राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
(संपर्क – 8087520521)
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज चांगला दिवस आहे”
चंद्रनक्षत्र – चित्रा / स्वाती
चंद्र राशी – तूळ
११ जानेवारी रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये :-
तुमच्यावर रवी, शनी व शुक्र या ग्रहांचा विशेष प्रभाव दिसून येतो. तुम्ही स्वाभिमानी, न्यायप्रिय आणि संतुलित विचारांचे असता. कोणताही निर्णय घेताना सर्व बाजूंनी विचार करण्याची सवय तुमच्यात असते.
तुमचा स्वभाव संयमी, सुसंस्कृत आणि प्रभावी बोलणारा असतो. लोकांशी संवाद साधण्यात तुम्ही कुशल असता. सौंदर्य, कला, न्याय व व्यवस्थापन क्षेत्रात तुम्हाला विशेष यश मिळू शकते.
कधी कधी अपेक्षा जास्त ठेवल्यामुळे मनस्ताप होऊ शकतो, मात्र तुमची सहनशीलता व समजूतदारपणा तुम्हाला योग्य मार्गावर ठेवतो. आयुष्यात स्थैर्य उशिरा मिळते, पण टिकाऊ असते.
व्यवसाय : प्रशासन, कायदा, कला, डिझाईन, मीडिया, जनसंपर्क, व्यवसाय व्यवस्थापन
शुभ दिवस : रविवार, शुक्रवार, शनिवार
शुभ रंग : पांढरा, फिकट गुलाबी, निळसर
शुभ रत्ने : हिरा, नीलम
(रत्ने घेताना कुंडलीचा उपयोग अवश्य करा)
मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
आज कामात गती येईल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. आर्थिक बाजू सुधारेल.
वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
घरातील वातावरण आनंदी राहील. रखडलेली कामे पूर्ण होतील. आरोग्य चांगले राहील.
मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
बोलण्यात संयम ठेवा. लहान गैरसमज टाळा. अभ्यास व लेखनासाठी अनुकूल दिवस.
कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
मन थोडे भावूक राहील. मात्र कुटुंबाचा आधार मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.
सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस अनुकूल आहे.
कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
कामाच्या ठिकाणी प्रशंसा मिळेल. नियोजनबद्ध कामामुळे यश मिळेल.
तूळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
चंद्र तुमच्या राशीत असल्याने दिवस उत्तम. मन प्रसन्न राहील. नवीन संधी मिळू शकतात.
वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
गुप्त शत्रूंपासून सावध रहा. संयम ठेवल्यास अडचणी टळतील.
धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
मित्रांकडून सहकार्य मिळेल. प्रवास यशस्वी होईल.
मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
कष्टाचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. जबाबदाऱ्या वाढतील.
कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
नवीन विचार सुचतील. आर्थिक नियोजन फायदेशीर ठरेल.
मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
आध्यात्मिक कल वाढेल. मनःशांती मिळेल. ध्यान-प्रार्थना उपयुक्त.
— ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
8087520521
कुंडलीवरून करिअर, विवाह, व्यवसाय, भागीदारी, आरोग्य, भाग्योदय, शुभ रत्ने व सविस्तर मार्गदर्शन अल्प किमतीत जाणून घेण्यासाठी संपर्क करा.