असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य शनिवार, १८ ऑक्टोबर २०२५

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य शनिवार, १८ ऑक्टोबर २०२५
  • Positive News
  • ऑक्टोबर 18 2025

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य शनिवार, १८ ऑक्टोबर २०२५
अश्विन कृष्ण द्वादशी विश्वावसुनाम संवत्सर, शके १९४७, संवत २०८१
 राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
 (संपर्क – 8087520521)

राहुकाळ – दुपारी १२.०० ते १.३०
चंद्र राशी – सिंह/कन्या
नक्षत्र – पूर्वा/उत्तराफाल्गुनी.

आज दुपारी १२.०० पर्यंत चांगला दिवस. शनी प्रदोष, गुरू द्वादशी, धन त्रयोदशी.
 
१८ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

     तुमच्यावर मंगळ आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे.  तुम्ही सभ्य, सुसंस्कृत आणि मोठ्या मनाचे आहात. तुम्ही मित्रांशी प्रामाणिक असतात. तुम्ही एक विश्वासू आणि जबाबदार नागरिक असतात. वक्तृत्व, हरहुन्नरी स्वभाव, स्वातंत्रपणा, मान सन्मान ही तुमची वैशिष्टये आहेत. तुम्ही आक्रमक, धाडसी, तडफदार, कार्यक्षम आणि लढावृ वृत्तीचे आहात. इतरांची कुरापत काढणे तुम्हाला आवडते. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून स्वतःच्या विषयाची तुम्हाला पूर्ण माहिती असते. तसेच स्वकर्तृत्वाबद्दल तुम्हाला पूर्ण विश्वास असतो. स्वतःचे निर्णय तुम्ही स्वतःच घेतात. ध्येयपूर्ती झाल्याशिवाय तुम्ही थांबत नाहीत. तुमच्यामध्ये उतावळेपणा असतो. तुम्ही संभाषणचतुर असतात. जीवनात तुम्हाला अधिकार आणि मानसन्मान मिळतात. सहसा तुम्ही स्वतःची चूक कधीही मान्य करत नाहीत. तुम्हाला मैदानी खेळांची आणि शक्तिशाली व्यायामाची आवड असते. दुर्बल लोकांना वर दया करण्यात तुम्हाला एक सुप्त आनंद मिळतो. आजारी लोकांना बरे करण्याची तुमच्यामध्ये शक्ती असते. तुम्ही तापट असला तरी शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे तुम्ही स्वतःवर ताबा ठेवू शकतात. तुमचे विचार तुम्ही ठामपणे मांडतात आणि तुमच्या मध्ये धैर्य असते. तुम्हाला प्राणी प्रिय असतात आणि कायद्याचे पालन करणे आवडते. तुम्ही अत्यंत विश्वासू आणि जबाबदारीच्या जागा सांभाळू शकतात. तुमची मानसिक शक्ती अफाट आहे. प्रवासामुळे तुमचा दृष्टिकोन विशाल होतो. तुम्ही विचारवंत आणि अभ्यासु वृत्तीचे आहात. तुमचे विचार काळाच्या पुढे असतात. त्यामुळे इतर लोक तुमचा सल्ला घेतात. तुमच्या आवडी निवडी बाबत तुम्ही अत्यंत ठाम असतात. तुम्ही अहंकार टाळला पाहिजे. तुम्ही सतत एक विद्यार्थी असतात. जीवनात खरा आनंद शिकण्यात आणि शिकवण्यात आहे असे तुम्हाला ठामपणे वाटते. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळते.

व्यवसाय:-  हॉटेल, बेकरी, संगीतकार, दागिने विक्री, आर्किटेक्ट, गृह सजावट, लोखंडाशी संबंधित व्यवसाय, इंजिनिअर, बांधकाम क्षेत्र मिल्ट्री, पोलीस, गुप्तहेर.

शुभ दिवस:- सोमवार, गुरुवार, शुक्रवार.

शुभ रंग:- तांबडा, पांढरा, पिवळा.

शुभ रत्न:- पुष्कराज, मोती, माणिक.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

 मेष:
दिवसभर कार्यक्षेत्रात गती राहील. नवीन कामात उत्साहाने पुढे जा. आर्थिक फायदा संभवतो. आरोग्य उत्तम.

 वृषभ:
कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये गुंतलेले राहाल, पण समाधानही मिळेल. खर्च वाढेल. प्रवास शक्य. शुभ रंग — गुलाबी.

 मिथुन:
मित्रमंडळींकडून चांगले सहकार्य. महत्त्वाचे निर्णय घेताना संयम ठेवा. संध्याकाळी आनंददायी प्रसंग संभवतो.

 कर्क:
कार्यसिद्धीसाठी आजचा दिवस अनुकूल. नोकरीत प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. आरोग्य ठीक राहील.

 सिंह:
सामाजिक वर्तुळात सन्मान वाढेल. वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. प्रवास यशदायी. आत्मविश्वासात भर पडेल.

 कन्या:
आज मन थोडं विचलित राहू शकतं. व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. दुपारनंतर चांगली बातमी मिळेल.

 तुळ:
प्रेमसंबंध दृढ होतील. कौटुंबिक विषयात आनंद. आर्थिक व्यवहार लाभदायक. आरोग्य सुधारेल. शुभ रंग — पांढरा.

 वृश्चिक:
आज तुमचं आकर्षण आणि प्रभाव वाढेल. कामात नवीन दिशा मिळेल. धार्मिक विचारांना चालना मिळेल.

 धनु:
विद्यार्थ्यांना उत्तम यशाची शक्यता. आर्थिक दृष्ट्या दिवस स्थिर. प्रवास सुखद. नात्यांमध्ये गोडवा वाढेल.

 मकर:
काही अनपेक्षित खर्च येऊ शकतात. कामातील ताण वाढेल पण यश मिळेल. संयम ठेवा.

 कुंभ:
सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळेल. कला, लेखन, आणि अध्यापन क्षेत्रातील लोकांसाठी शुभ दिवस. संध्याकाळी शांतता लाभेल.

 मीन:
मन प्रसन्न राहील. घरात शुभ प्रसंग. नातेवाईकांकडून भेटवस्तू मिळू शकते. आर्थिक लाभाचे संकेत.

 आजचा उपाय:
शनिवारी पीपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि “ॐ शं शनैश्चराय नमः” हा मंत्र जपा — तणाव कमी होईल आणि कार्यसिद्धी होईल.

कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
 

संबंधित बातम्या