असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य शुक्रवार, १६ जानेवारी २०२६

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य शुक्रवार, १६ जानेवारी २०२६
  • Positive News
  • जानेवारी 16 2026

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य शुक्रवार, १६ जानेवारी २०२६
पौष कृष्ण त्रयोदशी
वर्ज्य दिवस. प्रदोष व्रत
विश्वावसुनाम संवत्सर
शके १९४७, संवत २०८२

राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
(संपर्क – 8087520521)

राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००

नक्षत्र – मूळ
आज जन्मलेल्या बाळाची राशी – धनु. (ध्रुव योग, मूळ नक्षत्र शांती, नक्षत्र गंडांत)

“आज वर्ज्य दिवस असला तरी संध्याकाळनंतर वातावरण हळूहळू अनुकूल होईल”

 ग्रहयोग 

चंद्र केंद्र शनी –
कर्तव्यभावना, जबाबदाऱ्या वाढतील. संयम, शिस्त आणि चिकाटी आवश्यक. कामात विलंब जाणवू शकतो.

चंद्र केंद्र नेपच्यून –
कल्पनाशक्ती, अंतर्मुखता वाढेल. गैरसमज, भ्रम किंवा संभ्रम टाळण्यासाठी वास्तववादी विचार गरजेचा.

 मेष :- (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)

कामात अडथळे येऊ शकतात. संयम ठेवल्यास मार्ग सापडेल. संध्याकाळनंतर मनोबल वाढेल.

 वृषभ :- (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)

आर्थिक व्यवहारात सावधगिरी आवश्यक. भावनिक निर्णय टाळा. प्रदोष पूजन लाभदायक.

 मिथुन :- (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)

विचारात गोंधळ संभवतो. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. संध्याकाळी सकारात्मकता वाढेल.

 कर्क :- (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)

घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. मनावर ताण येऊ शकतो. ध्यान-प्रार्थना उपयोगी ठरेल.

 सिंह :- (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)

नेतृत्वगुण असूनही मर्यादा पाळा. वरिष्ठांशी मतभेद टाळा. संयम ठेवल्यास मान-सन्मान मिळेल.

 कन्या :- (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)

कामात शिस्त लागेल. चंद्र-शनी योगामुळे थकवा जाणवेल. आरोग्याकडे लक्ष द्या.

 तुळ :- (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)

नातेसंबंधात गैरसमज संभवतात. स्पष्ट संवाद ठेवा. संध्याकाळी परिस्थिती सुधारेल.

 वृश्चिक :- (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)

गुप्त चिंता सतावतील. आर्थिक व्यवहार जपून करा. प्रदोष व्रत मानसिक स्थैर्य देईल.

 धनु :- (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)

चंद्रराशी धनु असल्याने मन अस्थिर राहील. निर्णय पुढे ढकला. आत्मपरीक्षणास योग्य दिवस.

 मकर :- (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)

जबाबदाऱ्या वाढतील पण कामात स्थैर्य राहील. संध्याकाळी समाधान मिळेल.

 कुंभ :- (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)

कल्पनाशक्ती वाढेल पण व्यवहारात सावध रहा. मित्रांकडून मदत मिळेल.

 मीन :- (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)

भावनिकता वाढेल. भ्रम टाळा. ध्यान, जप, प्रदोष पूजन लाभदायक ठरेल.

टीप : नावावरून राशी ठरतेच असे नाही. अचूक मार्गदर्शनासाठी कुंडली पाहणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” फेसबुक पेजला भेट द्या.

— ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
 8087520521

व्यवसाय, विवाह, जोडीदार, स्वभाव, भाग्योदय, आरोग्य, शुभ रत्ने, शक्तीस्थाने व कुंडली परीक्षणासाठी संपर्क करा.

संबंधित बातम्या