असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य  १० जुलै

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य  १० जुलै
  • Positive News
  • जुलै 10 2025

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य  १० जुलै

आजचे राशीभविष्य आणि शेवटी आज जन्मलेल्या आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांची स्वभाव वैशिष्टये :- 

गुरूवार, १० जुलै २०२५. आषाढ पूर्णिमा. विश्वावसुनाम संवत्सर. शके १०४७, संवत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००

"आज दुपारी २.०० नंतर चांगला दिवस आहे" गुरुपौर्णिमा, व्यासपूजा

चंद्र नक्षत्र - पू. षा./आज जन्मलेल्या बाळाची राशी - धनु. (एइन्द्र योग, विष्टी करण यांची शांती करून घेणे)

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या  फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा मंगळाशी त्रिकोण योग आहे. नात्यातून मदत मिळेल. व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभ होतील. कामे पूर्ण होतील. शेअर्स/लॉटरीतून लाभ होऊ शकतो. 

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अष्टम स्थानी चंद्र आहे. धार्मिक यात्रा करण्यासाठी उत्तम कालावधी आहे. दानधर्म करा. रासायनिक कारखाने आणि शस्त्रक्रिया साहित्य विक्रीतून लाभ होतील. 
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. अनुभवाचा फायदा होईल. आत्मविश्वास कमी होऊ शकतो. क्रोधावर नियंत्रण ठेवा. कोर्ट कामात अपेक्षित यश मिळू शकते.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आर्थिक लाभ होतील. नवीन कामाचे नियोजन कराल. आर्थिक चिंता मिटेल. प्रतिष्ठेसाठी खर्च कराल. मित्रमंडळी भेटतील. तांब्याच्या वस्तू विकणाऱ्यांना चांगले लाभ होतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) तुमच्याअधिकाराचा आणि पदाचा आज योग्य वापर करा. अचानक धनलाभ होऊ शकतो.  कामे पूर्ण होतील. अनुकूल सूर्य तुमची स्वप्नपूर्ती करेन मात्र त्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) जमीन व्यवहारातून नफा वाढेल. शेतीची कामे कराल. वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. रुग्णालय कामासाठी खर्च करावा लागू शकतो त्यापेक्षा दानधर्म करणे चांगले.  
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) नात्यातून लाभ होतील. बौद्धिक चातुर्य आणिताकद यांचा अनोखा संगम आज दिसून येईल. अनुकूल मंगळ व्यापारी स्पर्धेत यश देईन. नवीन व्यवसाय वाढ होऊ शकते. 
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमची शक्ती वाढवणारे ग्रहमान आहे. कर्तव्य पूर्ण होईल. वारसा हक्काने धन संपत्ती लाभेल. 

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) तुमच्याच राशीत चंद्र आहे. मन उत्साही राहील. भाग्योदय होईल. लक्ष्मी प्रसन्न होईल. अडचणी दूर होतील. प्रवास घडतील.
   
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) व्यय स्थानी चंद्र आहे. अष्टम स्थानी मंगळ आहे. गुप्त संपत्तीचा लाभ होईल. मात्र जोडीदाराबद्दल द्वेष उफाळून येऊ शकतो. मन उदास राहील. आत्मचिंतन कराल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल दिवस आहे. आज महत्वाची कामे पूर्ण करा. प्रतिकूल सूर्य तुमची परीक्षा घेत आहे. अपमानाचे प्रसंग येऊ शकतात. मात्र निराश होऊ नका. संयम ठेवा. उपासना करा.   
  
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) ग्रहमान अनुकूल आहे. वाहन सुख लाभेल. व्यापारात लाभ होतील. नोकरीत सुखद अनुभव येतील. शत्रू नाश होईल. शंका दूर होतील. 

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

१० जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

     तुमच्यावर रवी, चंद्र आणि नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आशावादी असतो. तुमच्या मध्ये आत्मविश्वास असतो आणि तुम्हाला मानसन्मान मिळतात. ठरवलेले उद्दिष्ट तुम्ही आयुष्यात पार पाडू शकतात. इतरांना तुमच्याकडून बरीच मदत होते. मात्र त्याचे श्रेय तुम्हाला मिळत नाही. तुम्हाला वारसा हक्काने पैसा किंवा कला उपलब्ध होते. आयुष्याच्या ४६ नंतर भाग्योदय होतो. तुम्ही निर्भयपणे वावरतात. जीवनात कष्ट करण्याचे तुमचे तयारी असते. उत्तम कल्पनाशक्ती तुम्हाला लाभलेली आहे. तुमची प्रकृती अस्थिर आहे आणि तुम्हाला लहरी आणि चमत्कारिकपणा  यांचा वारंवार अनुभव येतो. तुम्ही आयुष्यात प्रगती करतात आणि यश संपादन करतात. आयुष्यात बरेचसे चमत्कारिक आणि साहस पूर्ण अनुभव येतात. तुमच्यात जबरदस्त राष्ट्रभक्ती असते आणि घर आणि संसार याकडे तुमचा ओढा असतो. तुम्ही शांत वृत्तीचे असून एकलकोंडे आहात मात्र तरीही तुम्हाला लोकप्रियता मिळते. तुम्ही निस्वार्थी आणि प्रामाणिक असून पैसे जमवण्याकडे तुमचा कल असतो. मात्र पैशांमुळे तुम्हाला सुरक्षित वाटते. तुम्ही धार्मिक आहात. स्वतंत्र वृत्तीचे आहात. जीवनात सतत बदल करण्याची तुमची वृत्ती असते. एकाच गोष्टी तुम्ही फार काळ रमत नाहीत. तुम्ही उद्योगप्रिय असून सतत कामात मग्न असतात. तुमचा दृष्टिकोन डोळस असतो. इतरांना सल्ला देणे तुम्हाला आवडते आणि त्यात यश मिळते. तुम्ही व्यवहार दक्ष आणि ध्येयवादी असतात. तुम्हाला कलेबद्दल आकर्षण आहे. आणि तुम्ही त्यात उत्साहाने भाग घेतात. तुमची इच्छा शक्ती चांगली आहे. कोणताही विषय तुम्ही मित्रांना उत्तमपणे समजावून सांगू शकतात.
 
व्यवसाय:-  तुमचा स्वभाव अस्थिर  असल्यामुळे तुम्ही एकाच नोकरीत किंवा व्यवसायात फार काळ टिकत नाहीत. जाहिरात उद्योग, वर्तमानपत्रे, मासिके, चित्रपट उद्योग, नाट्यकला, रंगकाम, अंतर्गत सजावट, नेपथ्य, बँकिंग यात तुम्हाला यश मिळते.

शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार, गुरुवार.

शुभ रंग:- पिवळा, सोनेरी, केशरी.

शुभ रत्न:- माणिक, चंद्रमणी.
 
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या

कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
 

संबंधित बातम्या