असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य  ११ जुलै

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य  ११ जुलै
  • Positive News
  • जुलै 11 2025

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य  ११ जुलै

आजचे राशिभविष्य आणि आज जन्मलेल्या आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या स्वभावाची वैशिष्टये:-

शुक्रवार, ११ जुलै २०२५, आषाढ कृष्ण प्रतिपदा. शके १९४७, संवत २०८१. विश्वावसुनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ -  सकाळी १०.३० ते दुपारी १२.००

आज वैधरुती वर्ज्य दिवस आहे. 

चंद्रनक्षत्र - पूर्वा आषाढा.  आज जन्मलेल्या बाळाची राशी - धनु/ (दुपारी १२.०९ नंतर) मकर. वैधरुती योग शांती. 

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) दुपार नंतर चंद्राचा शनी, हर्षल, नेपच्यूनशी शुभयोग आहे. अनुकूल दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. प्रवास घडतील. व्यापारात उत्तम नफा होईल. इच्छापूर्ती होईल.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) 
संमिश्र सुरुवात आहे. दुपार नंतर आर्थिक लाभ होतील. नोकरी/व्यवसायात प्रगती होईल. दूरच्या प्रवासाचे बेत आखले जातील. धर्माचे काम कराल. शिक्षणात गोडी निर्माण होईल. 
  
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) दिवसाची सुरुवात चांगली आहे. सकाळच्या सत्रात महत्वाची कामे पूर्ण करून घ्या. दुपार नंतर काही रोचक अनुभव येतील. सासूरवाडीकडून लाभ होतील. 

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) वैज्ञानिक शिक्षणात उच्च स्थानी जाल. मेहुणा, नातवंडे यांचा सहवास लाभेल. आर्थिक प्रगती चांगली होणार आहे. कौटुंबिक कार्यात सहभागी व्हाल. सन्मान मिळेल. अचानक लाभ होतील.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) व्यवसायात वाढ होईल. नोकरीत चांगले अनुभव येतील. मनासारखे काम होईल. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. काही गुपिते उघड होतील.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल ग्रहमान आहे. तुम्ही रासायनिक विश्लेषण उत्तम करू शकतात. व्यवसायात तुम्हाला चांगले यश मिळते. आज मनासारखी कामे होतील. कामानिमित्त दूरचे प्रवास घडतील.  
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक उलाढाल वाढेल. प्रगतीचा वेग चांगला राहील. व्यावसायिक कामे आणि घरगुती कामे या दोन्हीचा समतोल राखावा लागेल. स्पर्धेत तुम्हाला विजय प्राप्त होईल.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल ग्रहमान आहे. दुपारनंतर अनुकूलता अधिक वाढेल. व्यवसाय वाढेल. आर्थिक आवक चांलगी असणार आहे. बुद्धीचातुर्य दाखवाल.  
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सर्व सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. सुपीक जमिनीतून उत्तम लाभ होतील. स्थावर संपत्ती वाढेल. पूर्वजांचे आशीर्वाद लाभतील. नोकर चाकर यांचे सुख लाभेल.  
  
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) दिवसाची सुरुवात संथ असली तरी दुपार नंतर अनुकूलता वाढेल. कामानिमित्त केलेल्या प्रवासातून उत्तम लाभ होतील. अहंकार टाळल्यास आज नवीन ओळखीतून फायदा होईल.       

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) ग्रहमान अनुकूल आहे. प्रगती साधणारा दिवस आहे. मन आनंदी राहील. वाकसिद्धी प्राप्त होईल. सांपत्तिक स्थिती सुधारेल. पत्नीचा व्यवसाय वाढेल.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) दुपार नंतर चंद्र अधिक अनुकूल होत आहे. नोकरी/व्यवसायासाठी चांगला दिवस आहे. नवीन संधी प्राप्त होतील. सामाजिक कार्यात भाग घ्याल. आवडते छंद जोपासले जातील. 

-ज्योतिशी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

११ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

     तुमच्यावर चंद्र आणि नेपच्यून या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्यामध्ये एक अद्भुत शक्ती आहे आणि त्याच्यातून विद्युत शक्ती प्रमाणे स्पंदन बाहेर पडत असतात. त्यामुळे इतरांना तुमच्याबद्दल विलक्षण आकर्षण वाटते. तुमची कल्पनाशक्ती अफाट असते. तुम्हाला सणासमारंभात मानाचे स्थान मिळते. तुम्ही एक प्रामाणिक मित्र असतात. तुम्हाला तत्त्वज्ञान, शास्त्र आणि गुढविद्या याबद्दल आकर्षण असते. तुम्ही अतिशय संवेदनशील आहात आणि लहान लहान गोष्टींवरून अस्वस्थ होतात. तुम्हाला झटपट निर्णय घेणे आवडते. इतरांना सल्ला देणे, स्फूर्ती देणे तुम्हाला उत्तम प्रकारे जमते. तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी तुम्ही कोणतेही दिव्य करण्यास तयार असतात. जीवनामध्ये तुम्हास जे काय मिळवायचे असते त्याबद्दल तुम्ही मोठ मोठे स्वप्न रंगवत असतात. तुमच्या प्रत्येक कामाबद्दल तुम्ही उत्साही असतात आणि इतरांनी देखील आपले अनुकरण करावे असे तुम्हाला सतत वाटत असते. तुम्हाला प्रसिद्धीच्या झोतात राहणे आवडते. तुमच्यात नेतृत्व गुण आहेत. एकच गोष्ट सतत करणे तुम्हाला आवडत नाही. तुम्हाला नाविन्याची आवड आहे. व्यवहारिक जीवन चा दृष्टिकोन काहीसा अपुरा असतो. स्वतःच्या स्वप्नांमध्ये रंगायला तुम्हाला अधिक आवडते. तुमचे जीवन एककल्ली असते. तुमच्या वैचारिक पातळीमध्ये इतरांना तुम्ही स्थान देत नाहीत मात्र तुम्ही उदार असल्यामुळे इतरांना प्रिय असतात. लोकांना नाराज करणे तुम्हाला जमत नाही. इतराने तयार केलेल्या आराखड्याचे तुम्ही चांगल्या कामात रूपांतर करू शकतात. रम्य विषयांमध्ये, निसर्गामध्ये, समुद्र, आकाश यामध्ये रमणे तुम्हाला आवडते. आकाशाकडे, समुद्राच्या लाटांकडे तासनतास बघत बसण्यात तुमचा वेळ जातो. तुमचा स्वभाव काहीसा भित्रा असतो. तुम्ही मनातून अस्वस्थ असतात आणि सतत बदल करण्याचे वृत्ती असते.

व्यवसाय:-  संगीतकार, कथालेखक, नेपथ्य, पेंटिंग्स, नाट्यकृती, कविता, करणे, द्रव पदार्थांचा व्यवसाय, केमिस्ट, प्रयोगशाळा, दंतरोगतज्ञ, सर्जरी.

शुभ दिवस:- सोमवार, गुरुवार.

शुभ रंग:- पांढरा, निळा, क्रीम.

शुभ रत्न:- मोती, हिरा, चंद्रमणी, गोमेद.
 
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या

कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
 

संबंधित बातम्या