असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य  ७ जुलै

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य  ७ जुलै
  • Positive News
  • जुलै 7 2025

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य  ७ जुलै

सोमवार, ७ जुलै २०२५. आषाढ शुक्ल द्वादशी.   विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१.   राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००

"आज शुभ दिवस आहे" 

चंद्रनक्षत्र - अनुराधा. आज जन्मलेल्या बाळाची राशी -   वृश्चिक. 

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अष्टम स्थानी चंद्र आहे. फारशी अनुकूलता नाही. घरगुती कामासाठी वेळ द्यावा लागेल. पाळीव पशूंबद्दल प्रेम निर्माण होईल. कारखान्यातून लाभ होतील. परदेशातील व्यक्ती स्वदेशात येतील.
       
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) चंद्राचा शुक्राशी प्रतियोग आहे. आर्थिक लाभ होतील. लेखक, कलाकार याना उत्तम दिवस आहे. कामाचा ताण वाढेल. मन अंतर्मुख होईल.एखादेस्वप्न साकार होईल. मात्र प्रिय व्यक्तीकडून अपेक्षाभंग होऊ शकतो. 
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. व्यापार वाढेल. भरभराट होईल. तुमच्या सहबद्दल मान मिळेल. धनधान्य वाढेल. नवीन वस्त्र खरेदी होईल. नोकरीच्या ठिकाणी अनपेक्षितपणे सुखद अनुभव येतील. 

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आज केलेलीच गुंतवणूक चांगला परतावा देईल. बौद्धिक क्षेत्र गाजवाल. अचानक धनलाभ होईल. तुमच्या स्वभावाचे कौतुक होईल. दूरचे प्रवास होतील. डोळ्यांची काळजी घ्या. 
    
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आर्थिक लाभ होतील. व्यवसायात वाढ होईल. भाडेकरूंचे प्रश्न सुटतील. एखादे संकट थोडक्यात टळेल. क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. आज फार मोठी जोखीम घेऊ नका.     
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल ग्रहमान आहे. मनासारखी कामे होतील. मौल्यवान खरेदी कराल.  व्यापार वाढेल. खर्चात वाढ संभवते. जुन्या शत्रूशी असलेला वाद आज मिटेल. 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) गुंतागुंतीचा दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल. मन काहीसे अस्वस्थ राहील. शत्रूचे शत्रू तुम्हाला आज आपलेसे वाटतील. प्रिय व्यक्तीबाबत एखादी अप्रिय बातमी येऊ शकते.
   
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल दिवस आहे. तुमच्याच राशीत चंद्र आहे. काही सुखद अनुभव येतील. वरिष्ठ खुष होतील. तुमच्यातील न्यायी वृत्ती आज जागृत होईल. मंत्र आणि तंत्र यांची अनुकूलता वाढेल. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल.     
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. दूरचे प्रवास घडतील. उच्च शिक्षणात यश मिळेल. नातेवाईकांची भेट होईल. तुमची कीर्ती पसरेल. नावलौकिक वाढेल.  
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल दिवस आहे. आध्यत्मिक लाभ होतील. अनुकूल चंद्र आनंद आणि उत्साह वाढवेन. हरवलेली किंवा चोरीला गेलेली वस्तू परत मिळेल. व्यापार वाढेल वाढेल. अधिकार वाढतील. 
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) दशम स्थानी चंद्र आहे. व्यापार वाढण्यास मदत होईल. धनलाभ होईल.  अनोळखी इसमकडून त्रास होऊ शकतो. मात्र तुमच्या स्थानाचा तुम्हाला फायदा मिळेल. चोरीचे भय आहे.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. परदेश प्रवासाचे योग्य येतील. धनलाभ होईल. जलपर्यटन घडेल. सौख्य लाभेल. मात्र प्रिय व्यक्तीकडून अपेक्षाभंग होऊ शकतो.
 
 - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

७ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

     तुमच्यावर चंद्र आणि नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची बौद्धिक पातळी उच्च दर्जाची असते. इच्छाशक्ती असल्यास तुम्ही जीवनात मोठे यश कमवतात. तुम्ही चाकोरी बाहेरचा विचार करतात. तुम्ही भावनाप्रधान असून कलेची आवड असते. दूरच्या प्रदेशाबद्दल तुम्हाला आकर्षण असते आणि त्यामुळे तुमचा परदेशाशी संबंध येतो. तुम्ही पक्षाप्रमाणे स्वैर असतात. भविष्य आणि तत्वज्ञान यात तुम्हाला गती असते. विचार तर्कशुद्ध असतात. सर्व साधारण लोकांमध्ये मिसळणे तुम्हाला फारसे आवडत नाही. जीवनात सतत बदल आवडतो. बऱ्याच वेळ तुम्ही विचार मग्न असतात. पुस्तकात रमणे तुम्हाला प्रिय असते. तुम्ही मनाने मोकळे असतात आणि परंपरा स्वीकारतात. इतरांना तुमच्या पासून स्फूर्ती मिळते.  

व्यवसाय:- आयात - निर्यात, दुग्ध, मत्स्य, रसायने, वैद्यकीय क्षेत्र.

शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार.

शुभ रंग:- हिरवा, पिवळा.

शुभ रत्न:- पुष्कराज, पाचू.
 
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
 

संबंधित बातम्या