असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य ११ जून

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य ११ जून
  • Positive News
  • जून 11 2025

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य ११ जून
आज जन्मलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये आणि शेवटी आजचे राशिभविष्य:-

११ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

     तुमच्यावर चंद्र, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. जीवनाविषयी तुमचा भावनिक दृष्टीकोन असतो. तुम्ही संवेदनशील आहात. तुम्हाला लोट्रो/कोडे सोडवणे यांचा नाद बसतो. तुम्ही कष्टळू, शांत आहात मात्र तडजोड करत नाहीत. भाषणे, लेखन, सूत्रसंचालन यात तुम्हाला रस असतो. तुम्ही प्रगल्भ आहात. तुमचा स्वभाव स्वप्नाळू आहे. तुमच्याकडे दिलेले काम तुम्ही प्रयत्नपूर्वक पूर्ण करतात. तुमचे स्वतंत्र विचार असले तरी इतरांचा तुम्ही सन्मान करतात. मान-मरातब, कौतुक, प्रतिष्ठा याची तुम्हाला मनातून आवड आहे. तुम्ही लोकांमध्ये मिसळतात. नवनवीन गोष्टी विकत घेणे, नवीन काहीतरी करून पाहणे तसेच प्रवास यांचे तुम्हाला आवड आहे. तुम्ही बुद्धिमान आहात आणि लोकप्रिय आहात. इतरांना तुमचा सहवास आवडतो. इतरांच्या सुखदुःखाचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात. चांगले काय आणि वाईट काय याची तुम्हाला जाणा आहे. तुम्ही मोठमोठाले प्रकल्प प्रत्यक्षात आणू शकतात. स्वतःच्या कामात व्यस्त असणे तुम्हाला आवडते. तुम्ही नम्र आहात. आणि कायदा प्रेमी आहात. तुमच्या पेक्षा वयाने मोठ्या व्यक्तीकडे आकर्षित होतात. तुमची अनाठायी काळजी करणे सोडले पाहिजे.

व्यवसाय:-  लेखक, वक्ता, राजकीय क्षेत्र, डॉक्टर, केमिस्ट, बँकिंग, वकील, अकाउंट्स, मॉल, चार्टर्ड अकाउंटंट.

शुभ दिवस:- सोमवार, गुरुवार, शुक्रवार.

शुभ रंग:- पांढरा, निळा, जांभळा, पिवळा.

शुभ रत्न:- मोती, हिरा.
 
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या

कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

बुधवार, ११ जून २०२५. ज्येष्ठ पौर्णिमा/ प्रतिपदा. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. ग्रीष्म ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ - दुपारी १२.० ते दुपारी १.३० (भारतीय प्रमाण वेळेनुसार)

"आज वर्ज्य दिवस आहे"  

चंद्र नक्षत्र - ज्येष्ठा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृश्चिक/धनु.

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या  फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा रवीशी प्रतियोग आहे. मानापमानाचे प्रसंग येतील. सरकारी कामात दिरंगाई नको. शेअर्स मध्ये लाभ होतील. सावधपणे वाटचाल करा.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) प्रतिस्पर्धी व्यक्तींचा त्रास जाणवेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. सामाजिक कार्यातून नावलौकिक वाढेल.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक आवक चांगली होईल. मान सन्मान मिळतील. प्रतिष्ठा वाढेल. आरोग्य सांभाळा. नात्यातून लाभ होतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कठोर बोलणे होईल, मात्र काही ठिकाणी ते आवश्यक असते. काही सुखद अनुभव येतील. सरकारी कामे मार्गी लागतील. कुलदेवतेची उपासना लाभदायक ठरेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) तणाव कमी होतील. अडचणी दूर होतील. घरात राहवेसे वाटेल मात्र कामानिमित्त बाहेर जावे लागेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल.
   
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम आर्थिक लाभ होतील. बौद्धिक क्षेत्रात मोलाची भर घालाल. पित्याकडून लाभ होतील. 
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)  संमिश्र दिवस आहे. प्रवासातून लाभ होतील. संगणक क्षेत्रातील व्यक्तींना अनुकूल ग्रहमान आहे. प्रशासकीय कामे रेंगाळतील.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) तुमच्याच राशीत चंद्र आहे. मनाची स्थिरता वाढेल. दूरचे प्रवास संभवतात. आत्मविश्वास वाढेल. स्पर्धा वाढेल. 

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. भागीदारीत यश मिळेल. अचानक लाभ होतील. मात्र हाडाचे विकार होऊ शकतात.  
    
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल चंद्र आहे. आज कामे पूर्ण करवून घ्या. जोडीदाराचा सल्ला अचूक ठरेल. नम्र रहा. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) नोकरी/ व्यवसायासाठी चांगला दिवस आहे. मागणी वाढेल. घरगुती कामांमध्ये वेळ द्यावा लागेल. घरूनच व्यवसायीक कामे पूर्ण होतील. संध्याकाळ वादात विजय मिळवून देणारी.
  
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल ग्रहमान आहे. व्यावसायिक लाभ मिळतील. छोटे प्रवास घडतील. कामाचा वेग वाढेल. 

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)
 

संबंधित बातम्या