असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य ३ जुलै
आजचे राशिभविष्य आणि आज ज्यांचा जन्म झाला आहे आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांची वैशिष्ट्ये:-
गुरुवार, ३ जुलै २०२५. आषाढ शुक्ल अष्टमी. सौर वर्षा ऋतू. दक्षिणायण, विश्वावसुनाम संवत्सर, शके १९४७, संवत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००
"आज उत्तम दिवस आहे" दुर्गाष्टमी
नक्षत्र - हस्त/चित्रा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - कन्या. (परीघ योग शांती)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र कन्या राशीत षष्ठ स्थानी आहे. संमिश्र ग्रहमान आहे. व्यवसायात वाढ होईल. कामाचा ताण वाढेल. वक्तृत्वाचा फायदा होईल. आरोग्य सांभाळा. प्रकाशन आणि वाणिज्य क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आनंद देणारा दिवस आहे. मनाच्या आणि विचारांच्या कक्षा रुंदावतील. विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल. सामाजिक कार्यातून नावलौकिक होईल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सध्या गुरू तुमच्या राशीत आहेत. नवनवीन शिक्षण घेण्यासाठी हा चांगला कालावधी आहे. वेळ दवडू नका. बुद्धीचा योग्य वापर कराल. विक्री क्षेत्रात यश मिळेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आर्थिक फायदा होईल. व्यापारात वृद्धी होईल. सरकारी कमाई पुढे सारकतील. मान सन्मान मिळतील. विचारांची झेप वाढेल. डोळ्यांची काळजी घ्या.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. मुळात तुमच्याकडे उत्तम नेतृत्वगुण आहेत. शिवाय तुम्ही चांगले उद्योजक असतात. आज तुमचा उत्साह वाढेल. मात्र कायदेशीर बाबतीत योग्य सल्ला घ्या.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल दिवस आहे. व्यवसायात वाढ होईल. सुखे मिळतील. प्रिय व्यक्तीशी संवाद होऊ शकेल. स्पर्धेत यश मिळेल. भागीदारी व्यवसायात मात्र फेरविचार करावा लागेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र ग्रहमान आहे. कोणताही मोठा निर्णय घेऊ नये. शक्यतो आराम करावा. पाण्यापासून काळजी घ्या. अति धाडस टाळावे. पत्नीच्या नात्याकडून लाभ होतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) एकादश स्थानी चंद्र आहे. प्रसन्न राहाल. मानसिकता चांगली राहील. प्रेमात यश मिळेल. नवीन खरेदी होईल. महिलांना भेटवस्तू मिळतील. एखादे आमिष आल्यास कटाक्षानं टाळा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) दशम स्थानी चंद्र आहे. कामाचा वेग वाढेल. नोकरी/व्यवसायात चांगले अनुभव येतील. सहकाऱ्यांची उत्तम साथ लाभेल. दीर्घ कालीन शेअर्स मधून नफा मिळू शकतो.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) चांगला दिवस आहे. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सहजपणे सामावून घेऊ शकतात. तुमच्या राजकीय वाटचालीस काही लोकांचा विरोध होऊ शकतो. मात्र तुम्ही संयम ठेवा. घशाची आणि डोळ्यांची काळजी घ्या.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अष्टम स्थानी चंद्र आहे. आज मोठे निर्णय घेऊ नयेत. घरगुती कामास प्राधान्य द्या. गुप्त शत्रूंचा त्रास कमी होऊ लागेल. वाहन जपून चालवावे.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अडचणी काहीशा दूर होऊ लागतील. व्यावसायिक प्रगती होईल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. आध्यत्मिक प्रगतीस चांगला कालावधी आहे. विरोधक वाढवून घेऊ नका.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.
३ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर गुरु, चंद्र आणि नेपच्यून या तीन ग्रहांचा प्रभाव आहे. आपल्या स्वतःच्या घराबद्दल आणि देशाबद्दल तुम्हाला प्रेम असते. प्रवास आणि इतर देशांचा अभ्यास करून तुम्ही स्वतःचे ज्ञान वाढवतात. जीवनाकडे तुम्ही एका उच्च पातळीवरून बघतात. तुमचा दृष्टिकोन विशाल असतो. संशोधन करण्यात तुम्हाला अधिक रस असतो. एकाच वेळी तुम्ही दोलायमान मनस्थितीमध्ये असतात. खंबीरपणा आणि भित्रेपणा अनुभवतात. तुमच्या विचारात आणि वागण्यात स्वतंत्र पण आहे. रूढी आणि परंपरा याबद्दलच्या तुमच्या कल्पना स्वतंत्र असतात. स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल तुम्हाला प्रचंड आत्मविश्वास असतो. त्यामुळे तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतःच घेतात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. तुम्ही कायदा प्रेमी आहात. बालपणापासूनच खेळ आणि इतर कलांमध्ये तुम्ही सहभागी होतात. तुमचा जनसंपर्क मोठा असतो. अनेक लोकांचे तुम्ही कल्याण करतात. दुसऱ्याने केलेले टीका तुम्ही फार मनाला लावून घेतात. तुम्ही पोकळ दिमाख आणि गर्व टाळला पाहिजे.
व्यवसाय:- आयात - निर्यात, दूध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, साबण, केमिकल्स, वैद्यकीय क्षेत्र, सरकारी अधिकारी, शिक्षण क्षेत्र, जाहिरात, अभिनय.
शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार.
शुभ रंग:- पिवळा, जांभळा, हिरवा, अंजीरी.
शुभ रत्न:- पुष्कराज, अमेथीस्ट, लसुन्या.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521