असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य रविवार, २ ऑगस्ट २०२६

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य रविवार, २ ऑगस्ट २०२६
  • Positive News
  • ऑगस्ट 2 2026

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य रविवार, २ ऑगस्ट २०२६
आषाढ कृष्ण चतुर्थी. ग्रीष्म ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.

 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
 (संपर्क - 8087520521)

 राहुकाळ - सायंकाळी ४.३० ते ६.००

 आज चांगला दिवस आहे. *संकष्टी चतुर्थी* चंद्रोदय मुंबई - रात्री ९.३७, नाशिक - ९.३३

 नक्षत्र - पू. भाद्रपदा / रात्री ९.३७ नंतर उ. भाद्रपदा.
 आज जन्मलेल्या बाळाची राशी - कुंभ / दुपारी ३.२७ नंतर मीन.

 चंद्र केंद्र मंगळ.
 चंद्र त्रिकोण बुध.
 चंद्र प्रतियुती शुक्र.

२ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

     तुमच्यावर चंद्र आणि रवी या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही ध्येयवादी असून तुमच्यात प्रगल्भ कल्पनाशक्ती आहे. तुम्ही योग्य तर्हेने विचार करणारे, निस्वार्थी असून इतरांच्या भावनांची कदर करतात. कोणत्याही कामातील उद्दीष्ट न विसरता त्यातील सर्व बारीक सारीक गोष्टी तुम्ही त्यात उतरवतात. तुम्ही उत्तम सहकारी असतात. तुम्ही शास्त्रशुद्ध, व्यवस्थित आणि टापटीप असतात. तुम्ही स्वप्नाळू आणि एकांतात रमणारे आहात. तुमच्यात प्रतिष्ठा, मोठपण, कल्पकता, अधिकार या गोष्टी असतात. मानवी जीवनाचे तुम्हाला उत्तम आकलन होते. व्यवसायात तुम्ही सर्वोच्च पद गाठू शकतात. रंगमंच, सिनेमा, सहली यांचे तुम्हाला आकर्षण असते. तुमच्यात उत्स्फूर्त आणि उपजत कला असतात. तुमच्या वागण्यात रुबाब असतो. तुम्हाला भरपूर मित्र असतात आणि स्त्रियांपासून तुम्हाला फायदा होतो. तुम्ही लेखक म्हणून प्रसिद्धीस येतात. तुमचा भाग्योदय पाणथळ जागी होतो. लोकांच्या कल्याणाचा तुम्हाला ध्यास असतो. तुम्ही प्रेमळ आणि दयाळू आहात. तुम्हाला उपजतच वरच्या दर्जाची कल्पनाशक्ती आणि उच्च ध्येयवादअसतो. इतरांना तुमच्याबद्दल विलक्षण आकर्षण असते. समारंभात तुम्हाला मानाचा स्थान असते. सूक्ष्म आणि गूढ बाबींकडे तुमचा ओढा असतो.  मनाची सूक्ष्म शक्ती तुमच्याजवळ असते. पुढे घडणाऱ्या घटना अनेकदा तुमहाला आधीच समजतात. आयुष्यात सर्वसाधारण यश मिळते. मित्रांशी तुम्ही प्रामाणिक असतात. गुप्त शत्रूंपासून सावध राहिले पाहिजे. तुम्ही मानसिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या उच्च प्रतीचे आहात. तुम्ही ध्येयवादी असून तुमच्या मध्ये जबरदस्त कल्पनाशक्ती आहे. इतरांनी तयार केलेल्या आराखड्याची तुम्ही प्रत्यक्षात चांगल्या प्रकारे रूपांतर करू शकतात. तुम्ही विचारी आहात आणि निस्वार्थी तसेच विचारवंत देखील आहात. इतरांच्या भावनांचे तुम्ही कदर करतात. तुम्ही एक उत्तम सहकारी असतात. कोणत्याही कामाचे तुम्ही उद्दिष्ट विसरत नाहीत. तुमच्यामध्ये व्यवस्थितपणा आणि टापटीप आहे. तुम्हाला बऱ्याच वेळेला समाजापासून एकटे राहणे आणि स्वप्नात रंगणे आवडते. तुमच्यावर प्रतिष्ठा, कल्पकता आणि अधिकार असतो. मानवी जीवनाचे तुम्हाला उत्तम आकलन होते. कोणत्याही व्यवसाय मध्ये तुम्ही सर्वोच्च पद गाठू शकतात. तुम्हाला थिएटर्स, सहली, प्रवास, सिनेमा, भ्रमंती यांची आवड असते. तुमच्यामध्ये अनेक कला असतात. तुमच्या वागण्यामध्ये एक प्रकारचा रुबाब असतो. तुम्ही लोकांना आकर्षित करून घेऊ शकतात.

व्यवसाय:-  संगीतकार, कथालेखक, कादंबरी लिखाण, पेंटिंग्स, कविता, नाट्यकृती लिहिणे, द्रव पदार्थ संबंधित व्यवसाय, ज्योतिषी, केमिस्ट, प्रयोगशाळा संबंधित व्यवसाय, दंतवैद्य, बँकिंग, सर्जरी.

शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, शुक्रवार.

शुभ रंग:- पांढरा, निळा, बिस्किटी.

शुभ रत्न:- मोती आणि हिरा.
 
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

 टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.

 मेष:- (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
धाडस आणि आत्मविश्वास वाढेल. चंद्र-मंगळ केंद्र योगामुळे रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील. प्रवास लाभदायक ठरेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

 वृषभ:- (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. चंद्र-शुक्र प्रतियुतीमुळे अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. संयम लाभदायक ठरेल.

मिथुन:- (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
चंद्र-बुध त्रिकोण योगामुळे बुद्धिमत्ता आणि संवादकौशल्याचा उत्कृष्ट उपयोग होईल. विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांना विशेष लाभ मिळेल. नवीन संपर्क फायदेशीर ठरतील.

 कर्क:- (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
कार्यक्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. आरोग्याकडे लक्ष द्या.

 सिंह:- (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
भाग्याची साथ लाभेल. संततीकडून आनंददायक बातमी मिळू शकते. सर्जनशील क्षेत्रात यश मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

 कन्या:- (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
घरगुती आणि मालमत्तेसंबंधी कामे मार्गी लागतील. मानसिक समाधान लाभेल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल.

 तुळ:- (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
भागीदारीच्या कामात लाभ होईल. बोलण्याचा प्रभाव वाढेल. महत्त्वाच्या चर्चेत यश मिळेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत.

 वृश्चिक:- (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
नवीन योजना यशस्वी ठरतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. धाडसी निर्णय विचारपूर्वक घ्या. उत्साह वाढेल.

 धनु:- (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. प्रवासाचे योग संभवतात. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. भाग्याची साथ मिळेल.

 मकर:- (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
आर्थिक व्यवहारात यश मिळेल. मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. संयमाने काम करा.

 कुंभ:- (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
दुपारी ३.२७ पर्यंत राशीस्थानी चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. चंद्र-मंगळ केंद्र योगामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील. चंद्र-शुक्र प्रतियुतीमुळे भावनिक निर्णय टाळा.

 मीन:- (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
दुपारी ३.२७ नंतर चंद्र राशीत प्रवेश करणार असल्याने मन प्रसन्न राहील. चंद्र-बुध त्रिकोण योगामुळे नवीन कल्पनांना चालना मिळेल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल.

 - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
 8087520521

संबंधित बातम्या