६ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर शुक्र ग्रहाचा प्रभाव आहे त्यामुळे तुम्ही स्वतः कलाकार असून कलाप्रिय आहात. तुमच्यामध्ये व्यापारी वृत्ती, अंतर्गत आवाजाची देणगी आणि व्यवहारिकता आहे. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे, मोहक आणि आकर्षक आहे. लोकांना तुमच्याबद्दल आकर्षण वाटते. रूढी आणि परंपरा याबद्दलच्या तुमच्या कल्पना समाजापेक्षा वेगळ्या असतात. तुम्हाला समजून घेणे इतरांना कठीण जाते. स्वतःचे निर्णय स्वतःच घेण्याकडे तुमचा कल असतो. तुमचे उद्दिष्ट काय आहे यावर लक्ष ठेवून ते साध्य करण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न करत असतात. तुमचे वक्तृत्व चांगले असते. जीवनात तुम्हाला मानसन्मान मिळतो. विविध समारंभांमध्ये भाग घेणे तुम्हाला आवडते. तुम्ही एक उत्तम सहकारी असतात. मित्रांना मदत करण्यात तुम्हाला सात्विक आनंद मिळतो. धर्म आणि तत्वज्ञाने या विषयांची आवड उत्पन्न होते. तुमचे आयुष्य आरामदायक आणि सुखलोलूप असते. तुम्ही उच्च प्रतीचे कपडे आणि दागिने वापरतात. स्वतःच्या प्रेमासंबंधींबाबत तुम्ही संशयी असतात. प्रेमात तुम्ही सावधपणे पावले टाकतात.
व्यवसाय:- बेकरी, हॉटेल, संगीतकार, जवाहर, आर्किटेक्ट, गृह सजावट, प्रयोगशाळा उपकरणे, मेडिकल स्टोअर्स, अकाउंट, पॅथॉलॉजी.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग:- निळा आणि गुलाबी.
शुभ रत्न:- पाचु, मोती, हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
मंगळवार, ६ ऑक्टोबर २०२६. भाद्रपद कृष्ण एकादशी. पराभव नाम संवत्सर, शके १९४८, वर्षा ऋतू. राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०.
आज चांगला दिवस आहे. चंद्र-गुरू युतीमुळे शुभ ग्रहमान राहील. मनातील इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल. नक्षत्र - आश्लेषा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - कर्क/ रात्री १०.१८ नंतर सिंह. आज चांगला दिवस आहे. *इंदिरा एकादशी,* एकादशी श्राद्ध.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आजचा दिवस अनुकूल आहे. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) महत्त्वाची कामे मार्गी लागतील. प्रवासाचे योग येतील. कुटुंबातील व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. एखादी चांगली बातमी मन प्रसन्न करेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) कामाचा ताण जाणवू शकतो. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. प्रिय व्यक्तीशी संवाद साधताना गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या.
कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) चंद्र आपल्या राशीत असून गुरूची युती लाभदायक ठरेल. आत्मविश्वास वाढेल. मान-सन्मान मिळतील. अपेक्षित कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) अचानक एखादी चांगली संधी मिळू शकते. नोकरी-व्यवसायात नवीन जबाबदारी मिळेल. महिलांकडून सहकार्य लाभेल. आर्थिक स्थिती सुधारेल.
कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) अडलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. आर्थिक बाबतीत दिवस चांगला आहे. मित्रांचे सहकार्य मिळेल. धार्मिक किंवा सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.
तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) नोकरी-व्यवसायात लाभदायक घडामोडी होतील. वरिष्ठांकडून कौतुक होईल. घरातील वातावरण आनंदी राहील. एखादी महत्त्वाची व्यक्ती भेटेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) भाग्यातील अडथळे दूर होतील. प्रवासाचे योग आहेत. आर्थिक लाभ मिळतील. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. मनासारखी बातमी समजेल.
धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आर्थिक व्यवहारात लाभ होईल. जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. स्थावर मालमत्तेच्या कामात प्रगती होईल.
मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. मेहनतीचे चांगले फळ मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. प्रिय व्यक्तीचे सहकार्य लाभेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) आज खर्चाचे प्रमाण वाढू शकते. घरगुती कामांमध्ये वेळ जाईल. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) दिवस उत्साहवर्धक आहे. मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. मित्रांकडून सहकार्य मिळेल. आर्थिक लाभासह नवीन संधी चालून येतील.
– ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.