मार्गशीर्ष शुक्ल तृतीया. चंद्र – धनु राशीत, मूळ नक्षत्रात. आज चांगला दिवस.
वार– रविवारी सूर्यदोष शमनाचा दिवस
योग – धृति योग
राहुकाल – संध्याकाळी ४:३० ते ६:००
मेष (Aries)
आज कार्यक्षेत्रात अचूक निर्णय घ्यावे लागतील. जोडीदाराकडून भावनिक पाठबळ मिळेल. आर्थिक बाबतीत स्थिरता येईल. प्रवासाला अनुकूल दिवस नाही.
वृषभ (Taurus)
कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी संभवतात. पैशांची ये-जा वाढेल पण अचानक लाभही मिळू शकतो.
मिथुन (Gemini)
कामात नव्या संधी मिळतील. मित्रांशी भेट होईल. विद्यार्थ्यांसाठी उत्तम दिवस. आर्थिक अडथळे दूर होतील.
कर्क (Cancer)
घरगुती वातावरणात शांतता राहील. वाहनखरेदी, घरसजावटीसाठी योग्य दिवस. वैवाहिक जीवनात सौहार्द.
सिंह (Leo)
मानसिक ताण वाढू शकतो. अनावश्यक खर्च टाळा. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. दुपारनंतर स्थिती सुधारेल.
कन्या (Virgo)
आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय फलदायी. प्रलंबित कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ. वैवाहिक नातेसंबंधात आनंद.
तुला (Libra)
मानसिक शांती मिळेल. नवीन लोकांशी ओळख वाढेल. कायदेशीर कामांसाठी दिवस अनुकूल. आरोग्य उत्तम.
वृश्चिक (Scorpio)
गुप्त शत्रू सक्रिय होतील पण त्याचा तोटा होणार नाही. प्रवासाचे योग. नोकरीत बदलाची चर्चा होऊ शकते.
धनु (Sagittarius)
कौटुंबिक विषयात तणाव. आर्थिकदृष्ट्या काळजी घ्या. विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करावे. दुपारनंतर शुभ संदेश मिळेल.
मकर (Capricorn)
कामात प्रगती. वरिष्ठांकडून कौतुक. गुंतवणुकीत फायदा. आरोग्य संतुलित राहील.
कुंभ (Aquarius)
नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी योग्य दिवस. मित्रांकडून मदत. प्रेमसंबंधात समृद्धी.
मीन (Pisces)
मन थोडं अस्वस्थ राहू शकतं. खर्च वाढेल. धार्मिक प्रवासाचे योग. संध्याकाळी शांतता आणि सकारात्मकता वाढेल.
-ज्योतिषाचार्य मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521