असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य  १३ जुलै

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य  १३ जुलै
  • Positive News
  • जुलै 13 2025

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य  १३ जुलै

आजचे राशीभविष्य आणि आज जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्टये:-

रविवार, १३ जुलै २०२५. आषाढ कृष्ण तृतीया. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहू काळ - दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००

चंद्र नक्षत्र - श्रवण.  आज जन्मलेल्या बाळाची राशी - मकर/(संध्याकाळी ६.५४ नंतर) कुंभ (विष्टी करण शांती)

"आज दुपारी १.०० पर्यंत चांगला दिवस आहे." 

मेष:- चंद्राचा सूर्य आणि हर्षलशी अशुभ योग आहे. नोकरीत काहीसा तणाव जाणवेल. बोलण्यातून किंवा लिखापढीतून गैरसमज संभवतो. मोठी जोखीम घेऊ नका. 
     
वृषभ:- संमिश्र दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. मनात संभ्रम निर्माण करणारे ग्रहमान आहे. कोणताही निर्णय घेतांना विचार करा. स्थावर संपत्ती बाबत वाद संभवतात. 
 
मिथुन:- प्रतिकूल ग्रहमान आहे. अष्टमस्थानी चंद्र आहे. अधिकाराचा दुरुपयोग टाळा. अहंकार दूर ठेवला पाहिजे. मैदानी खेळ खेळताना विशेष काळजी घ्या. सरकारी अधिकाऱ्यांशी नम्रपणे वागा. 

कर्क:-  काही आश्चर्यकारक घटना घडतील. अपमानाचे प्रसंग येऊ शकतात. मित्र- मैत्रिणींकडून गैरसमजाच्या कारणाने मत्सर किंवा शत्रुत्व होऊ शकते. रागावर नियंत्रण ठेवा. 
   
सिंह:- अनुकूल रवीचे लाभ आता कमी होऊ लागतील. रोजच्या कामकाजात काही बदल करावे लागतील. आर्थिक लाभ होतील. भेटवस्तू मिळतील. मोठी जोखीम नको.  कामाच्या ठिकाणी मन लागणार नाही.
  
कन्या:- व्यवसाय वाढीसाठी आज विशेष मेहनत घ्यावी लागेल. वरिष्ठ नाखूष राहतील. तुमच्याकडून आज अधिक कामाची अपेक्षा केली जाईल. संध्याकाळी प्रवास करताना विशेष काळजी घ्या.
 
तुळ:- आज घरगुती कामासाठी वेळ देणे इष्ट ठरेल. ईश्वर उपासना सोडू नका. घरातील ज्येष्ठ व्यक्तीची सेवा करावी. कोणत्याही अनैतिक प्रलोभनास बळी पडू नका. अन्यथा अडचणी वाढतील. व्यसने टाळा.     
 
वृश्चिक:- व्यावसायिक यश लाभेल. मात्र उधारी वाढेल. कनिष्ठ व्यक्तींशी संबंध येईल. त्यांच्याकडून कामे करून घ्यावी लागतील. शत्रू पीडा जाणवेल. वयस्कर नातेवाईक अडचणीत आणू शकतात.

धनु:-  संमिश्र ग्रहमान आहे. मित्र मंडळी आणि नात्यातून सहकार्य मिळेल.  मन प्रसन्न राहील. आज अनोळखी माणसावर फार विश्वासठेवू नका. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.
 
मकर:- आज तुमच्याच राशीत चंद्र आहे. प्रगती साधणारा दिवस आहे. उत्साह वाढेल. कौटुंबिक कार्यक्रमात भाग घ्याल. प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. सहजपणे पैसे मिळण्याच्या आमिषाला बळी पडू नका.
 
कुंभ:- दिवस फारसा आशादायक नाही. साचलेली कामे पूर्ण करा. खर्च वाढतील.  कोणत्याही वादात पडू नका. अहंकार टाळा. पाणथळ जागा, बगीचे यात वावरताना काळजी घ्या.
 
मीन:- चंद्र अनुकूल आहे. त्यामुळे उत्साह वाढेल. प्रगती साध्य कराल. मात्र भलते धाडस टाळा. तुमचे सामाजिक स्थान अडचणीत येणार नाही याची काळजी घ्या. बदनामीचे भय आहे.   

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

१३ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

     तुमच्यावर हर्षल, चंद्र आणि नेपच्यून या तीन ग्रहांचा प्रभाव आहे.  तुमची उंची चांगली असते आणि तुम्ही दिसायला आकर्षक असतात. तुम्ही बुद्धिमान असून तुमचा स्वभाव विचारी असतो आणि तुमच्या मध्ये आपुलकीची भावना असते. तुम्हाला चांगल्या दर्जाची नोकरी मिळते आणि उत्तम पैसा मिळतो. वयाच्या ३१ वर्षानंतर तुमचा भाग्यदायी होतो. तुम्ही दिसायला गरीब असला तरी मनातून हट्टी असतात. इतरांना तुमच्या सहवासात आनंद मिळतो आणि हे बघून तुम्हाला समाधान लाभते. बुद्धिमान वर्तुळात वावरणं तुम्हाला आवडते. स्वतःच्या अती आक्रमक स्वभावाला तुम्ही आळा घातला पाहिजे. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अनेक चळवळीचा अनुभव घेतात. तुम्हाला खोटेपणा आवडत नाही. तुमच्यामध्ये एक या अंकाचे देखील सर्व गुण असतात मात्र तुम्ही त्या लोकांन इतके धीट नसतात. संधी मिळाल्यास तुम्ही तुमची क्षमता दाखवू शकतात. हर्षल आणि चंद्र यांच्या एकत्रित पणामुळे अडचणींवर मात करणे जरा कठीण जाते. तुमचे विचार स्वतंत्र असतात त्यामुळे तुम्ही कधी कधी चमत्कारिक कृती करतात. बऱ्याच वेळा तुम्हाला नातेवाईकांकडून उपद्रव होण्याची शक्यता असते. कोर्ट कचऱ्याशी तुमचा संबंध येतो. वैवाहिक जोडीदाराची निवड करताना तुम्ही अधिक काळजी घेतली पाहिजे. शक्यतो तुम्ही भागीदारी व्यवसाय टाळायला पाहिजे. मानव जातीच्या कल्याणासाठी आपल्या बुद्धीचा उपयोग व्हावा असे तुम्हाला मनापासून वाटते. तुम्ही पद्धतशीर वागतात. तुम्हाला अनेक गुप्त शत्रू निर्माण होतात आणि ते तुमच्याबद्दल गैरसमज पसरवतात. झटपट पैसा मिळावा असे तुम्हाला वाटत असले तरी तुम्ही जुगारी वृत्ती टाळली पाहिजे. तुम्ही भूतकाळात जास्त रमतात आणि तुमच्या कर्तृत्वाबद्दलच्या कल्पना भरमसाठ असतात. तुमचा स्वभाव अस्थिर असतो आणि वागण्यामध्ये विरोधाभास जाणवतो. 

व्यवसाय:-  इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक, यंत्रसामग्री, वाहतूक यंत्रणा, इंजिनिअरिंग, बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर, शास्त्रज्ञ, कारखानदार, गूढ विद्या, अध्यात्म, ज्योतिष, हस्तसामुद्रक.

शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार.

शुभ रंग:- निळा, राखी, पांढरा, तपकिरी.

शुभ रत्न:- हिरा, पवळे, मोती.
 
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या

कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
 

संबंधित बातम्या