असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य  १४ जुलै

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य  १४ जुलै
  • Positive News
  • जुलै 14 2025

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य  १४ जुलै

आजचे राशिभविष्य आणि शेवटी आज जन्मलेल्या आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांची वैशिष्ट्ये:-

सोमवार, १४ जुलै २०२५, आषाढ कृष्ण चतुर्थी. शके १९४७, संवत २०८१. वर्षा ऋतू. विश्वावसु नाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००

चंद्र नक्षत्र - धनिष्ठा/ शततारका. आज जन्मलेल्या बाळाची राशी - कुंभ. 

"आज शुभ दिवस आहे." 

मेष:- चंद्राचा गुरुशी शुभयोग् आहे तर शुक्राशी केंद्र योग आहे. अनुकूल ग्रहमान आहे. तुमचा दबदबा वाढेल. कलाकारांना उत्तम लाभ मिळतील. अधिकार वाढतील. स्वप्ने साकार होतील. व्यवसाय वाढीसाठी पोषक काळ आहे. 
     
वृषभ:- व्यापारासाठी अनुकूल दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. नोकरीत चांगले अनुभव येतील. मन आनंदी राहील. मौल्यवान खरेदी होईल. 
 
मिथुन:- अनुकूल ग्रहमान आहे. गुरू तुमच्या राशीत आहे. सिद्धी प्राप्त होतील. मन धार्मिक विचारांनी भरून जाईल. तुमच्या मनाच्या चांगुलपणाची इतरांना प्रचिती येईल. प्रवास घडतील.

कर्क:- अष्टम स्थानी चंद्र आहे. दानधर्म कराल. अचानक लाभ होतील. अनुकूल शुक्र तुम्हाला भौतिक सुखे प्रदान करेन. मित्र मंडळींची भेट होईल. खर्च कराल. 
   
सिंह:- आर्थिक लाभ होतील. मोठी झेप घ्याल. व्यवसाय वाढेल. ग्रहमान अनुकूल आहे. शत्रू पराभूत होतील. दानधर्म करावा लागेल.
  
कन्या:-  नोकरी/व्यवसायात यश मिळेल. अधिकार वाढतील. भरभराट होईल. कामाच्या ठिकाणी प्रसन्न वातावरण असेल. कार्य सिद्धी होईल. वाहन सुख लाभेल.
 
तुळ:- पंचम स्थानी चंद्र आहे. दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. गृह सजावट कराल. आर्थिक आवक वाढेल. सुखद अनुभव येतील. छोटे प्रवास घडतील. 
 
वृश्चिक:- उत्तम व्यावसायिक यश लाभेल. मित्र भेटतील. खाण्या पिण्याची चंगळ राहील. जमीन/शेती यातून लाभ होतील. कायदेशीर कटकटीतून सुटका होईल. महिलांचा गैरसमजहोणार नाही याची काळजी घ्या.  

धनु:-  अनुकूल ग्रहमान आहे. भरपूर आर्थिक लाभ होतील. मन प्रसन्न राहील. आरोग्य सांभाळा. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. स्वतःच्या सुखासाठी खर्च कराल.
 
मकर:- अचानक धनलाभ होतील. शेअर्स मध्ये यश मिळू शकते. स्वप्ने साकार होतील. उत्साह वाढेल. संततीची काळजी मिटेल.  
 
कुंभ:- तुमच्याच राशीत चंद्र आहे. विद्या प्राप्त होतील. उपासना लाभदायक ठरेल. गूढ उलगडतील. बुद्धीला चालना देणाऱ्या घटना घडतील. गृहसौख्य लाभेल.   
 
मीन:- संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. सामाजिक कार्यातून उत्तम लाभ होतील. जमीन जुमला यातून लाभ होतील. राहत्या घराचे प्रश्न सुटतिल. कोणतेही लेखन करतांना अडचणीत येणार नाही याची काळजी घ्या. 

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

१४ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये:- 

     तुमच्यावर बुध, चंद्र आणि नेपच्यून या तीन ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्या शब्दात आणि कृतीत ठामपणे असतो. दुसऱ्याला न दुखावण्याचा स्वभाव तुमचा असतो. आणि तुम्ही सहकार्य करतात. फारशी बडबड केलेली तुम्हाला आवडत नाही. स्त्रियांमध्ये सुखी वैवाहिक जीवन दर्शवते. लहान वयात एखादे प्रेम प्रकरण असू शकते. तुम्ही कृतिशील असून तुमच्यात भाषण चातुर्य आहे. बऱ्याच वेळेला तुम्हाला जुगारी वृत्ती किंवा कोडे सोडवण्याचा छंद असू शकतो. इतरांच्या बाबत व परिस्थितीबाबत तुम्ही अतिशय संवेदनशील असून परिस्थितीचा ही तुमच्यावर फार मोठा परिणाम होतो. स्वतःचे विचार दुसऱ्याला समजून सांगण्याची तुम्हाला आवड असते. हातातील कार्यात यश कसे मिळवावे याची पूर्व नियोजित योजना तुम्ही तयार करतात. बौद्धिक गोष्टींचे तुम्हाला विलक्षण आकर्षण असते. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न असून तुम्हाला आळशीपणा आवडत नाही. नाविन्य आणि प्रवासाची आवड ही तुमची वैशिष्ट्ये आहेत. जे पीडित लोक आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला सहानुभूती वाटते. तुमची स्मरणशक्ती चांगली असून आप्त जन तुम्हाला प्रिय असतात. विरुद्ध बाजूच्या व्यक्तीची क्षमता तुम्ही जाणू शकतात त्यामुळे त्याच्यातील न्यूनतेचा फायदा तुम्ही उठवू शकतात. तुमच्यात भाषा चातुर्य असते. तुम्ही मनाने कमकुवत असल्याने अस्वस्थ असतात. तुम्हाला आपल्या आवाजाची देणगी असते. तुमची बहुतेक सुखे मानसिक पातळीवर असतात आणि त्यांना व्यावहारिक पातळीवर आणण्याचा तुमचा दृष्टिकोन असतो. सहकार्य आणि समाजप्रियता ही तुमची वैशिष्ट्ये आहेत.  

शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शुक्रवार.

शुभ रंग:- पांढरा, हिरवा.

शुभ रत्न:- पाचू, हिरा, मोती.

- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.
 

संबंधित बातम्या