असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य १ जुलै

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य १ जुलै
  • Positive News
  • जुलै 1 2025

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य १ जुलै

आजचे राशिभविष्य आणि शेवटी आज जन्मलेल्या आणि आज वाढदिवस असलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये:- 

मंगळवार, १ जुलै २०२५. आषाढ शुक्ल षष्ठी, वर्षा ऋतू. शके १९४७, संवत २०८१. विश्वावसुनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहू काळ -  दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०

"आज संध्याकाळी ५.०० नंतर चांगला दिवस आहे." 

चंद्र नक्षत्र - पूर्वा (फाल्गुना). आज जन्मलेल्या बाळाची राशी - सिंह/कन्या (व्यतिपात योग शांती) 
 
मेष:- चंद्राचा शुक्राशी त्रिकोण योग संध्याकाळी होणार आहे.  प्रेमात अपयश संभवते. अति धाडस नको. संध्याकाळ आर्थिक आवक वाढवणारी आहे. मौल्यवान खरेदी होईल.
     
वृषभ:- तुमचा राशीस्वामी शुक्र सध्या तुमच्या राशीत आहे. वाहन सौख्य लाभेल. कार्यक्षमता वाढेल. मन आनंदी राहील. विवाह इच्छुकांना चांगली बातमी मिळेल. 
 
मिथुन:- तृतीय आणि चतुर्थ स्थानी चंद्र आहे. आवडत्या वस्तूसाठी खर्च होईल. भावंड मदत करतील. नेहमीपेक्षा वेगळ्या मार्गाने जाल. आर्थिक आवक चांगली असणार आहे. 

कर्क:- अनुकूल शुक्र कौटुंबिक सौख्य देईन. मन आनंदी राहील. अचानक एखादी खरेदी होईल. मित्र मंडळी भेटतील. क्रोधावर नियंत्रण ठेवा.
 
सिंह:- चंद्र सकाळी तुमच्याच राशीत आहे. आत्मविश्वास भरपूर वाढलेला आहे. यश मिळेल. महिला वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल. दागिने, वाहन, सुगंधी आणि सौंदर्य प्रसाधने विक्री करणार्यांना लाभ होतील.
  
कन्या:- आज सकाळी काहीशी दिरंगाई अनुभवाल.  खर्च वाढतील. प्रवासाचे नियोजन बदलेल. मात्र संध्याकाळ आनंदाची आहे. मेजवानीचे योग येतील. 
 
तुळ:- सकाळी लाभ स्थानी चंद्र आहे. सुखद अनुभव येतील. जुन्या नात्यांना सोडू नका. अष्टम स्थानी शुक्र आहे. नवीन मोहात पडू नका. अन्यथा मोठा धोका संभवतो.  
 
वृश्चिक:- अनुकूल ग्रहमान आहे. दशम आणि अकरावा चंद्र कामाच्या ठिकाणी उत्साह वाढवेन. मौल्यवान खरेदी होईल. विवाह उत्सुकाना शुभ समाचार समजतील. महिलांकडून लाभ होतील.   

धनु:- ग्रहमान प्रगती करण्यास पोषक आहे. व्यवसाय आणि नोकरीत कामाचा ताण आहेत. प्रवासाचा कंटाळा येईल. मात्र तुम्ही एखाद्या गटाचे नेतृत्व कराल. व्यसने टाळा.
 
मकर:- संमिश्र कालावधी आहे. सुरुवात फारशी चांगली नाही. संध्याकाळ नंतर धनलाभ होईल. नैराश्य दूर होऊ लागेल. प्रेमात यश मिळेल. कला - संगीत यात भाग घ्याल.   
 
कुंभ:- सध्या चतुर्थ शुक्र आहे. तो आर्थिक दृष्टीने उत्तम आहे. सकाळी सप्तम चंद्र आहे. विरोधकांवर लक्ष केंद्रित होईल. मात्र व्यवसायातही वेळ दिला पाहिजे. दुपार नंतर दोन दिवस कामाची गती संथ होऊ शकते.
 
मीन:- व्यवसायात लाभ होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. सौख्य लाभेल.  गायकांना व कलाकारांना चांगला कालावधी आहे. मात्र सप्तमात मंगळ आहे. विनाकारण शत्रुत्व वाढवून घेऊ नका.

 - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

१ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

     तुमच्यावर रवी, चंद्र आणि नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही आयुष्यात प्रगती करतात आणि यश संपादन करतात. आयुष्यात बरेचसे चमत्कारिक आणि साहस पूर्ण अनुभव येतात. तुमच्यात जबरदस्त राष्ट्रभक्ती असते आणि घर आणि संसार याकडे तुमचा ओढा असतो. तुम्ही शांत वृत्तीचे असून एकलकोंडे आहात मात्र तरीही तुम्हाला लोकप्रियता मिळते. तुम्ही निस्वार्थी आणि प्रामाणिक असून पैसे जमवण्याकडे तुमचा कल असतो. मात्र पैशांमुळे तुम्हाला सुरक्षित वाटते. तुम्ही धार्मिक आहात. स्वतंत्र वृत्तीचे आहात. जीवनात सतत बदल करण्याची तुमची वृत्ती असते. एकाच गोष्टी तुम्ही फार काळ रमत नाहीत. तुम्ही उद्योगप्रिय असून सतत कामात मग्न असतात. तुमचा दृष्टिकोन डोळस असतो. इतरांना सल्ला देणे तुम्हाला आवडते आणि त्यात यश मिळते. तुम्ही व्यवहार दक्ष आणि ध्येयवादी असतात. तुम्हाला कलेबद्दल आकर्षण आहे. आणि तुम्ही त्यात उत्साहाने भाग घेतात. तुमची इच्छा शक्ती चांगली आहे. कोणताही विषय तुम्ही मित्रांना उत्तमपणे समजावून सांगू शकतात. तुमचा स्वभाव अस्थिर  असल्यामुळे तुम्ही एकाच नोकरीत किंवा व्यवसायात फार काळ टिकत नाहीत.

व्यवसाय:-   जाहिरात उद्योग, वर्तमानपत्रे, मासिके, चित्रपट उद्योग, नाट्यकला, रंगकाम, अंतर्गत सजावट, नेपथ्य, बँकिंग यात तुम्हाला यश मिळते. विद्युत क्षेत्र, संशोधन, सराफ व्यवसाय, शल्य विशारद.

शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार, गुरुवार.

शुभ रंग:- पिवळा, सोनेरी, केशरी.

शुभ रत्न:- माणिक, पाचू, चंद्रमणी.
 
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या

कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
 

संबंधित बातम्या