असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य शनिवार, ३ जानेवारी २०२६

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य शनिवार, ३ जानेवारी २०२६
  • Positive News
  • जानेवारी 3 2026

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य शनिवार, ३ जानेवारी २०२६


पौष शुक्ल त्रयोदशी/चतुर्दशी
विश्वावसूनाम संवत्सर
राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
(संपर्क – 8087520521)

राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०

“आज चांगला दिवस आहे”

चंद्र नक्षत्र – आर्द्रा / (संध्याकाळी ५.२८ नंतर) पुनर्वसू.
चंद्र राशी- मिथुन
योग – ऐंद्र योग

ग्रहस्थिती 
रवी प्रतियुती चंद्र, चंद्र प्रतियुती मंगळ, चंद्र युती गुरू, चंद्र प्रतियुती शुक्र.

३ जानेवारी रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये :-

तुमच्यावर बुध व गुरू या ग्रहांचा विशेष प्रभाव असतो. तुम्ही बुद्धिमान, विचारशील आणि संवादकुशल असता. नवनवीन कल्पना सुचणे, वेगाने निर्णय घेणे आणि परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेणे ही तुमची बलस्थाने आहेत.
तुम्ही अभ्यासू, ज्ञानी आणि तत्वनिष्ठ असता. इतरांना मार्गदर्शन करणे, शिकवणे व सल्ला देणे तुम्हाला आवडते. आर्थिक बाबतीत तुम्ही हुशार असता, मात्र काही वेळा खर्चिक स्वभाव दिसून येतो.
तुमची स्मरणशक्ती तीव्र असते. लेखन, शिक्षण, पत्रकारिता, व्यवस्थापन, सल्लागार, अध्यापन अशा क्षेत्रात तुम्ही उत्तम कामगिरी करू शकता.
तुमचा स्वभाव कधी कधी द्विधा मनःस्थितीचा असतो. भावनांवर नियंत्रण ठेवणे आणि एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचा हट्ट टाळणे आवश्यक आहे.
कुटुंबावर प्रेम करणारे, मित्रपरिवारात लोकप्रिय आणि समाजात मान-सन्मान मिळवणारे व्यक्तिमत्व तुम्हाला लाभते.

व्यवसाय : शिक्षण, लेखन, पत्रकारिता, सल्लागार, आयटी, कम्युनिकेशन, ट्रेडिंग, व्यवस्थापन.
शुभ दिवस : बुधवार, गुरुवार, शुक्रवार
शुभ रंग : हिरवा, पिवळा, आकाशी
शुभ रत्ने : पन्ना, पुष्कराज
(रत्ने घेताना कुंडलीचा उपयोग अवश्य करा)

मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
आज उत्साह वाढेल. नवीन कामाची सुरुवात होईल. मात्र उतावळेपणा टाळा. वरिष्ठांशी संवाद जपून ठेवा.

वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
आर्थिक लाभाचा दिवस. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. स्थावर मालमत्तेशी संबंधित चर्चा पुढे जाईल.

मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
चंद्र तुमच्याच राशीत आहे. आत्मविश्वास वाढेल. मान-सन्मान मिळेल. बोलण्यातील गोडवा आज तुमचे काम करून देईल.

कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
मन थोडे अस्वस्थ राहील. खर्च वाढू शकतो. गुप्त शत्रूं पासून सावध राहा. ध्यान व शांतता उपयोगी ठरेल.

सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
मित्रांकडून सहकार्य मिळेल. सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलतील.

कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
करिअरमध्ये प्रगतीचा दिवस. वरिष्ठ खूश राहतील. जबाबदाऱ्या वाढल्या तरी समाधान मिळेल.

तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
भाग्याची साथ मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात रस वाढेल.

वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
आज संयम आवश्यक आहे. रागावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी मतभेद टाळा.

धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
भागीदारीत लाभ होईल. वैवाहिक जीवनात समजूतदारपणा ठेवा. आर्थिक व्यवहार जपून करा.

मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
नोकरीत बदल किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. आरोग्याकडे लक्ष द्या.

कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
सर्जनशील कामात यश मिळेल. संततीविषयक आनंदाची बातमी मिळू शकते.

मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
कौटुंबिक सुख वाढेल. वाहन किंवा घरासंबंधी विचार पुढे जातील. मानसिक समाधान लाभेल.

(कुंडलीवरून करिअर, लग्न, व्यवसाय, भागीदारी व सविस्तर मार्गदर्शनासाठी तसेच “राशीभाव” कार्यक्रमाच्या बुकिंगसाठी संपर्क करा –
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक – 8087520521)

संबंधित बातम्या