असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य २२ ऑगस्ट
शुक्रवार, २२ ऑगस्ट २०२५. श्रावण कृष्ण चतुर्दशी/अमावस्या. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज वर्ज्य दिवस आहे. दर्श - पिठोरी अमावस्या (पोळा)
चंद्रनक्षत्र - आश्लेषा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - कर्क. (शकुनी, चतुष्पाद करण शांती)
२२ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर हर्षल, रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची शरीरयष्टी उंच असून डोळे सुंदर असतात. स्वभावात अस्थिरताअसते आणि काही वेळेस अकल्पनिय वागणे असते. भिन्न लिंगी व्यक्तींपासून तुम्हला फायदा होतो. कौटुंबिक जीवन सुखाचे असते. आयुष्यातील ४० नंतर भाग्योदय होतो.पूर्वार्ध कष्टाचा असतो. प्रेमात अनेक अडथळे येतात. आयुष्यात काही असाधारण घटना घडू शकतात. जीवनात अनेक बदल घडतात मित्र, मैत्रिणी देखील बदलत राहतात. स्वभाव चिकित्सक आणि तर्कनिष्ठ आहे. शास्त्रीय पुस्तके, वाङ्मय, याची तुम्हाला आवड आहे. वयाच्या ३१ नंतर तुमचा भाग्योदय होतो. तुम्ही स्वभावाने गरीब दिसत असलात तरी आतून तुम्ही हट्टी असतात. विचाराने स्वतंत्र असतात. प्रत्येक गोष्ट आपल्या राहतात असावी असे तुम्हाला वाटते. तुमच्या योजना तुम्ही काटेकोरपणेआखतात आणि त्यात तुम्हाला यश येते. धोक्यांना सामोरे जाणे तुम्हाला आवडते. तुमच्यात मोठेपणा आणि प्रतिष्ठा असते. व्यवसायात तुम्ही मोठ्या पदावर जातात. तुम्ही उंच आणि देखणे असतात. उत्साह जोमाने प्रगती हे तुमचे वैशिष्ट्ये आहेत. तुमचे आयुष्य अनेक चळवळींनी भरलेले आहे. तुम्हाला अनपेक्षित गोष्टींचा नेहमी अनुभव येतो. तुमच्या मनाची पातळी वरच्या दर्जाची आहे. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक आहे. तुम्ही तुमचे स्वतःचे विचार इतरांवर लादत असतात. तुम्ही वादविवाद टाळले पाहिजेत. त्यामुळे गुप्त शत्रू निर्माण होत असतात आणि गैरसमज पसरत असतात. तुम्हाला थेटर्स, सिनेमा आणि भ्रमंती याची आवड असते. तुम्ही हरहुन्नरी आहात. तुमच्या वागण्यामध्ये एक प्रकारचा रुबाब आहे. आणि तुमचे विचार स्वतंत्र आहेत. तुमच्या आयुष्यात अनेक बदल घडतात मात्र ते तुमच्या चांगल्यासाठीच असतात. परंपरा, रूढी आणि बंधने तुम्ही तोडून टाकतात. तुमच्या मध्ये मनाचा एककल्लीपणा जाणवतो. तुम्ही इतरांपुढे संपूर्ण व्यक्त होत नाहीत मात्र सर्व प्रकारच्या अडचणींवर तुम्ही सक्षमपणे मात करतात. न आवडणाऱ्या गोष्टींचा तुम्ही जोरदार विरोध करतात. तुमच्या विचारांमध्ये आग्रहीपणा आणि अट्टाहास असतो. तुम्ही सतत कार्य मग्न असतात.
व्यवसाय:- यंत्रसामुग्री, विज्ञान, इलेक्ट्रिसिटी, वाहतूक यंत्रणा, इंजिनिअर, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर, संशोधन, कारखानदारी, हस्तसामुद्रिक, ज्योतिषी, अध्यात्म, बँकिंग सल्लागार.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, शनिवार.
शुभ रंग:- निळा, पांढरा, मरून.
शुभ रत्न:- हिरा, पोवळे, मोती.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चतुर्थ चंद्र आहे. दिलेला शब्द पाळाल. अचानक लाभ होतील. साडेसाती जाणवेल. पाळीव पशूंचा लाभ होईल. सामाजिक कार्यात भाग घ्याल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) व्यावसायिक लाभ होतील. काही सुखद अनुभव येतील. आज परिस्थिती अनुकूल होईल. निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्याल. विनाकारण वाद टाळा.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. वेळ दवडू नका. आर्थिक लाभ होतील. भौतिक नी आध्यत्मिक सुखे मिळतील. वक्तृत्व चमकेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) तुमच्याच राशीत चंद्र आहे. चांगला दिवस आहे. नोकरीत प्रगती होईल. नवीन संधी चालून येतील. भागीदारीत यश मिळेल. बुद्धी चातुर्य वापराल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. चांगली बातमी समजेल. प्रवास कार्यसाधक होतील. खर्च वाढेल. वाहन दुरुस्ती करावी लागू शकते. मौल्यवान वस्तू सांभाळा.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल दिवस आहे. आर्थिक प्रगती बऱ्यापैकी होणार आहे. घरगुती समस्या सोडवाल. प्रवासातून लाभ होतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) मन प्रसन्न राहील. आर्थिक प्रगती होईल. मनासारखी कामे होतील. आरोग्याचे प्रश्न हळूहळू सुटू लागतील. कामानिमित्त भ्रमंती होईल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल दिवस आहे. कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल. आर्थिक नफा वाढेल. कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. शत्रूचा त्रास जाणवेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अष्टम स्थानी चंद्र आहे. महत्वाचे निर्णय जपून घ्यावेत. आज आर्थिक प्रगती होईल. अनपेक्षित लाभ होतील. पत्नीचा हट्ट आज पूर्ण करावा लागेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) ग्रहमान अनुकूल आहे. कौटुंबिक कामात वेळ जाईल. स्वप्ने साकार होतील. सामाजिक कार्य कराल. इतरांच्या मदतीने कामे पूर्ण करावी लागतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) षष्ठ स्थानी चंद्र आहे. उद्योग/ व्यवसायात उत्तम प्रगती होईल. आर्थिक भरभराट होईल. नावलौकिक वाढेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. राहुचा जप करा.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) भ्रमंती घडेल. कला क्षेत्रातून लाभ होतील. सहकार्य लाभेल. अचानक फायदा होईल. एखादी चांगली बातमी समजेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)