असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य १७ ऑगस्ट
आजचे राशिभविष्य आणि आज जन्मलेल्या व्यक्तीची वैशिष्टये:-
रविवार, १७ ऑगस्ट २०२५. श्रावण कृष्ण नवमी/दशमी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. वर्षा ऋतू. दक्षिणायन. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी ४:३० ते संध्याकाळी ६.००
"आज चांगला दिवस आहे"
नक्षत्र: रोहिणी. आज जन्मलेल्या बाळाची राशी- वृषभ. (व्याघ्यात योग शांती)
१७ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर रवी आणि शनी या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचे विचार विधायक आणि क्रियाशील असतात. हिप्नॉटिझम, गूढ विद्या यांची तुम्हाला आवड असते. तुम्ही धाडसी, प्रभावी आणि बुद्धिमान आहात. संशोधन, ज्ञान याबद्दल तुम्हाला आवड आहे. तुम्हाला शास्त्रीय संगीताची आवड असते. उथळ संगीतापेक्षा गंभीर संगीत तुम्हाला आवडते. तुम्ही कडक शिस्तीचे भोक्ते आहात आणि कर्तबगार आहात. तुम्हाला शांतता आणि एकांत आवडतो. निसर्ग, फुले, रम्य देखावा, याची तुम्हाला ओढ असते. तुम्ही कधी कधी अति निराशावादी होतात. समाजापासून दूर राहणे पसंत करतात. भविष्याबद्दल तुम्हाला नेहमीच काळजी वाटत असते. तुम्ही अत्यंत धोरणी, हुशार आणि मुत्सद्दी आहात. तसेच महत्त्वाकांक्षी आणि दिर्घउद्योगी देखील आहात मात्र अति महत्त्वाकांक्षा असता कामा नये. तुम्हाला जी गोष्ट हवी असते त्यासाठी तुम्ही प्रचंड मेहनत घेतात. तुमच्यामध्ये चिवटपणा आहे मात्र त्याचबरोबर संशय वृत्ती देखील असते. तुम्ही अधिकार गाजवणारे आहात. अनेकदा तुमच्याबद्दल गैरसमज करून घेतला जातो. तुम्हाला दुर्बल लोकांबद्दल आपुलकी असते. तुम्ही न्याय प्रेमी आणि कायदा प्रेमी आहात मात्र तुम्हाला आयुष्यामध्ये सतत अडचणी आणि विलंब यांचा अनुभव येतो. आपण इतरांवर अधिकार गाजवावा किंवा आपल्याला मानसन्मान मिळावेत असे तुम्हाला मनातून नेहमी वाटत असते. इतरांकडून काम करून घेण्यात तुम्हाला अडचण येतात. जीवनामध्ये खिन्नता येते. तुम्ही निराश विचारांपासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. तुम्ही गर्विष्ठपणा आणि अहंकार टाळला पाहिजे.
व्यवसाय:- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, उच्च गणित, कोळसा, लाकूड, लोखंड, व्यवस्थापक, कंपनी सेक्रेटरी.
शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शनिवार.
शुभ रंग:- निळा, जांभळा, काळा.
शुभ रत्न:- इंद्रनील, मोती आणि हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा मंगळ आणि बुधाशी शुभ योग आहे. उत्तम ग्रहमान आहे. बऱ्याच दिवसांपासून रखडलेली घरगुती कामे आज पूर्ण होतील. भ्रमंती घडेल. स्पष्टवक्तेपणा आज प्रकर्षाने जाणवेल. वाहन जपून चालवा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) आज तुमच्याच राशीत चंद्र आहे. चैनीसाठी खर्च कराल. कलाकारांना संधी मिळतील. वाहन सुख लाभेल. कार्यक्षमता वाढेल. लेखकांना चांगला दिवस आहे. छोटे प्रवास घडतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) व्यय स्थानी चंद्र आहे. फारशी अनुकूलता नाही. आज घरातच सुटीचा आनंद घ्या. चर्चा, वादविवाद यात भाग घ्याल. तुमची चांगली छाप पडेल. कारखाने, रसायने यातील व्यक्तींना उत्तम लाभ होतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. आत्मविश्वास वाढेल. काम करण्याचा उत्साह येईल. तुमच्या प्रेमळ स्वभावाचा लाभ मिळेल. जुन्या ओळखीतून कामे होतील.
सिंह:- (मा, मी, मु मे, मो, टा, टी, टू, टे) नोकरी/व्यवसायाच्या जागी उत्तम अनुभव येतील. नेतृत्व कराल. राजकीय क्षेत्रात प्रगती होईल. काही अचानक लाभाचे योग् येतील. इच्छापूर्ती होईल. रत्ने खरेदी घडेल.
कन्या:- (टो,पा,पी,पू,षा, णा,ठा,पे,पो) नवमस्थानी चंद्र आहे. काही सुखद अनुभव येतील. आर्थिक आवक वाढेल. अचानक लाभ होतील. मान सन्मान मिळतील. आज तुम्ही कठोर भूमिका घ्याल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र ग्रहमान आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. सोबत हर्षल आहे. सावधपणे पावले टाका. कामाच्या ठिकाणी उत्तम सहकार्य मिळेल. वरिष्ठ खुश राहतील. कामानिमित्त प्रवास घडतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) सप्तम स्थानी चंद्र आहे. प्रगती साध्य होईल. छोटी सहल घडेल. गोर गरिबांना मदत कराल. अनुकूल राशीस्वामी मंगळ उत्तम द्रव्यार्जन करून देईन.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) व्यवसायिक लाभाचे योग आहेत. छोटे प्रवास घडतील. संवाद सकारात्मक होतील. जमीन व्यवहार पुढे सरकतील. मात्र सूर्य अष्टम स्थानी आहेत. दररोज सूर्य उपासना करा. आरोग्य सांभाळा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अन्नधान्य वाढेल. लॉटरीतून लाभ होतील. तुमच्या हातून आज दानधर्म घडणार आहे. व्यापार वाढणार आहे. स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्यास चांगला दिवस आहे.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र दिवस आहे. तुम्ही बुद्धिमान आहात पण व्यवहारी नाही. द्विधा मनस्थिती राहील. स्वतःच्या घराकडे ओढा राहील. तुमच्या ज्ञानाचा आणि अधिकाराचा लाभ होईल. शत्रूभय जाणवेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) व्यवसाय वाढीसाठी आज चांगले ग्रहमान आहे. तुमचा अंदाज अचूक येईल. नियोजनाप्रमाणे कामे होतील. सौख्य लाभेल. सहलीतून आनंद मिळेल. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ व्यतीत कराल. जुने वाद मिटतील.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.
व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या
कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521