असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य सोमवार, १७ ऑगस्ट २०२६.

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य सोमवार, १७ ऑगस्ट २०२६.
  • Positive News
  • ऑगस्ट 17 2026

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य सोमवार, १७ ऑगस्ट २०२६.

*शुभ कालावधी*

सकाळी ८.२३ ते सकाळी ९.२७ - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म, नवीन व्यवसाय सुरुवात, शुभ कामे, घर खरेदी, धार्मिक विधी, तीर्थयात्रा.

सकाळी ९.२७ ते सकाळी १०.३२ - मंगल - जमीन व्यवहार, शेती, क्रीडा, कोर्ट, वादविवाद, स्पर्धा, तंत्रज्ञान, स्थावर मालमत्ता, ऑपरेशन्स, औषध योजना, रासायनिक पृथक्करण.

सकाळी १०.३२ ते सकाळी११.३६ - सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे, उच्च शिक्षण, सरकारी कामे, कायदा, व्यवस्थापन.

सकाळी ११.३६ ते दुपारी १२.४० - शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी, वाहन खरेदी, कपडे, आभूषणे, चैनीच्या वस्तू खरेदी, गृहसजावट, वास्तू, महागड्या वस्तूंची खरेदी, सहल. 

दुपारी १२.४० ते दुपारी १.४५ - बुध -  व्यापार, गणित, वाचन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिषी, मार्केटिंग, भाषण, दळणवळण, मोबाइल खरेदी, संगणक, ट्रान्सपोर्ट वाहन खरेदी, कायदा, वकिली, रसायने, विमा पोलिसी, इलेक्ट्रॉनिक्स, प्रसिद्धी, अँप्स बनवणे.  
 
दुपारी १.४५ ते दुपारी २.४९ - चंद्र -  चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, द्रव पदार्थ, श्री. महादेव उपासना, प्राणायाम, छंद, मानसिक शांतता, रत्ने खरेदी, संगीत,  प्रेम, नातेसंबंध.

दुपारी २.४९ ते दुपारी ३.५३ - शनी - लोखंड खरेदी, तेल, नोकर चाकर, कष्ट, मेहनत, त्याग, देणे फेडणे, पूर्वजांचे स्मरण, माघार घेणे, तह, शांतता करार, 

दुपारी ३.५३ ते दुपारी ४.५७ - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म, नवीन व्यवसाय सुरुवात, शुभ कामे, घर खरेदी, धार्मिक विधी, तीर्थयात्रा.

-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

ऑगस्ट २०२६ महिन्यातील मुहूर्त

साखरपुडा - ३,४,५,८,९,१३,१५,१६,१८,२०,२२,२३.

डोहाळजेवण - १६,१७,२०,२३,२६

बारसे - १,३,५,१५,१६,३०

जावळ - ५,९,२६,२७,२८.  

गृहप्रवेश - ३,५,९,१५,१७,२०,२३,२८,३०

१७ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

     तुमच्यावर रवी आणि शनी या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचे विचार विधायक आणि क्रियाशील असतात. हिप्नॉटिझम, गूढ विद्या यांची तुम्हाला आवड असते. तुम्ही धाडसी, प्रभावी आणि बुद्धिमान आहात. संशोधन, ज्ञान याबद्दल तुम्हाला आवड आहे. तुम्हाला शास्त्रीय संगीताची आवड असते. उथळ संगीतापेक्षा गंभीर संगीत तुम्हाला आवडते. तुम्ही कडक शिस्तीचे भोक्ते आहात आणि कर्तबगार आहात. तुम्हाला शांतता आणि एकांत आवडतो. निसर्ग, फुले, रम्य देखावा, याची तुम्हाला ओढ असते. तुम्ही कधी कधी अति निराशावादी होतात. समाजापासून दूर राहणे पसंत करतात. भविष्याबद्दल तुम्हाला नेहमीच काळजी वाटत असते. तुम्ही अत्यंत धोरणी, हुशार आणि मुत्सद्दी आहात. तसेच महत्त्वाकांक्षी आणि दिर्घउद्योगी देखील आहात मात्र अति महत्त्वाकांक्षा असता कामा नये. तुम्हाला जी गोष्ट हवी असते त्यासाठी तुम्ही प्रचंड मेहनत घेतात. तुमच्यामध्ये चिवटपणा आहे मात्र त्याचबरोबर संशय वृत्ती देखील असते. तुम्ही अधिकार गाजवणारे आहात. अनेकदा तुमच्याबद्दल गैरसमज करून घेतला जातो. तुम्हाला दुर्बल लोकांबद्दल आपुलकी असते. तुम्ही न्याय प्रेमी आणि कायदा प्रेमी आहात मात्र तुम्हाला आयुष्यामध्ये सतत अडचणी आणि विलंब यांचा अनुभव येतो. आपण इतरांवर अधिकार गाजवावा किंवा आपल्याला मानसन्मान मिळावेत असे तुम्हाला मनातून नेहमी वाटत असते. इतरांकडून काम करून घेण्यात तुम्हाला अडचण येतात. जीवनामध्ये खिन्नता येते. तुम्ही निराश विचारांपासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. तुम्ही गर्विष्ठपणा आणि अहंकार टाळला पाहिजे. 

