अधिक ज्येष्ठ कृष्ण त्रयोदशी / दुपारी ४.०८ नंतर चतुर्दशी. ग्रीष्म ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
(संपर्क - 8087520521)
राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
आज वर्ज्य दिवस आहे.
नक्षत्र - कृत्तिका.
आज जन्मलेल्या बाळाची राशी - मेष / सकाळी ९.२६ नंतर वृषभ.
(विष्टी करण)
चंद्र लाभ गुरू.
चंद्र लाभ शुक्र.
चंद्र युती हर्षल.
चंद्र लाभ नेपच्यून.
टीप:- नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) सकाळपर्यंत चंद्र राशीत असल्याने आत्मविश्वास उत्तम राहील. महत्त्वाची कामे सकाळी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. चंद्र-हर्षल योगामुळे अचानक निर्णय घेणे टाळा. आर्थिक लाभाचे संकेत आहेत.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) सकाळनंतर चंद्र राशीत प्रवेश करणार असल्याने उत्साह वाढेल. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. नवीन योजना आखण्यासाठी दिवस अनुकूल आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) खर्च वाढण्याची शक्यता आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. दूरच्या व्यक्तींकडून शुभवार्ता मिळू शकते. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा.
कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) लाभस्थानी ग्रहयोग असल्याने आर्थिक आवक वाढेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) व्यवसाय आणि नोकरीत प्रगती होईल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. जबाबदाऱ्या वाढतील, पण त्यातून लाभही मिळेल. प्रतिष्ठा वाढवणाऱ्या घटना घडतील.
कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) भाग्याची उत्तम साथ लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.
तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. अनपेक्षित खर्च संभवतो. गुप्त लाभाची शक्यता आहे. संयम आणि नियोजन यामुळे अडचणी दूर होतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) भागीदारीच्या कामात लाभ मिळेल. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. चंद्र-शुक्र आणि गुरूच्या शुभ प्रभावामुळे संबंध अधिक दृढ होतील. नवीन करार यशस्वी ठरतील.
धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कामाचा ताण वाढेल, पण मेहनतीचे योग्य फळ मिळेल. विरोधकांवर विजय मिळवाल. आरोग्याची काळजी घ्या. नियमित कामातून लाभ मिळेल.
मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) सर्जनशील कार्यात यश मिळेल. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. प्रेमसंबंधात सकारात्मक घडामोडी घडतील. संततीकडून आनंददायक बातमी मिळू शकते.
कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) घरगुती वातावरण आनंददायी राहील. मालमत्तेशी संबंधित कामे मार्गी लागतील. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. मानसिक समाधान मिळेल. वास्तूविषयक निर्णय घेऊ शकता.
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) पराक्रम वाढेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. संवाद कौशल्यामुळे कामे मार्गी लागतील. लहान प्रवास लाभदायक ठरतील. नवीन व्यवहार यशस्वी होतील.
कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521