९ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर मंगळ आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे, तुम्ही आक्रमक, धाडसी, तडफदार, कार्यक्षम आणि लढावृ वृत्तीचे आहात. इतरांची कुरापत काढणे तुम्हाला आवडते. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून स्वतःच्या विषयाची तुम्हाला पूर्ण माहिती असते. तसेच स्वकर्तृत्वाबद्दल तुम्हाला पूर्ण विश्वास असतात. स्वतःचे निर्णय तुम्ही स्वतःच घेतात. ध्येयपूर्ती झाल्याशिवाय तुम्ही थांबत नाहीत. तुमच्यामध्ये उतावळेपणा असतो. तुम्ही संभाषणचतुर असतात. जीवनात तुम्हाला अधिकार आणि मानसन्मान मिळतात. सहसा तुम्ही स्वतःची चूक कधीही मान्य करत नाहीत. तुम्हाला मैदानी खेळांची आणि शक्तिशाली व्यायामाची आवड असते. दुर्बल लोकांना वर दया करण्यात तुम्हाला एक सुप्त आनंद मिळतो. आजारी लोकांना बरे करण्याची तुमच्यामध्ये शक्ती असते. तुम्ही तापट असला तरी शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे तुम्ही स्वतःवर ताबा ठेवू शकतात. तुमचे विचार तुम्ही ठामपणे मांडतात आणि तुमच्या मध्ये धैर्य असते. तुम्हाला प्राणी प्रिय असतात आणि कायद्याचे पालन करणे आवडते. तुम्ही अत्यंत विश्वासू आणि जबाबदारीच्या जागा सांभाळू शकतात. तुमची मानसिक शक्ती अफाट आहे. प्रवासामुळे तुमचा दृष्टिकोन विशाल होतो. तुम्ही विचारवंत आणि अभ्यास वृत्तीचे आहात. तुमचे विचार काळाच्या पुढे असतात. त्यामुळे इतर लोक तुमचा सल्ला घेतात. तुमच्या आवडी निवडी बाबत तुम्ही अत्यंत ठाम असतात. तुम्ही अहंकार टाळला पाहिजे.
व्यवसाय:- हॉटेल, बेकरी, संगीतकार, दागिने विक्री, आर्किटेक्ट, गृह सजावट, लोखंडाशी संबंधित व्यवसाय, इंजिनिअर, बांधकाम क्षेत्र मिल्ट्री, पोलीस, गुप्तहेर.
शुभ दिवस:- सोमवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग:- तांबडा, पांढरा, पिवळा.
शुभ रत्न:- पुष्कराज, मोती, माणिक.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
शुक्रवार, ९ ऑक्टोबर २०२६. भाद्रपद कृष्ण चतुर्दशी. पराभव नाम संवत्सर, शके १९४८. वर्षा ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज वर्ज्य दिवस आहे.
नक्षत्र - उत्तरा / हस्त. आज जन्मलेल्या बाळाची राशी - कन्या. (विष्टी करण, शकुनी करण)
चंद्र लाभ मंगळ, चंद्र त्रिकोण हर्षल, चंद्र प्रतियुती नेपच्यून, बुध षडाष्टक शनी.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक लाभ होतील. नवीन संधी प्राप्त होतील. कामात उत्साह राहील. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) महत्त्वाची कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. प्रवास कार्यसाधक होतील. नवीन वस्तूची खरेदी होईल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) बौद्धिक क्षमता वापरून अडचणींवर मात कराल. नोकरीच्या ठिकाणी बदल संभवतात. अधिकार वाढतील. आर्थिक बाजू मजबूत होईल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. वरिष्ठांची पसंती लाभेल. दूरचे प्रवास घडतील. मन प्रसन्न राहील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना सावधगिरी बाळगा. घरातील ज्येष्ठ व्यक्तीची काळजी घ्या. कामानिमित्त भटकंती होईल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) तुमच्याच राशीत चंद्र आहे. आत्मविश्वास वाढेल. चंद्र-मंगळाचा शुभ योग आर्थिक लाभ देईल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. प्रवासाचे योग आहेत.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अर्थकारण सुधारेल. नवीन संधी प्राप्त होतील. प्रतिष्ठेसाठी खर्च कराल. सामाजिक क्षेत्रात मान मिळेल. आरोग्य सांभाळा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) नवीन विद्या प्राप्त होतील. गूढ बाबींचे आकर्षण वाटेल. संततीची काळजी घ्या. कोणताही जुगार खेळू नका.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अधिकाराचा लाभ मिळेल. कनिष्ठ सहकारी मदत करतील. घरगुती कामासाठी वेळ द्याल. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल ग्रहयोग सौख्य प्रदान करतील. छोटे प्रवास घडतील. ऐश्वर्य प्राप्त होईल. आर्थिक लाभ होतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक स्थिती सुधारेल. स्थावर संपत्तीचे प्रश्न सुटतील. पूर्वजांचे आशीर्वाद लाभतील. कौटुंबिक सौख्य मिळेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) दिवस संमिश्र आहे. मानसिक संभ्रम टाळा. कामात अडथळे येऊ शकतात. खर्च वाढेल. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.
कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521