असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य सोमवार, २० जुलै २०२६

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य सोमवार, २० जुलै २०२६
  • Positive News
  • जुलै 20 2026

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य सोमवार, २० जुलै २०२६
आषाढ शुक्ल सप्तमी. ग्रीष्म ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.

 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
 (संपर्क - 8087520521)

 राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००

 चंद्र नक्षत्र - हस्त / संध्याकाळी ७.१० नंतर चित्रा.
 आज जन्मलेल्या बाळाची राशी - कन्या.

"आज शुभ दिवस आहे."

 चंद्र त्रिकोण मंगळ.
 चंद्र केंद्र बुध.
 चंद्र प्रतियुती शनी.
 गुरू त्रिकोण नेपच्यून.

 टीप:- नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.

 मेष:-
कामात उत्साह आणि धाडस दिसून येईल. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीतही सकारात्मक घडामोडी होतील.

 वृषभ:-
कुटुंबीयांसोबत आनंददायी वेळ व्यतीत कराल. आर्थिक नियोजन यशस्वी ठरेल. स्थावर मालमत्तेच्या कामात प्रगती होईल. संयम आणि व्यवहारकुशलता लाभदायक ठरेल.

 मिथुन:-
बुधाच्या अनुकूल प्रभावामुळे संवादकौशल्य वाढेल. व्यावसायिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. लहान प्रवासाचा योग संभवतो.

 कर्क:-
आर्थिक लाभाचे संकेत आहेत. रखडलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबातील वातावरण समाधानकारक राहील. आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करू नका.

 सिंह:-
आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाच्या व्यक्तींची भेट होईल. नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती दिसून येईल. विद्यार्थ्यांसाठी दिवस लाभदायक आहे.

 कन्या:-
राशीस्थानी चंद्र असल्याने व्यक्तिमत्त्व खुलून दिसेल. नवीन योजना आखण्यासाठी आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस अनुकूल आहे. मान-सन्मान वाढेल.

 तुळ:-
खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. संयमाने वागल्यास अडचणी सहज दूर होतील. संध्याकाळनंतर परिस्थिती अधिक अनुकूल राहील.

 वृश्चिक:-
मित्र आणि सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य मिळेल. आर्थिक लाभाचे योग आहेत. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील.

 धनु:-
नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. समाजात मान-सन्मान वाढेल.

 मकर:-
भाग्याची साथ लाभेल. धार्मिक आणि शुभ कार्यात सहभाग घ्याल. प्रवासाचे योग संभवतात. नवीन संधींचा योग्य लाभ घ्या.

 कुंभ:-
संततीकडून आनंददायक बातमी मिळू शकते. सर्जनशील कामात यश मिळेल. प्रेमसंबंध आणि कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील.

 मीन:-
घरगुती वातावरण प्रसन्न राहील. मालमत्तेसंबंधी विषयात प्रगती होईल. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. मानसिक समाधान आणि स्थैर्य अनुभवता येईल.

 - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
 8087520521

संबंधित बातम्या