अश्विन शुक्ल पंचमी. पराभव नाम संवत्सर, शके १९४८, शरद ऋतू.

राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521

"आज वर्ज्य दिवस आहे"

नक्षत्र - ज्येष्ठ. आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृश्चिक.

रवी लाभ चंद्र, रवी लाभ गुरू, चंद्र त्रिकोण गुरू.

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संमिश्र दिवस आहे. महत्त्वाची कामे करताना सावधगिरी बाळगा. आर्थिक व्यवहारात घाई करू नका. अनावश्यक खर्च टाळा. संयमाने वागल्यास अडचणी कमी होतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) नोकरी-व्यवसायात कामाचा ताण वाढू शकतो. वरिष्ठांशी बोलताना संयम ठेवा. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा. महत्त्वाचे निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) प्रवासाचे योग आहेत. कामात काही अडथळे येऊ शकतात. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. प्रिय व्यक्तींशी संवाद साधताना गैरसमज टाळा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. मनावर ताण जाणवू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाच्या कामात घाई न करता परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्या.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) संमिश्र ग्रहमान आहे. नोकरी-व्यवसायात अडथळे जाणवू शकतात. आर्थिक व्यवहार जपून करा. आरोग्याकडे लक्ष द्या. आज महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) कामे पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. सहकाऱ्यांशी मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. अनावश्यक खर्च टाळा.

तूळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सामाजिक क्षेत्रात संधी मिळतील. मित्रमंडळींचे सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत नियोजन आवश्यक आहे. नवीन गुंतवणूक करताना घाई करू नका.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) तुमच्या राशीत चंद्र आहे. ग्रहमान संमिश्र असल्याने महत्त्वाची कामे सावधगिरीने करा. नोकरी-व्यवसायात जबाबदाऱ्या वाढतील. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. विनाकारण वाद टाळा.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कामात काही विलंब होऊ शकतो. प्रवासात सावधगिरी बाळगा. कौटुंबिक बाबतीत संयम ठेवा. आर्थिक निर्णय घेताना घाई करू नका. शांतपणे परिस्थिती हाताळा.

मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) आर्थिक व्यवहारात सावधानता आवश्यक आहे. अडलेली कामे पूर्ण होण्यास वेळ लागू शकतो. नोकरी-व्यवसायात संयम ठेवा. अनावश्यक जोखीम घेणे टाळा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) नोकरी-व्यवसायात संमिश्र अनुभव येतील. नवीन काम सुरू करण्यापूर्वी विचार करा. खर्च वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींशी संवाद साधताना समजूतदारपणा ठेवा.

मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) दिवस संमिश्र आहे. कामात विलंब होऊ शकतो. मानसिक शांतता राखण्याचा प्रयत्न करा. आर्थिक व्यवहार जपून करा. धार्मिक कार्यात मन रमवल्याने समाधान मिळेल.

- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521

संबंधित बातम्या