असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य ९ जुलै
आजचे राशिभविष्य आणि आज जन्मलेल्या तसेच आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांची वैशिष्टये:-
बुधवार, ९ जुलै २०२५. आषाढ शुक्ल चतुर्दशी विश्ववसूनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
"आज आनंदी दिवस आहे"
नक्षत्र - मूळ. आज जन्मलेल्या बाळाची राशी - धनु. (नक्षत्र गंडांत, विषपुत्र योग)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा गुरुशी प्रतियोग तर शनी आणि नेपच्यूनशी केंद्र योग आहे. सांभाळून पावले टाका. मोठे करार आज नकोत. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. तीर्थयात्रा घडेल. आध्यत्मिक उन्नतीसाठी चांगला कालावधी आहे. परदेशात जाऊ इच्छिणार्यांनी योग्य सल्ला घ्यावा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. आनंद आणि समाधान लाभेल. जुन्या आठवणीत रममाण व्हाल. कर्जे सहज मिळू शकतील मात्र फेडताना त्रास होऊ शकतो. आर्थिक चिंता सतावेल. सामाजिक कार्य करताना काळजी घ्या.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सप्तम स्थानी चंद्र आहे. आर्थिक लाभ होतील. मौल्यवान वस्तू खरेदी होईल. मन आनंदी राहील. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल. अधिक कष्ट करावे लागतील. पाणथळ जागेजवळ काळजी घ्या.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) धाडसी निर्णय घ्याल. आर्थिक लाभ वाढतील. व्यापारात माफक यश मिळेल. आरोग्य सांभाळावे लागेल. दानधर्म कराल. घरातील ज्येष्ठ व्यक्तीची काळजी वाटेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आज संमिश्र दिवस आहे. भेटवस्तू मिळतील. आनंद देणाऱ्या बातम्या समजतील. आज केलेली उपासना फलदायी ठरेल. पूर्व कर्माचे फळ मिळेल. नदी पार करताना काळजी घ्या.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक दृष्टीने चांगला दिवस आहे. काही सुखद अनुभव येतील. नवीन खरेदी होईल. गृहसौख्य लाभेल. नोकरीच्या ठिकाणी कितीही काम केले तरी वरिष्ठ खुश होणार नाहीत. नकोशा ठिकाणी बदली होऊ शकते.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) व्यवसाय वाढीसाठी चांगला कालावधी आहे. कर्ज मंजूर होईल. आध्यत्मिक लाभ होतील. महिलांनी विशेष काळजी घ्यावी. संसर्गजन्य रोगाची शक्यता आहे. श्री. महालक्ष्मीची पूजा करावी.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) धन संपत्ती वाढेल. मोठी कामे पूर्ण होतील. मात्र शेअर्स मध्ये अंदाज चुकतील. रवी आणि गुरुची नाराजी आहे. विचारपूर्वक पावले उचलावीत. गुप्त माहिती उजेडात येऊ शकते.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आज तूमच्याच राशीत चंद्र आहे. मन प्रसन्न राहील कुलदेवतेची कृपा राहील. अडचणी दूर होतील. व्यापार वाढेल. मात्र अपेक्षित लाभ मिळणार नाहीत. पाण्यातील वनस्पतींपासून काळजी घ्यावी.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. आज फारशी अपेक्षा ठेवू नका. विनाकारण खर्च वाढेल. कनिष्ठ सहकार्याकडून सहकार्य मिळणार नाही. हातून उग्रकार्य घडू देऊ नका.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) चंद्र अनुकूल आहे. मात्र तरीही आजचा दिवस फारसा आशादायी नाही. काही उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. संतती बाबत अप्रिय बातमी समजू शकते. शेअर्स मध्ये नुकसान होऊ शकते. आज मौल्यवान खरेदी टाळा. उधारी करू नका.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) दहावा चंद्र काही सुखद घटना अनुभवास देईन. आर्थिक बळ वाढेल. आध्यत्मिक लाभ होतील. केंद्र स्थानी गुरू आहे. सुखात कमतरता जाणवेल. व्यसने कटाक्षाने टाळा. कोणतेही अनुचित काम हातून घडणार नाही याची काळजी घ्या.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.
९ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर मंगळ आणि नेपच्यून या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही अत्यंत आक्रमक, प्रतिकार करणारे, धाडसी आहात. कोणतीही आणि कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी तिला तोंड देण्याची तुमची क्षमता आहे. पराभव तुम्हाला माहितीच नाही. तुम्ही पोलीस, सैनिक, एयरफोर्स यामध्ये उत्तम यश मिळवू शकतात. तुमच्यामध्ये नाजूकपणा नसतो किंवा फारसे उत्तम वक्तृत्व नसते मात्र तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात. शक्यतो तुम्ही इतरांवर टीका करणे टाळले पाहिजेत आणि बोलताना शब्द जपून वापरले पाहिजेत. तुमचा स्वभाव शीघ्रकोपी आहे. तुम्हाला मैदानी खेळांची आणि व्यायामाची आवड आहे. भिन्नलिंगी व्यक्तीकडे तुम्ही आकर्षित होतात. तुमची स्मरणशक्ती चांगली आहे. आयुष्यात झटपट पैसा मिळावा असे तुम्हाला वाटते मात्र तुम्ही जुगारी वृत्त टाळले पाहिजे. भूतकाळात तुम्ही बऱ्याचदा वावरत असतात आणि तुमच्या कल्पना भरमसाठ असतात. गरीब लोकांबद्दल तुम्हाला सहानुभूती वाटते. दुःखी आणि अपंग लोकांसाठी तुम्ही देणगी देतात. तुमचे वागणे चमत्कारिक आणि लहरी असू शकते. तुमची मनाची शक्ती अफाट असून तुम्हाला गूढ अनुभव येतात. प्रवासामुळे तुमच्या आयुष्यावर परिणाम होतात. तुम्ही विचारवंत आणि अभ्यास वृत्तीचे आहात. चारचौघांपेक्षा तुमचे विचार पुढे गेलेले असतात. तुम्ही तुमच्या विचारांबद्दल ठाम आहात.
व्यवसाय:- तुम्हाला सर्वच क्षेत्रांमध्ये यश मिळते मात्र पोलीस, सैन्य, गुप्तहेर, राजकारण, डॉक्टर, केमिस्ट, लोखंड संबंधित, अग्नी संबंधित यंत्रसामग्री यात यश मिळते.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार.
शुभ रंग:- तांबडा.
शुभ रत्न:- पुष्कराज, मोती, माणिक.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521