राहुकाळ: संध्याकाळी ४.३० ते ६.००
दिशाशूल: उत्तर दिशा
मेष:
आजचा दिवस उत्साहवर्धक आहे. नव्या कल्पना सुचतील आणि त्यांचा उपयोग केल्यास यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रवास योग आहे.
शुभ रंग: लाल
शुभ अंक: १
वृषभ:
आर्थिक निर्णय घेताना संयम बाळगा. कुटुंबातील वडिलधाऱ्यांचा सल्ला घ्या. आरोग्याकडे लक्ष द्या. संध्याकाळी मन प्रसन्न होईल.
शुभ रंग: पांढरा
शुभ अंक: ६
मिथुन:
नवीन ओळखी उपयुक्त ठरतील. शिक्षण आणि नोकरीत प्रगतीचा मार्ग खुलेल. संवादातून तणाव मिटवता येईल.
शुभ रंग: हिरवा
शुभ अंक: ५
कर्क:
घरगुती कामांमध्ये व्यस्तता राहील. एखादी शुभ वार्ता मिळू शकते. पैशाचे नियोजन उत्तम करा. मित्रांचा पाठिंबा लाभेल.
शुभ रंग: चंदेरी
शुभ अंक: २
सिंह:
कामात धैर्य आणि आत्मविश्वास ठेवा. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. समाजात प्रतिष्ठा वाढेल. संध्याकाळी धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
शुभ रंग: सोनेरी
शुभ अंक: ३
कन्या:
दिवस सामान्य आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत मतभेद टाळा. परिश्रमाचे फळ लवकरच मिळेल.
शुभ रंग: निळसर
शुभ अंक: ७
तुळ:
कलात्मक क्षेत्रात यश मिळेल. नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. सामाजिक कार्यक्रमात सहभाग लाभदायक ठरेल.
शुभ रंग: गुलाबी
शुभ अंक: ४
वृश्चिक:
आज काही कठीण निर्णय घ्यावे लागतील, पण त्याचा फायदा पुढे होईल. प्रवास यशस्वी होईल. गुप्त शत्रूपासून सावध राहा.
शुभ रंग: जांभळा
शुभ अंक: ८
धनु:
धार्मिक व आध्यात्मिक प्रवृत्ती वाढेल. विद्यार्थ्यांना एकाग्रतेचा फायदा होईल. जुने अडथळे दूर होतील.
शुभ रंग: पिवळा
शुभ अंक: ९
मकर:
नोकरीत बदलाचे संकेत. मेहनतीमुळे वरिष्ठांचे मन जिंकाल. आर्थिक लाभ होईल. आरोग्य सुधारेल.
शुभ रंग: करडा
शुभ अंक: ५
कुंभ:
मित्रांसोबत वेळ छान जाईल. व्यवसायात वाढीची शक्यता. निर्णय घेताना भावनांपेक्षा व्यवहारिकता ठेवा.
शुभ रंग: आकाशी
शुभ अंक: २
मीन:
नवीन कामाची सुरुवात होईल. घरात आनंदाचे वातावरण. मनातील गोंधळ दूर होईल. प्रवास शुभ.
शुभ रंग: केशरी
शुभ अंक: ६
१२ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर शुक्र आणि गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा ओढा सुखासीन जीवनाकडे असतो. तुम्हाला आयुष्यात सहजपणे मान- सन्मान मिळतात. इतरांकरिता तुम्ही स्वार्थत्याग करतात मात्र त्यातून तुम्हाला अपेक्षाभंग मिळतो. तुमच्याशब्दात आणि कृतीत ठामपणा असतो. वायफळ बडबड तुम्हाला आवडत नाही. विवाहानंतर भाग्योदय होतो. तुम्ही अत्यंत महत्त्वाकांक्षी असून मान सन्मान आणि प्रतिष्ठा तुम्हाला प्रिय आहे. तुमचा आत्मविश्वास दांडगा आहे. धर्माचा तुम्ही डोळसपणे अभ्यास करतात. तुम्ही न्यायप्रेमी आणि इतरांच्या साठी कष्ट घेणारे आहात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. तुमच्यात रुबाबदारपणा, काटेकोरपणे आणि व्यवस्थितपणा आहे. दुर्बल लोकांना तुम्ही नेहमीच मदत करतात. तुमच्यामध्ये अनेक कौशल्य आहेत. क्रीडा प्रकारांची तुम्हाला आवड आहे. हाती घेतलेल्या कार्यासाठी तुम्ही उत्तम पूर्वनियोजन करतात. तुमचा दृष्टिकोन विशाल आहे आणि जीवनाकडे तुम्ही आशादायकपणे बघतात. स्वतःच्या प्रेमसंबंधांंबाबत तुम्ही आशादायी आणि संयमी असतात. प्रेमात तुम्ही सावधपणे पाऊल टाकतात. तुम्ही एक उत्तम सल्लागार असून आयुष्यात येणाऱ्या समस्यांवर तुम्ही यशस्वीपणे मार्ग काढू शकतात. वयाच्या ३९ नन्तर आयुष्यात स्थैर्य येते. अनाठायी काळजी करण्याचा स्वभाव असतो. त्यामुळे मन दुःखी कष्टी असते.
व्यवसाय:- राजकीय क्षेत्र, मंत्री, न्यायाधीश, सचिव, शैक्षणिक क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र.
शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग:- पिवळा, जांभळा, हिरवा.
शुभ रत्न:- पुष्कराज, अमेठीस्ट, लसण्या.
कुंडली परीक्षणासाठी संपर्क – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521