असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य २७ सप्टेंबर २०२५
शनिवार, २७ सप्टेंबर २०२५. अश्विन शुक्ल पंचमी/षष्ठी. विश्वावसूनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
"आज चांगला दिवस आहे"
नक्षत्र: अनुराधा. आज जन्मलेल्या बाळाची राशी- वृश्चिक.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आज काही विचित्र घटना घडतील. मात्र त्यातून तुमचा लाभ होणार आहे. राजकीय क्षेत्रात उलथापालथ होणार आहे. महिलांचा गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) तुमच्या मृदू स्वभावाला न साजेसा पराक्रम आज तुम्ही कराल. परदेश गमनाचे नियोजन कराल. पत्नीसाठी वेळ द्याल. गृहसजावट कराल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) व्यवसायात भरघोस वाढ संभवते. सामाजिक कार्यात रस निर्माण होईल. कलाकारांना काहीशा निराशेला सामोरे जावे लागू शकते.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) मन आनंदी करणारे ग्रहमान आहे. काहीतरी भव्य दिव्य करावे असे आज तुम्हाला वाटेल. भय आणि चिंता दूर होतील. मात्र बोलताना काळजी घ्या. मौल्यवान दागिने सांभाळा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आज भरभराट करणारा दिवस आहे. मन कल्पनेच्या उत्तुंग भराऱ्या घेईन. मात्र त्यावर काही बंधने येतील. वारसा हक्काने संपत्ती मिळेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) तुमच्या राशीत बुध आणि सूर्य आहेत. हे अनोखे ग्रहमान आहे. आत्मविश्वास वाढणार आहे. चिकित्सा आणि संशोधन यात यश मिळेल. मात्र चैनीवर खर्च कराल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) प्रतिकूल रवी आणि बुध असूनही आज तुम्ही यशस्वी वाटचाल कराल. अनुकूल शुक्र, केतू तुमच्या समस्या सोडवण्यास मदत करतील. मात्र जास्त गूढ वागणे हिताचे नाही.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आज तुमच्याच राशीत चंद्र आहे. मनमोकळे वागाल. सूर्याची अनुकूलता तुम्हाला उच्च पदावर नेईन. तुमच्या कष्टाळू स्वभावाचा तुम्हाला लाभ होईल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आज फारशी अनुकूलता नसली तरी फार अडचणी देखील नाहीत. नोकरीच्या ठिकाणी जास्त वेळ जाणार आहे. वरिष्ठ खुश असणार आहेत. भिन्न लिंगी व्यक्तीकडून एखाद्यावेळी काहीसा त्रास होऊ शकतो.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) चंद्र अनुकूल आहे. सत्याच्या मार्गाने पैसे कमवा. गैर मार्ग अवलंबिल्यास आज नक्कीच त्रास होणार आहे. मोह टाळा. प्रवास घडतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आज कष्ट करण्याचा दिवस आहे. त्यामानाने फळ कमी मिळणार असले तरी भविष्यातील यशाची ही सुरुवात ठरू शकते. आज तुम्हाला महिलांकडून विरोध संभवतो.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) ग्रहमान अनुकूल आहे. मन आनंदी राहील. तुमचे शत्रू आज जे काही करतील त्याचा तुम्हालाच फायदा होणार आहे. आज व्यसने आणि प्रलोभने टाळा.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)
व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521