असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य  शनिवार, १ ऑगस्ट २०२६

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य  शनिवार, १ ऑगस्ट २०२६
  • Positive News
  • ऑगस्ट 1 2026

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य  शनिवार, १ ऑगस्ट २०२६

शनिवार, १ ऑगस्ट २०२६. *शुभ कालावधी*

सकाळी ८.२० ते सकाळी ९.२५ - चंद्र -  चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, द्रव पदार्थ. 

सकाळी ८.२० ते सकाळी ९.२५ - मंगल - जमीन व्यवहार, शेती, क्रीडा, कोर्ट, वादविवाद, स्पर्धा, तंत्रज्ञान.

सकाळी ९.२५ ते सकाळी १०.३० - सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे.

सकाळी १०.३० ते सकाळी ११.३५ - शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी.

सकाळी ११.३५  ते दुपारी १२.४० - बुध -  व्यापार, गणित, वाचन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिषी, मार्केटिंग, भाषण, दळणवळण,  
 
दुपारी १२.४० ते दुपारी १.४६ - चंद्र -  चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, द्रव पदार्थ, श्री. महादेव उपासना, प्राणायाम, छंद, मानसिक शांतता. 

दुपारी १.४६ ते दुपारी २.५१ - शनी - लोखंड खरेदी, तेल, नोकर चाकर, कष्ट, मेहनत, त्याग.

दुपारी २.५१ ते दुपारी ३.५६ - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म.

दुपारी ३.५६ ते संध्याकाळी ५.०१ - मंगल - जमीन व्यवहार, शेती, क्रीडा, कोर्ट, वादविवाद, स्पर्धा, तंत्रज्ञान.

१ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

     तुमच्यावर रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. कल्पकता, चपळता, हुशारी हे गुण तुमच्यात उपजतच आहेत. तुम्ही निसर्गाशी सहज एकरूप होतात. जीवनाचा आनंद उपभोगतात. स्वभाव काहीसा शंकेखोर आहे. निर्णय घेण्यास उशीर लागतो. सामाजिक कामाची तुम्हाला आवड असली तरी जीवनात तुम्हाला एकटेपणा जाणवतो. तुम्ही एकनैसर्गिक कलाकार असून स्वभाव हरहुन्नरी आहे. तुम्हाला कोणत्याही विषयाचे चटकन आकलन होते. तुमचा इतरांवर चांगला प्रभाव पडतो. तुम्ही सभा गाजवू शकतात. तुम्हाला नातेवाईकांमुळे त्रास होऊ शकतो आणि एखाद्या आजारी माणसाची जबाबदारी तुमच्यावर पडते. तुम्ही सुखी, तेजस्वी , अहसवादी आणि ध्येयवादी आहात. तुमच्यात संशोधन करण्याची शक्ती आहे. तुमचा मानसशास्त्राचा अभ्यास चांगला असतो. गूढ गोष्टींची आवड असते. तुम्ही नेतृत्व करणारे आहेत मात्र कल्पनाविलासात रमणे तुम्हाला जास्त आवडते. कोणताही विषय ठराविक पद्धतीने हाताळणे तुम्हाला आवडते. शास्त्र, संशोधन, शोध प्रबंध यात तुम्हाला रस असतो. स्वतःचे निर्णय तुम्ही स्वतः आणि त तेही झटपट घेतात. विविध मैदानी खेळांची आवड असते. तुम्ही अत्यंत उतावीळ असतात. इतरांची सिक्रेटस तुम्ही जपून ठेवतात. त्याचा गैरवापर किंवा उच्चार करत नाहीत. तुम्ही यशस्वी, प्रामाणिक आहेत. मात्रतुम्हाला समजून घेणे इतरांना कठीण जाते. बोलण्यापेक्षा लेखनातून तुम्हीं अधिक चांगले व्यक्त होऊ शकतात. तुमच्या बुद्धिमत्तेमुळे आणि ज्ञानामुळे इतरांच्या मनात तुमच्याबद्दल आदराची भावना निर्माण होते. वडील, सासरे, बायको, आई इत्यादी नातेवाईकांच्या मुळे तुम्हाला आर्थिक फायदा होतो. वयाच्या 46 व्या वर्षापासून तुम्हाला यश मिळते. तुम्ही नोकरीत चांगल्या पदावर कार्यरत असतात आणि तुम्हाला धंद्यातही यश मिळते. तुम्ही प्रामाणिक आहात. स्वतःच्या विचारशक्तीमुळे आणि स्वभाव वैशिष्ट्यांमुळे तुम्हाला कीर्ती मिळते किंवा कधी कधी अपकर्ती देखील होऊ शकते. तुमचे आरोग्य चांगले असते आणि आजारपणातून तुम्ही लवकर बरे होतात. तुम्ही चाकोरीच्या बाहेर जाऊन इतरांना मदत करतात. मात्र तुम्हाला तसेच सहकार्य मिळेलच असे नाही. तुम्ही अत्यंत कल्पक, चपळ, उत्साही आणि कला प्रिय आहात. तुम्हाला निसर्गाची आवड आहे. जीवनातला आनंद तुम्ही उपभोगत असतात. तुमचा स्वभाव काहीसा संशयी आहे आणि निर्णय घेण्यास तुम्हाला वेळ लागतो. तुम्ही समाजाच्या सर्व थरामध्ये सहज मिसळू शकतात. अनेकदा तुम्हाला एकटेपणा जाणवतो. तुम्ही एक उत्तम कलाकार आहात. बऱ्याच विषयाचे तुम्हाला चटकन आकलन होते. तुम्ही बुद्धिमान आहात आणि सभा संमेलना तुम्ही गाजवू शकतात. तुमची इच्छा शक्ती जबरदस्त आहे. तुमच्यामध्ये नेतृत्व गुण आहेत.  तुम्ही आशावादी असतात. कधी कधी तुम्ही अधिक काटकसरी आणि व्यवहारिक होतात. दुराग्रही स्वभाव, इतरांवर टीका करणे आणि त्यांचे दोष दाखवणे तुम्ही टाळले पाहजे.

