.असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य १२ जुलै

.असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य १२ जुलै
  • Positive News
  • जुलै 12 2025

Share on  

.असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य १२ जुलै

आजचे राशिभविष्य आणि आज जन्मलेल्या व्यक्तीची वैशिष्टये:-

शनिवार, १२ जुलै २०२५. आषाढ कृष्ण द्वितीया. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०

"आज उत्तम दिवस आहे" 

नक्षत्र: उ.षा. आज जन्मलेल्या बाळाची राशी- मकर. 

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा शुक्राशी शुभ योग आहे. अनुकूल दिवस आहे. व्यवसायाच्या जागेत बदल संभवतो. नोकरीत उत्तम लाभ होतील. अचानक एखादी चांगली बातमी समजेल. मौल्यवान खरेदी होईल. पाळीव पशूंपासून काळजी घ्या. 
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) नात्यातून लाभ होतील. आनंद दायक अनुभव येतील. राशीस्वामीशी चंद्राचा शुभ योग आहे. भौतिक सुखे प्राप्त होतील. कलाकारांना उत्तम कालावधी आहे.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. स्वतःच्या आनंदासाठी खर्च कराल. आर्थिक आवक चांगली राहील. महिलांकडून सहकार्य लाभेल. बोलताना काळजी घ्या.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल ग्रहमान आहे. कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभाची शक्यता आहे. गूढ गोष्टींचे आकर्षण वाटेल. तुमचे बुद्धी चातुर्य आज कामाला येईल. अनुकूल शुक्र तुम्हाला अत्यंत आनंदी ठेवेल.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आर्थिक भरभराट चांगली होणार आहे. व्यवसाय वाढेल. मौल्यवान खरेदी होईल. संगणक किंवा भ्रमणध्वनी यांचा विचार कराल. व्यापार वृद्धिंगत होईल. गर्दीच्या ठिकाणी खिसा सांभाळणे आवश्यक आहे.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम ग्रहमान आहे. बुध अनुकूल आहे. जेवढे अधिक काम कराल तेव्हडे लाभ वाढतील. मित्र मंडळी भेटतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ खुश होतील. वस्त्र खरेदी होईल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) घरगुती कामे आणि नोकरी यात ओढाताण होईल. आर्थिक लाभ होतील. व्यवसाय वाढेल. जमीन व्यवहारातून यश मिळेल. 
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आर्थिक प्रगती होईल. धन -धान्य आणि संपत्ती वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. प्रवास घडतील. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. 

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) द्वितीय चंद्र आहे. अनपेक्षित लाभ होतील. आरोग्य सुधारेल. सुखकारक बातमी समजेल. अडचणी दूर होतील. मात्र खर्चात वाढ होईल. 
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) तुमच्याच राशीत चंद्र आहे. आत्मविश्वास वाढेल. प्रेमात यश मिळेल. अचानक लाभ होतील. वादविवादात तुमचा विजय होईल. 
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) व्यय स्थानी चंद्र आहे. घरगुती कामात वेळ द्यावा लागेल. अपेक्षित मोबदला मिळणार आहे. तुम्ही जो व्यवसाय करत आहात त्याचा आज विशेष लाभ मिळेल. 
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) चंद्र अनुकूल आहे. अडचणी दूर होतील. नात्यातून लाभ होतील. सौख्य लाभेल. कलाकारांना लाभ होतील. व्यावसायिक अंदाज मात्र चुकू शकतात. 

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

१२ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

     तुमच्यावर गुरु, चंद्र आणि नेपच्यून या तीन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्हाला जीवनात अधिकार व मान मिळतो. पैसा कसा मिळवावा याचे तुम्हाला कला अवगत असते. आयुष्यात तुम्हाला सतत बदल आवडतो. तुम्ही शंकेखोर असतात. मनाने तुम्ही मोकळे असतात आणि तुमच्या कृतीमध्ये एक मुक्तपणा असतो. बालपणापासून तुम्ही आनंदी आणि उत्साही आहात मात्र तुमच्या भावनांना तुम्ही आवर घातला पाहिजे. तुमच्या वागणुकीतून इतरांना स्फूर्ती मिळते. आपल्या स्वतःच्या घराबद्दल आणि देशाबद्दल तुम्हाला प्रेम असते. प्रवास आणि इतर देशांचा अभ्यास करून तुम्ही स्वतःचे ज्ञान वाढवतात. जीवनाकडे तुम्ही एका उच्च पातळीवरून बघतात. तुमचा दृष्टिकोन विशाल असतो. संशोधन करण्यात तुम्हाला अधिक रस असतो. एकाच वेळी तुम्ही दोलायमान मनस्थितीमध्ये असतात. खंबीरपणा आणि भित्रेपणा अनुभवतात. तुमच्या विचारात आणि वागण्यात स्वतंत्र पण आहे. रूढी आणि परंपरा याबद्दलच्या तुमच्या कल्पना स्वतंत्र असतात. स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल तुम्हाला प्रचंड आत्मविश्वास असतो. त्यामुळे तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतःच घेतात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. तुम्ही कायदा प्रेमी आहात. बालपणापासूनच खेळ आणि इतर कलांमध्ये तुम्ही सहभागी होतात. तुमचा जनसंपर्क मोठा असतो. अनेक लोकांचे तुम्ही कल्याण करतात. दुसऱ्याने केलेले टीका तुम्ही फार मनाला लावून घेतात. 

व्यवसाय:-  आयात -  निर्यात, दूध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, साबण, केमिकल्स, वैद्यकीय क्षेत्र, सरकारी अधिकारी, शिक्षण क्षेत्र, जाहिरात, अभिनय.

शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार.

शुभ रंग:- पिवळा, जांभळा, हिरवा, अंजीरी.

शुभ रत्न:- पुष्कराज, अमेथीस्ट, लसुन्या.
 
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या

कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
 

संबंधित बातम्या