असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य ११ ऑगस्ट

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य ११ ऑगस्ट
  • Positive News
  • ऑगस्ट 11 2025

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य ११ ऑगस्ट

सोमवार, ११ ऑगस्ट २०२५. श्रावण कृष्ण द्वितीया/तृतीया. वर्षा ऋतू. शके १९४७, संवत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००

"आज उत्तम दिवस आहे." शिवमूष्ठी- मूग.  

चंद्र नक्षत्र - शततारका (राहू)/ (दुपारी १.०० नंतर) पू. भा.(गुरू) आज जन्मलेल्या बाळाची राशी - कुंभ. (अतिगंड योगाची शांती करून घेणे) 

११ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

     तुमच्यावर चंद्र आणि रवी या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. या तारखेला एक विशिष्ट शक्ती प्राप्त झालेली आहे. तुम्हाला उपजतच वरच्या दर्जाची कल्पनाशक्ती आहे. उच्च ध्येयवाद आहे. तुमच्यात विद्युतशक्ती प्रमाणे स्पंदने असून इतरांना तुमच्याबद्दल विलक्षण आकर्षण वाटते. अनेक समारंभात तुम्हाला मनाचे स्थान प्राप्त होते. सूक्ष्म व गूढ गोष्टींकडे तुमचा ओढा असतो. तुमचा कारक ग्रह चंद्र असल्याने तुमच्याकडे मनाची सुप्त शक्ती आहे. पुढे होणाऱ्या घटनांचे आकलन तुम्हाला आधीच होऊ शकते. आयुष्यात सर्वसाधारण यश मिळते. प्रेमातही यश मिळते. तुम्ही मित्रांशी सच्चेपणाने वागतात. गुप्त शत्रूंपासून तुम्ही सावध राहिले पाहिजे. तुमच्यात प्रगल्भ कल्पनाशक्ती आहे. तुम्ही योग्य तर्हेने विचार करणारे, नि:स्वार्थी असून इतरांच्या भावनांची कदर करतात. कोणत्याही कामातील उद्दीष्ट न विसरता त्यातील सर्व बारीक सारीक गोष्टी तुम्ही त्यात उतरवतात. तुम्ही उत्तम सहकारी असतात. तुम्ही शास्त्रशुद्ध, व्यवस्थित आणि टापटीप असतात. तुम्ही स्वप्नाळू आणि एकांतात रमणारे आहात. तुमच्यात प्रतिष्ठा, मोठपण, कल्पकता, अधिकार या गोष्टी असतात. मानवी जीवनाचे तुम्हाला उत्तम आकलन होते. व्यवसायात तुम्ही सर्वोच्च पद गाठू शकतात. रंगमंच, सिनेमा, सहली यांचे तुम्हाला आकर्षण असते. तुमच्यात उत्स्फूर्त आणि उपजत कला असतात. तुमच्या वागण्यात रुबाब असतो. तुम्हाला भरपूर मित्र असतात आणि स्त्रियांपासून तुम्हाला फायदा होतो. तुम्ही लेखक म्हणून प्रसिद्धीस येतात. तुमचा भाग्योदय पाणथळ जागी होतो. लोकांच्या कल्याणाचा तुम्हाला ध्यास असतो. तुम्ही प्रेमळ आणि दयाळू आहात. तुम्हाला उपजतच वरच्या दर्जाची कल्पनाशक्ती आणि उच्च ध्येयवादअसतो. इतरांना तुमच्याबद्दल विलक्षण आकर्षण असते. समारंभात तुम्हाला मानाचा स्थान असते. सूक्ष्म आणि गूढ बाबींकडे तुमचा ओढा असतो.  मनाची सूक्ष्म शक्ती तुमच्याजवळ असते. पुढे घडणाऱ्या घटना अनेकदा तुमहाला आधीच समजतात. आयुष्यात सर्वसाधारण यश मिळते. मित्रांशी तुम्ही प्रामाणिक असतात. गुप्त शत्रूंपासून सावध राहिले पाहिजे. तुम्ही मानसिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या उच्च प्रतीचे आहात. तुम्ही ध्येयवादी असून तुमच्या मध्ये जबरदस्त कल्पनाशक्ती आहे. इतरांनी तयार केलेल्या आराखड्याची तुम्ही प्रत्यक्षात चांगल्या प्रकारे रूपांतर करू शकतात. तुम्ही विचारी आहात आणि निस्वार्थी तसेच विचारवंत देखील आहात. इतरांच्या भावनांचे तुम्ही कदर करतात. तुम्ही एक उत्तम सहकारी असतात. कोणत्याही कामाचे तुम्ही उद्दिष्ट विसरत नाहीत. तुमच्यामध्ये व्यवस्थितपणा आणि टापटीप आहे. तुम्हाला बऱ्याच वेळेला समाजापासून एकटे राहणे आणि स्वप्नात रंगणे आवडते. तुमच्यावर प्रतिष्ठा, कल्पकता आणि अधिकार असतो. मानवी जीवनाचे तुम्हाला उत्तम आकलन होते. कोणत्याही व्यवसाय मध्ये तुम्ही सर्वोच्च पद गाठू शकतात. तुम्हाला थिएटर्स, सहली, प्रवास, सिनेमा, भ्रमंती यांची आवड असते. तुमच्यामध्ये अनेक कला असतात. तुमच्या वागण्यामध्ये एक प्रकारचा रुबाब असतो. तुम्ही लोकांना आकर्षित करून घेऊ शकतात.