व्यवसाय:-  भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, उच्च गणित, कोळसा, लाकूड, लोखंड, व्यवस्थापक, कंपनी सेक्रेटरी.

शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शनिवार.

शुभ रंग:- निळा, जांभळा, काळा.

शुभ रत्न:- इंद्रनील, मोती आणि हिरा.
 
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*

*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

सोमवार, १७ ऑगस्ट २०२६

श्रावण शुक्ल पंचमी / संध्याकाळी ५.०१ नंतर षष्ठी. श्रावण ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.

राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
(संपर्क - 8087520521)

राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००

चंद्र नक्षत्र - चित्रा.
चंद्र राशी - कन्या / दुपारी ४.२० नंतर तुळ.

आजचा दिवस उत्तम आहे. आज नागपंचमी असल्याने नागदेवतेची पूजा, धार्मिक कार्य आणि आध्यात्मिक साधनेसाठी दिवस विशेष अनुकूल आहे.

रवी लाभ चंद्र.
मंगल केंद्र नेपच्यून.
बुध त्रिकोण शनी.
शुक्र लाभ गुरू.

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-
कामाच्या ठिकाणी प्रगतीच्या संधी मिळतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन संपर्क भविष्यासाठी फायदेशीर ठरतील.

वृषभ:-
व्यवसायात चांगली संधी मिळेल. भाग्याची साथ लाभेल. प्रवासातून लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

मिथुन:-
आर्थिक व्यवहारात लाभ होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील. वरिष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. नियोजनबद्ध काम केल्यास यश निश्चित मिळेल.

कर्क:-
कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक स्थिती सुधारेल. नवीन जबाबदारी मिळू शकते. महत्त्वाचे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या.

सिंह:-
नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक लाभाचे योग आहेत. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे.

कन्या:-
राशीस्थानी चंद्रामुळे आत्मविश्वास वाढेल. कामात उत्साह राहील. आर्थिक नियोजनातून फायदा होईल. महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.

तुळ:-
दुपारनंतर राशीस्थानी चंद्रामुळे मनोबल वाढेल. नवीन संधी मिळतील. प्रवास आणि संपर्कातून लाभ होईल. जोडीदाराचे सहकार्य लाभदायक ठरेल.

वृश्चिक:-
कामाचा ताण जाणवू शकतो, मात्र प्रयत्नांचे चांगले फळ मिळेल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी ठेवा. वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

धनु:-
मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक लाभाचे योग आहेत. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.

मकर:-
नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. मेहनतीला योग्य फळ मिळेल.

कुंभ:-
विद्यार्थ्यांसाठी दिवस विशेष अनुकूल आहे. सर्जनशील कार्यात यश मिळेल. संततीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. नवीन योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी योग्य दिवस आहे.

मीन:-
घरगुती वातावरण आनंददायी राहील. स्थावर मालमत्तेशी संबंधित कामात प्रगती होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल.

- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
  8087520521

संबंधित बातम्या