असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य शुक्रवार, ३१ जुलै २०२६.

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य शुक्रवार, ३१ जुलै २०२६.
  • Positive News
  • जुलै 31 2026

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य शुक्रवार, ३१ जुलै २०२६.

*शुभ कालावधी*

३१ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

तुमच्यावर हर्षल, चंद्र आणि नेपच्यून या तीन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्हाला वयाच्या चाळीस नंतर उत्तम यश मिळते. तुमच्या कामाचे फळ तुम्हाला चटकन मिळावे अशी तुमची अपेक्षा असते. तुम्ही व्यावहारिक असता आणि तुमच्यात जबरदस्त इच्छाशक्ती असते. तुम्हाला प्रवासाची आवड असते. तुमची उंची चांगली असते आणि तुम्ही दिसायला आकर्षक असता. तुम्ही बुद्धिमान असून तुमचा स्वभाव विचारी असतो आणि तुमच्यामध्ये आपुलकीची भावना असते. तुम्हाला चांगल्या दर्जाची नोकरी मिळते आणि उत्तम पैसा मिळतो. तुम्ही दिसायला गरीब असलात तरी मनातून हट्टी असता. इतरांना तुमच्या सहवासात आनंद मिळतो आणि हे पाहून तुम्हाला समाधान लाभते. बुद्धिमान वर्तुळात वावरणे तुम्हाला आवडते. स्वतःच्या अती आक्रमक स्वभावाला तुम्ही आळा घातला पाहिजे. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अनेक चढ-उतारांचा अनुभव घेता. तुम्हाला खोटेपणा आवडत नाही. तुमच्यामध्ये एक या अंकाचे देखील सर्व गुण असतात, मात्र तुम्ही त्या लोकांइतके धीट नसता. संधी मिळाल्यास तुम्ही तुमची क्षमता दाखवू शकता. हर्षल आणि चंद्र यांच्या एकत्रित परिणामामुळे अडचणींवर मात करणे जरा कठीण जाते. तुमचे विचार स्वतंत्र असतात, त्यामुळे तुम्ही कधी कधी चमत्कारिक कृती करता. बऱ्याच वेळा तुम्हाला नातेवाईकांकडून उपद्रव होण्याची शक्यता असते. कोर्ट-कचेऱ्याशी तुमचा संबंध येऊ शकतो. वैवाहिक जोडीदाराची निवड करताना अधिक काळजी घेतली पाहिजे. शक्यतो भागीदारीचा व्यवसाय टाळावा. मानवजातीच्या कल्याणासाठी आपल्या बुद्धीचा उपयोग व्हावा असे तुम्हाला मनापासून वाटते. तुम्ही पद्धतशीर वागता. तुम्हाला अनेक गुप्त शत्रू निर्माण होतात आणि ते तुमच्याबद्दल गैरसमज पसरवतात. झटपट पैसा मिळावा असे वाटत असले तरी जुगारी वृत्ती टाळली पाहिजे. तुम्ही भूतकाळात जास्त रमता आणि तुमच्या कर्तृत्वाबद्दलच्या कल्पना भरमसाठ असतात. तुमचा स्वभाव अस्थिर असतो आणि वागण्यात विरोधाभास जाणवतो.

व्यवसाय: इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक, यंत्रसामग्री, वाहतूक यंत्रणा, इंजिनिअरिंग, बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर, शास्त्रज्ञ, कारखानदार, गूढ विद्या, अध्यात्म, ज्योतिष, हस्तसामुद्रिक.

शुभ दिवस: रविवार, सोमवार, बुधवार.

शुभ रंग: निळा, राखी, पांढरा, तपकिरी.

शुभ रत्न: हिरा, पवळे, मोती.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

---

शुक्रवार, ३१ जुलै २०२६
आषाढ कृष्ण द्वितीया. ग्रीष्म ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.

राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521

राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००

"आज शुभ दिवस असून नवीन योजना, व्यवसाय, आर्थिक व्यवहार आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अनुकूल आहे."

चंद्रनक्षत्र - धनिष्ठा / संध्याकाळी ७.२७ नंतर शततारका.
आज जन्मलेल्या बाळाची राशी - मकर / सकाळी ६.३८ नंतर कुंभ.

चंद्र केंद्र हर्षल.

टीप:
नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष: (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
कामात नवीन उत्साह राहील. धाडसी निर्णय लाभदायक ठरतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक स्थिती सुधारेल.

वृषभ: (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
व्यवहारात संयम ठेवा. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. नियोजनबद्ध कामातून अपेक्षित यश मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.

मिथुन: (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
संवादकौशल्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. नवीन संपर्क लाभदायक ठरतील. व्यापारात प्रगती होईल.

कर्क: (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांची कृपा लाभेल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.

सिंह: (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
भाग्याची साथ लाभेल. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांसाठी दिवस अनुकूल आहे. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल.

कन्या: (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा. संशोधन आणि अभ्यासात प्रगती होईल. संयम लाभदायक ठरेल.

तुळ: (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
भागीदारीच्या कामात यश मिळेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल.

वृश्चिक: (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
कामाचा व्याप वाढेल. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नियमितपणा लाभदायक ठरेल.

धनु: (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
संततीकडून आनंददायी बातमी मिळेल. सर्जनशील कार्यात यश मिळेल. प्रेमसंबंधात मधुरता राहील.

मकर: (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
सकाळी ६.३८ पर्यंत राशीस्थानी चंद्रामुळे महत्त्वाची कामे पूर्ण करा. त्यानंतर लाभदायक संपर्क वाढतील. आर्थिक नियोजन यशस्वी होईल.

कुंभ: (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
सकाळी ६.३८ नंतर चंद्र राशीत प्रवेश करणार असल्याने आत्मविश्वास वाढेल. चंद्र-हर्षल केंद्र योगामुळे नवीन कल्पना आणि धाडसी निर्णय यशस्वी ठरतील. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल.

मीन: (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
खर्चावर नियंत्रण ठेवा. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. संयमाने घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. मानसिक शांतता लाभेल.

कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521

संबंधित बातम्या