राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज वर्ज्य दिवस आहे”
चंद्रनक्षत्र – पूर्वाषाढा / उत्तराषाढा
चंद्र राशी – धनु / (दुपारी ४.४१ नंतर) मकर
योग – हर्षण योग (अशुभ)
करण – चतुष्पाद, नाग (अशुभ)
ग्रहस्थिती :
रवी युती चंद्र, चंद्र युती मंगल, चंद्र युती बुध, चंद्र लाभ शनी,
चंद्र त्रिकोण हर्षल, चंद्र लाभ नेपच्यून, बुध युती मंगल.
१८ जानेवारी रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये :-
तुमच्यावर रवी, चंद्र व मंगल या ग्रहांचा प्रभाव प्रकर्षाने दिसून येतो. तुम्ही आत्मविश्वासी, कर्तृत्ववान आणि धाडसी स्वभावाचे असता. कोणतेही काम अंगावर घेऊन ते पूर्ण करण्याची जिद्द तुमच्यात असते.
तुम्ही स्पष्टवक्ते असून नेतृत्वगुण लाभलेले असतात. कधी कधी अति उतावळेपणा किंवा भावनिक निर्णय अडचणी निर्माण करू शकतात. बुध-मंगल युतीमुळे बुद्धी आणि कृती यांचा सुंदर मेळ दिसून येतो, त्यामुळे योग्य दिशेने प्रयत्न केल्यास मोठे यश मिळू शकते.
शनीच्या प्रभावामुळे जीवनात कष्ट, शिस्त आणि संयम आवश्यक ठरतो. सुरुवातीला अडचणी आल्या तरी कालांतराने स्थैर्य व मान-सन्मान मिळतो.
व्यवसाय : प्रशासन, तांत्रिक क्षेत्र, व्यवस्थापन, संरक्षण सेवा, अभियांत्रिकी, व्यवसाय, सल्लागार
शुभ दिवस : मंगळवार, रविवार, शनिवार
शुभ रंग : लाल, केशरी, करडा
शुभ रत्ने : माणिक, मूंगा
(रत्ने घेताना कुंडलीचा उपयोग अवश्य करा)
आजचे राशिभविष्य
मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
आज मानसिक ताण जाणवेल. वाद टाळा. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.
वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
आर्थिक बाबतीत संयम ठेवा. कुटुंबात गैरसमज संभवतात. शांत राहा.
मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
बोलताना शब्द जपून वापरा. कामात चूक होण्याची शक्यता आहे.
कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
भावनिक अस्थिरता जाणवेल. ध्यान, प्रार्थना उपयुक्त ठरेल.
सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
आज वर्ज्य दिवस असल्याने नवीन काम टाळा. वरिष्ठांशी वाद नको.
कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
कामाचा ताण वाढेल. आरोग्याकडे लक्ष द्या. उतावळेपणा टाळा.
तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
संबंधांमध्ये तणाव संभवतो. आर्थिक व्यवहार आज टाळावेत.
वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
गुप्त शत्रूं पासून सावध रहा. संयम ठेवणे हिताचे ठरेल.
धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
चंद्र तुमच्या राशीत असल्याने भावनिक चढउतार जाणवतील. निर्णय टाळा.
मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
दुपारनंतर चंद्र तुमच्या राशीत येईल. जबाबदाऱ्या वाढतील, पण संयम ठेवा.
कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
खर्च वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक नियोजन करा.
मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
आध्यात्मिक विचार वाढतील. मनःशांतीसाठी एकांत उपयुक्त ठरेल.
— ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
8087520521
कुंडलीवरून करिअर, लग्न, व्यवसाय, भागीदारी, आरोग्य, भाग्योदय, शुभ रत्ने व सविस्तर मार्गदर्शन अल्प किमतीत जाणून घेण्यासाठी संपर्क करा.