व्यवसाय:-   जाहिरात माध्यम, वृत्तपत्र, इंटरियर डेकोरेटर, चित्रपट निर्मिती, दिग्दर्शक, मॅनेजर, वेशभूषा सल्लागार, प्रोग्रॅम डायरेक्टर, कॅन्टीन, बँकिंग, सेल्स मॅनेजर, पुस्तक विक्रेता, आणि आयात निर्यात अधिकारी.

शुभ दिवस:- रविवार, सोमवार, मंगळवार.

शुभ रंग:- सोनेरी, पिवळा, जांभळा.

शुभ रत्न:- माणिक, पुष्कराज, अंबर.
 
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

आषाढ कृष्ण तृतीया. ग्रीष्म ऋतू.
पराभव नाम संवत्सर – शके १९४८ – संवत २०८२

 चंद्र – कुंभ राशीत
 नक्षत्र – शततारका / रात्री ८.४६ नंतर पू.भाद्रपदा

 राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
 (संपर्क – 8087520521)

 राहुकाळ – सकाळी ९.०० ते १०.३०

 आज सकाळी ११.०० पर्यंत चांगला दिवस आहे.

 ग्रहयोग – रवी षडाष्टक चंद्र

 विशेष: शनिवार – शनिदेवाचा दिवस. संयम, शिस्त आणि कर्तव्य यांना प्राधान्य द्या. सकाळी ११.०० पूर्वी महत्त्वाची कामे पूर्ण करणे लाभदायक ठरेल.

 मेष (Aries)
नवीन कामाची सुरुवात सकाळी करणे हितावह ठरेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. अनावश्यक वाद टाळा.
 उपाय: हनुमान चालीसाचे पठण करा.

 वृषभ (Taurus)
आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. नियोजनबद्ध कामातून लाभ मिळेल.
 उपाय: शनिदेवाला काळे तीळ अर्पण करा.

 मिथुन (Gemini)
संवादकौशल्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. प्रवासाचा योग संभवतो.
 उपाय: श्रीगणेशाला दूर्वा अर्पण करा.

 कर्क (Cancer)
घरातील वातावरण आनंददायी राहील. मालमत्तेसंबंधी कामात प्रगती होईल. मानसिक समाधान लाभेल.
 उपाय: भगवान शिवाचे नामस्मरण करा.

 सिंह (Leo)
भाग्याची साथ लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल.
 उपाय: सूर्याला अर्घ्य द्या.

 कन्या (Virgo)
कामात शिस्त आणि संयम ठेवा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक लाभाचे संकेत आहेत.
 उपाय: विष्णू सहस्रनामाचा जप करा.

 तुळ (Libra)
भागीदारीच्या कामात यश मिळेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. बोलण्याचा प्रभाव वाढेल.
 उपाय: महालक्ष्मीची उपासना करा.

 वृश्चिक (Scorpio)
अनावश्यक खर्च टाळा. गुप्त विषयांचा अभ्यास लाभदायक ठरेल. संयमाने घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील.
 उपाय: भगवान शिवाला जल अर्पण करा.

 धनु (Sagittarius)
मित्रांचे सहकार्य लाभेल. नवीन योजना यशस्वी ठरतील. आर्थिक लाभाचे संकेत आहेत.
 उपाय: गुरू मंत्राचा जप करा.

 मकर (Capricorn)
व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांची कृपा लाभेल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल.
 उपाय: शनिदेवाला तेल अर्पण करा.

 कुंभ (Aquarius)
राशीस्थानी चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. सकाळी ११.०० पर्यंत महत्त्वाची कामे पूर्ण करा. रवी-चंद्र षडाष्टक योगामुळे अहंकार आणि घाई टाळा.
 उपाय: गरजू व्यक्तींना अन्नदान करा.

 मीन (Pisces)
धार्मिक कार्यात मन रमणार आहे. भाग्याची साथ लाभेल. कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवाल.
 उपाय: भगवान विष्णूला तुळशीपत्र अर्पण करा.

– ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
 8087520521

संबंधित बातम्या