असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य २ जुलै
आजचे राशिभविष्य आणि शेवटी आज जन्मलेल्या आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांची वैशिष्ट्ये:-
बुधवार, २ जुलै २०२५. आषाढ शुक्ल सप्तमी/अष्टमी. विश्वावसुनाम संवत्सर, शके १९४७, संवत २०८१, वर्षा ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
"आज दुपारी १२.०० पर्यंत चांगला दिवस आहे" बुधाष्टमी आज दळणवळण, संगणक, इलेक्ट्रॉनिक्स वगळता इतर क्षेत्रातील शेअर्स साठी चांगला दिवस नाही.
नक्षत्र - उत्तरा (फाल्गुना). आज जन्मलेल्या बाळाची राशी - कन्या. (वरीया योग आणि विष्टी करण शांती)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा बुधाशी लाभ योग आहे. माफक यश मिळेल. स्वतःच्या आनंदासाठी खर्च कराल. पाळीव पशूंबद्दल प्रेम उफाळून येईल. आर्थिक आवक वाढेल. नात्यात गैरसमज होऊ शकतात.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कलाकारांना चांगला कालावधी आहे. अचानक लाभ होतील. मन प्रसन्न राहील. लेखक, प्रकाशक यांना उत्तम यश मिळेल. उधारी वाढू शकते. कर्जाचा त्रास जाणवेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्साह वाढेल. कौतुक होईल. सरकारी कामे मार्गी लागतील. धार्मिक कार्यातील उत्साह आज जरा कमी होईल. नोकरीच्या ठिकाणी अपेक्षाभंग होऊ शकतो.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल कालावधी आहे. आर्थिक बाजू मजबूत होईल. मनासारखा व्यवसाय होईल. बुद्धीची चुणूक दिसेल. तुम्ही अत्यंत दयाळू आहात. आज इतरांना न्याय द्याल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) तुमच्यात एकट्याने काम करण्याची धमक आहे. गोड बोलणे आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणे तुम्हाला चांगले जमते. आज तुमच्या या गुणांचा उपयोग होईल. अधिकार वाढतील. वाहन खरेदी होऊ शकते.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) तुम्ही कोणतेही काम वेगाने [उरण करू शकतात मात्र तुम्हाला मुळात निर्णय घेण्यास वेळ लागतो. आज तुम्ही वेळ घालवू नका. अनुकूल राशी स्वामी बुधाची तुम्हाला साथ आहे. अर्थकारण मजबूत होत आहे. व्यवसायिक प्रगती साध्य होईल. नवीन खरेदी होईल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अद्याप ग्रहांची अनुकूलता नाही. त्यामुळं संयम ठेवावा लागेल. आठवा शुक्र आर्थिक बाजू मजबूत करेन. कामाच्या ठिकाणी तुमच्या बुद्धीचे कौतुक होईल. मात्र आठवा हर्षल आणि सहावा शनी यांची नाराजी असल्याने विनाकारण शत्रू निर्माण करू नका.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) चंद्र अनुकूल आहे. महत्वाची कामे आज पूर्ण करून घ्या. कामानिमित्त प्रवास घडेल. तंत्रज्ञानाचा आज तुम्ही योग्य वापर कराल. उच्च शिक्षणात यश मिळेल. हातून अनैतिक कामे होणार नाहीत याची काळजी घ्या.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) तुम्ही हुशार, कार्यक्षम मात्र लहरी आहात. आज विचारपूर्वक निर्णय घ्या. जमीन/ शेती यातून फायदा होईल. व्यावसायिक अडचणीतून मार्ग निघू लागतील. भागीदारी व्यवसाय टाळा. मोठी गुंतवणूक आज नको. सरकारी कायदे पालन करा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) तीर्थयात्रा किंवा दूरचे प्रवास घडतील. आध्यत्मिक आणि आर्थिक लाभ होतील. तुम्हाला कष्ट केल्याशिवाय सहजपणे यश मिळत नाही. त्यामुळे लॉटरी/ सट्टा यांचा नाद करू नका. जेष्ठ व्यक्तीची सेवा करा.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) फारशी अनुकूलता नाही. नियोजन बदलावे लागेल. एखादे जुने काम नव्याने करावे लागेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. छोट्या प्रवासातून लाभ होतील. सायबर सुरक्षेची काळजी घ्या.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) सप्तम स्थानी चंद्र आहे. कलाकारांना यश मिळेल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. धार्मिक कार्यात भाग घ्याल. पत्नीचा सल्ला मोलाचा ठरेल. वाहन चालवताना काळजी घ्या. शत्रू त्रास जाणवेल. कनिष्ठ व्यक्तीकडून फसवणूक होऊ शकते.
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.
२ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर चंद्र आणि नेपच्यून या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. जीवनामध्ये तुम्हास जे काय मिळवायचे असते त्याबद्दल तुम्ही मोठ मोठे स्वप्न रंगवत असतात. तुमच्या प्रत्येक कामाबद्दल तुम्ही उत्साही असतात आणि इतरांनी देखील आपले अनुकरण करावे असे तुम्हाला सतत वाटत असते. तुम्हाला प्रसिद्धीच्या झोतात राहणे आवडते. तुमच्यात नेतृत्व गुण आहेत. एकच गोष्ट सतत करणे तुम्हाला आवडत नाही. तुम्हाला नाविन्याची आवड आहे. व्यवहारिक जीवन चा दृष्टिकोन काहीसा अपुरा असतो. स्वतःच्या स्वप्नांमध्ये रंगायला तुम्हाला अधिक आवडते. तुमचे जीवन एककल्ली असते. तुमच्या वैचारिक पातळीमध्ये इतरांना तुम्ही स्थान देत नाहीत मात्र तुम्ही उदार असल्यामुळे इतरांना प्रिय असतात. लोकांना नाराज करणे तुम्हाला जमत नाही. इतराने तयार केलेल्या आराखड्याचे तुम्ही चांगल्या कामात रूपांतर करू शकतात. रम्य विषयांमध्ये, निसर्गामध्ये, समुद्र, आकाश यामध्ये रमणे तुम्हाला आवडते. आकाशाकडे, समुद्राच्या लाटांकडे तासनतास बघत बसण्यात तुमचा वेळ जातो. तुमचा स्वभाव काहीसा भित्रा असतो. तुम्ही मनातून अस्वस्थ असतात आणि सतत बदल करण्याचे वृत्ती असते.
व्यवसाय:- संगीतकार, कथालेखक, नेपथ्य, पेंटिंग्स, नाट्यकृती, कविता, करणे, द्रव पदार्थांचा व्यवसाय, केमिस्ट, प्रयोगशाळा, दंतरोगतज्ञ, सर्जरी.
शुभ दिवस:- सोमवार, गुरुवार.
शुभ रंग:- पांढरा, निळा, क्रीम.
शुभ रत्न:- मोती, हिरा, चंद्रमणी, गोमेद.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521