मेष
आज चंद्राचा बुध आणि शुक्राशी शुभ योग आहे. अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. स्वप्नपूर्ती करणारे ग्रहमान आहे. वेळ न दवडता आज कामे पूर्ण करा. कोर्टात यश आणि भौतिक सुखांची रेलचेल असणार आहे.
वृषभ
आज महिलांकडून लाभ मिळतील. कामा निमित्त भ्रमंती घडेल. गृह सजावट साठी वेळ द्यावा लागेल. वकील आणि प्राध्यापक याना विशेष लाभ होतील.
मिथुन
आज प्रणय रम्य दिवस आहे. सप्तम स्थानी चंद्र आहे. जोडीदारासाठी वेळ द्यावा लागेल. विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल. छोटी सहल घडेल.
कर्क
व्यवसाय वाढीसाठी उपयुक्त ग्रहमान आहे. कामाचा ताण वाढेल. मात्र आज भरपूर लाभ होणार आहेत. अचानक धनालभचे योग आहेत. महिलांकडून देखील लाभ संभवतात.
सिंह
आज प्रेमात यश मिळण्याचा दिवस आहे. आवडत्या व्यक्तीसाठी वेळ द्याल. अपेक्षित प्रतिसाद मिळेल. जोडीदार खुश राहील. शत्रू माघार घेतील.
कन्या
चतुर्थ चंद्र आहे. आज मोठे यश मिळणार आहे. व्यवसाय वाढीसाठी चांगला कालावधी आहे. दूरचे प्रवास घडतील.
तुळ
उद्योग/व्यवसाय वाढीसाठी उत्तम दिवस आहे. प्रेमात यश मिळेल. विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल. छोटी सहल घडेल.
वृश्चिक
गृह सजावट करणयासाठी उत्तम दिवस आहे. नवीन खरेदी होईल. सामाजिक कार्य घडेल. नावलौकिक वाढेल. कामात बदल होईल.
धनु
आज तमच्याच राशीत चंद्र आहे. मन आनंदी असणार आहे. तृतीय स्थानी बुध आणि शुक्र आहेत. लेखकांना उत्तम यश मिळेल. व्यवसाय वाढेल. आर्थिक लाभ होतील.
मकर
व्यय स्थानी चंद्र आहे. आवडत्या व्यक्तीसाठी खर्च कराल. आज मौल्यवान खरेदी होईल. नातातून लाभ होतील. वक्तृत्व चमकले. विशेषतः वकिलांना चांगला दिवस आहे.
कुंभ
आज अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. चंद्र लाभ स्थानी आहे. बुधा आणि शुक्र प्रसन्न आहेत. आनंदाची लयलूट कराल. मन उत्साही राहील. प्रेमात यश मिळेल.
मीन
आवडत्या व्यक्तीसाठी वेळ द्याल. कामाचा ताण वाढणार आहे. अनुकूल शुक्र तुम्हाला भौतिक सुखे प्रदान करेन. प्रवासातून देखील लाभ होतील.
-ज्योतिषाचार्य मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.