असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य २३ जून

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य २३ जून
  • Positive News
  • जून 23 2025

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य २३ जून

आजचे राशिभविष्य आणि शेवटी आज जन्मलेल्या आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांची वैशिष्टये:-  

सोमवार, २३ जून २०२५., वर्षा ऋतू. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. दक्षिणायन. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.०० 

"आज वर्ज्य दिवस आहे. सोमप्रदोष शिवरात्री. 

चंद्रनक्षत्र - कृतिका(सूर्य)/(दुपारी ३.१७ नंतर) रोहिणी (चंद्र). आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृषभ.

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.

आज वृषभ राशीच्या लोकांना शॉर्ट टर्म शेअर्स मध्ये तर धनु आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना लॉंग टर्म शेअर्स मध्ये लाभ होतील. मेष राशीच्या व्यक्तींनी आज शेअर्स मध्ये जपून व्यवहार करावेत.
  
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा शनी, नेपच्यूनशी लाभ योग आहे. हर्षलशी युती आहे. विपुल धन धान्य होईल. सौख्य लाभेल. कर्तृत्व दाखवाल. न्याय होईल. 
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) तुमच्याच राशीत चंद्र आहे. शनी अनुकूल आहे. अंतःकरण शुद्ध होईल. शत्रूवर विजय मिळेल. सन्मान प्राप्त होतील. धार्मिक कार्यात भाग घ्याल. विचार पूर्वक कामे कराल.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) व्यय स्थानी चंद्र आहे. तरीही काही सुखद अनुभव येतील. आवडत्या वस्तूची खरेदी होईल. कामाच्या ठिकाणी अचानक लाभ होतील. तुमच्या बद्दल समाजात आदर निर्माण होईल. 

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल दिवस आहे. वेळ दवडू नका. अचानक लाभ होतील. वाहन सुख लाभेल. इतर मार्गाने पैसे मिळतील. जलप्रवास टाळावा. महिला नातेवाईकांचा गैरसमज होऊ शकतो.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस आहे. उत्तम प्रगती होईल. वरिष्ठ खुश होतील. सत्संग लाभेल. दुष्ट व्यक्तींचा सांग टाळावा. सहनशक्ती वाढेल.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) कुलदेवतेची कृपा राहील. भरघोस यश मिळेल. व्यापार वाढेल. प्रवास घडतील. काबाडकष्ट कराल. मोठ्या व्यक्तींशी परिचय होईल. 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र दिवस आहे. षष्ठ स्थानी शनी आहे. आर्थिक लाभ होतील. खर्च सुद्धा वाढेल. सुंदर काव्यकल्पना सुचतील. कनिष्ठ सहकारी खुश राहतील. 
   
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) दबदबा वाढेल. सामाजिक कार्य कराल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. धर्मशील आचरण राहील. चपळता वाढेल. सार्वजनिक संस्थेशी संबंध येईल.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. आर्थिक यश मिळेल. इतिहासाबद्दल आस्था निर्माण होईल. एकांतवास हवासा आज वाटेल. गृह सजावट कराल. येणी वसूल होतील.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) राजकीय प्रांतात उत्तम यश लाभेल.  विक्री क्षेत्रात प्रगती कराल. गुंतवणुकीतून उत्तम लाभ होतील. अकल्पित भाग्योदय होईल. गृहसौख्य लाभेल. संतती कडून आनंदाची बातमी समजेल. 
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) चतुर्थ स्थानी चंद्र आहे. वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील. आज तुम्ही कमी बोलाल मात्र बोलणे मुद्देसूद असेल. वडिलोपार्जित इस्टेटीचा प्रश्न मार्गी लागेल. सामाजिक कार्यातून नावलौकिक मिळेल. 
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) व्यवसायिक प्रगती होईल. शत्रू पराभूत होतील. उच्च स्थान प्राप्त होईल मात्र आज जरा आळशीपणा जाणवेल. 

२३ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
     तुमच्यावर बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही बुद्धिमान, चिकित्सक आणि संशोधन करणारे आहात. तुम्ही महत्वाकांक्षी असून कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास करण्याची वृत्ती असते. तुम्ही शांतताप्रिय आहात. सभोवती चांगले मित्र असणे आवश्यक आहे. तुम्ही एकचवेळी व्यावहारिक आणि आध्यत्मिक असतात. संगीत, वाङ्मय आणि प्रवास यांची आवड असते. वरिष्ठ तुमच्यावर खुश असतात. वक्तृत्व चांगले असते. त्याचा योग्य वापर करा. मोठेपणा आणि मान सन्मान यास अवास्तव महत्व देऊ नका. तुम्ही इतरांची झटकन परीक्षा करू शकतात. भिन्न लिंगी व्यक्तींमध्ये अधिक लोकप्रिय असतात. तुमच्यात व्यापारी वृत्ती असून तुम्ही झटपट निर्णय घेतात. तुमच्यामध्ये धूर्तपणा देखील आहे. अंतर्गत आवाजाची तुम्हाला देणगी आहे. आणि त्याचा तुम्ही व्यवहारात वापर करतात. तुम्ही मनाने उदार आहात. इतरांचा सन्मान करतात. तुम्ही कलाप्रिय आहात. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. स्वतःचे विचार तुम्ही इतरांना समजून सांगू शकतात. आपलं उद्दिष्ट काय आहे ते तुम्हाला पक्कं माहीत असतं. तुम्ही उच्च दर्जाच्या वस्तू वापरतात. यात वाहन, दागिने, सुगंधी द्रव्य यांचा समावेश आहे. तुम्हाला समाजात मिसळणे आवडते. तुम्ही विविध समारंभांमध्ये हौसेने भाग घेतात. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन विशाल आहे. 

व्यवसाय:-  बँकिंग, मेडिकल, प्रयोगशाळा उपकरणे, पॅथॉलॉजी, स्टॅटिस्टिक्स, क्रीडा, वकील, शाब्दिक खल करणाऱ्या व्यवसाय, कारखाना, गृह सजावट, इस्टेट ब्रोकर.

शुभ दिवस:- बुधवार, शुक्रवार, शनिवार.

शुभ रंग:- हिरवा, पांढरा.

शुभ रत्न:- पाचू, हिरा.
 
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
 

संबंधित बातम्या