असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य शुक्रवार, १० जुलै २०२६

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य शुक्रवार, १० जुलै २०२६
  • Positive News
  • जुलै 10 2026

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य शुक्रवार, १० जुलै २०२६
निज ज्येष्ठ कृष्ण दशमी / सकाळी ८.१७ नंतर एकादशी. ग्रीष्म ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.

 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
 (संपर्क - 8087520521)

 राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००

 चंद्रनक्षत्र - भरणी / (दुपारी १.१५ नंतर) कृतिका.
 आज जन्मलेल्या बाळाची राशी - मेष / संध्याकाळी ६.४५ नंतर वृषभ.

 रवी लाभ चंद्र.
 चंद्र लाभ बुध.

 टीप:
नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.

 मेष:- (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
आत्मविश्वास वाढेल. दुपारपर्यंत महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. संध्याकाळनंतर अधिक अनुकूलता मिळेल.

 वृषभ:- (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
संध्याकाळनंतर चंद्र राशीत प्रवेश करणार असल्याने उत्साह वाढेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी वेळ अनुकूल राहील. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल.

 मिथुन:- (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
खर्चावर नियंत्रण ठेवा. रवी-चंद्र योगामुळे वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. गुप्त योजना यशस्वी होतील.

 कर्क:- (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
मित्रांचे सहकार्य लाभेल. नवीन ओळखी भविष्यात उपयोगी ठरतील. आर्थिक लाभाची संधी मिळेल.

 सिंह:- (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
व्यवसाय व नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे कौतुक होईल. प्रतिष्ठा वाढेल.

 कन्या:- (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
भाग्याची उत्तम साथ मिळेल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. प्रवास लाभदायक ठरेल.

 तुळ:- (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
अनावश्यक खर्च टाळा. आरोग्याकडे लक्ष द्या. संयमाने निर्णय घेतल्यास अडचणी दूर होतील.

 वृश्चिक:- (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
भागीदारीच्या कामात यश मिळेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या चर्चा फलदायी ठरतील.

 धनु:- (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
कामाचा ताण वाढेल, पण बुधाच्या शुभ प्रभावामुळे योग्य नियोजनातून यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.

 मकर:- (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
विद्यार्थी, शिक्षक आणि सर्जनशील क्षेत्रातील व्यक्तींना लाभदायक दिवस. संततीकडून आनंददायक बातमी मिळेल.

 कुंभ:- (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
घरगुती वातावरण आनंदी राहील. मालमत्तेसंबंधी कामात प्रगती होईल. कुटुंबीयांबरोबर वेळ आनंदात जाईल.

 मीन:- (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
पराक्रम वाढेल. संवादकौशल्यामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील. लहान प्रवासाचे योग संभवतात.

कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
 8087520521

संबंधित बातम्या