व्यवसाय:-  संगीतकार, कथालेखक, कादंबरी लिखाण, पेंटिंग्स, कविता, नाट्यकृती लिहिणे, द्रव पदार्थ संबंधित व्यवसाय, ज्योतिषी, केमिस्ट, प्रयोगशाळा संबंधित व्यवसाय, दंतवैद्य, बँकिंग, सर्जरी.

शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, शुक्रवार.

शुभ रंग:- पांढरा, निळा, बिस्किटी.

शुभ रत्न:- मोती आणि हिरा.
 
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
 
मेष:- सूर्याचा चंद्राची अशुभ तरगुरू आणि शुक्राशी शुभ  योग आहे. प्रापंचिक सुख मिळेल. संततीशी सुसंवाद साधाल. उत्तम सहकार्य लाभेल. गुंतवणूक करताना काळजी घ्या. सामाजिक कार्य करताना कोणी दुखावणार नाही याची काळजी घ्या.   
     
वृषभ:-  आज कामाचा ताण वाढणार आहे. मात्र मनासारखी कामे होतील. सामाजिक कार्यात भाग घ्याल. नोकरीत कामाचा जोर वाढेल. कर्जे मंजूर होतील. आर्थिक चिंता मिटेल. 
 
मिथुन:- नवम स्थानी चंद्र आहे. पुण्याई मदत करेल. पराक्रम गाजवाल. दबदबा वाढेल. सिद्धी प्राप्त होतील. त्याच बरोबर भौतिकसुखे मिळतील.  

कर्क:- अनुकूलता नाही. अष्टम स्थानी चंद्र आहे. मोठी जोखीम घेऊ नका. वादविवाद टाळा. अचानक काही लाभ होतील. एखादी जवळची व्यक्ती तुम्हाला मदतीसाठी हाक मारेल. खर्च वाढेल अंतर त्याची काळजी करू नका.
 
सिंह:- सप्तम स्थानी चंद्र आहे. अनुकूल ग्रहमान आहे. आत्मविश्वास भरपूर वाढलेला आहे. गुरू आणि शुक्र अनुकूल आहेत. मनासारखे यश मिळेल. आनंदी रहाल. वेळ दवडू नका, आज महत्वाची कामे पूर्ण करा.  
  
कन्या:- आर्थिक लाभ होतील. कामाचा व्याप वाढेल. नोकरीच्या ठिकाणी महिलांकडून लाभ होतील. वरिष्ठ खुश राहतील. ज्या आमंत्रणाची तुम्ही वाट बघत आहात त्यास काहीसा वेळ लागेल.   
 
तुळ:- पंचम स्थानी चंद्र आहे.  सुखद अनुभव येतील. उत्साह वाढेल. संतती बाबत चांगली बातमी समजेल. गुंतवणूक करण्यास चांगला दिवस आहे. तीर्थाटन घडेल.
 
वृश्चिक:- मौल्यवान खरेदी होईल. कामाचा पसारा वाढेल. ऐनवेळी नवीन जबाबदारी येऊन पडेल. हरवलेली वस्तू सापडेल. आर्थिक बाजू भक्कम होईल.

धनु:- काही विशेष घटना घडतील. नवीन संधी चालून येतील. प्रवास होतील. मौल्यवान खरेदी होईल. एखाद्या कलेची आवड निर्माण होईल. 
 
मकर:- संमिश्र कालावधी आहे. आध्यत्मिक लाभ होतील. विनाकारण वादात पडू नका. कुटुंबास वेळ द्या. क्रीडा क्षेत्रात यश मिळेल. सरकारी कामे किंवा कोर्ट यात अपेक्षित यश मिळणार नाही.   
 
कुंभ:- तुमच्याच राशीत चंद्र आहे. भेटवस्तू मिळतील. येणी वसूल होतील. आत्ममग्न व्हाल. नवीन मार्ग सापडतील. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल. संततीकडून सुखद समाचार मिळतील.  
 
मीन:- संमिश्र दिवस आहे. अजूनही व्यय स्थानी चंद्र आहे. व्यवसायात लाभ होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. नात्यातून लाभ होतील. दानधर्म करावा.

 - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या

कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
 

संबंधित बातम्या