असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य ,५ ऑक्टोबर २०२६

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य ,५ ऑक्टोबर २०२६
  • Positive News
  • ऑक्टोबर 5 2026

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य,५ ऑक्टोबर २०२६

५ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

     तुमच्यावर बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असते. तुम्ही स्वतः कलाकार असून कला प्रिय देखील आहात. मनाने तुम्ही उदार आणि विचारी असून इतरांची कदर करतात. तुमच्या सानिध्यात आल्यास इतरांना आनंद होतो. तुमचे वागणे आणि बोलणे मोहक आणि आकर्षक आहे. तुम्ही समजूतदार असून विविध खेळांमध्ये यश मिळते. इतरांचे कच्चे दुवे तुम्ही बरोबर हेरतात. स्वतःचे विचार दुसऱ्याला समजून सांगायची तुम्हाला बरीच हौस असते. तुमचे उद्दिष्ट ठाम असते आणि त्या दिशेने तुम्ही मार्गक्रमण करतात. अत्यंत उच्च प्रतीचे कपडे, वाहने, घरे, दाग दागिने आणि सुगंध द्रव्य तुम्ही वापरत असतात. विविध समारंभांमध्ये भाग घेणे आणि समाजात मिसळणे तुम्हाला आवडते. आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन विशाल आणि संयमी आहे. इतरांना मदत करणे तुम्हाला मनापासून आवडते. धर्म आणि तत्वज्ञान तसेच प्रवास याची तुम्हाला आवड आहे.

व्यवसाय:-  अकाउंट, बँकिंग, दळणवळण, वाहन विक्री, इलेक्ट्रॉनिक्स, दागिने विक्री, कपडे, कॉस्मेटिक्स.

शुभ दिवस:- बुधवार, शुक्रवार, शनिवार.

शुभ रंग:- पांढरा, निळा, हिरवा.

शुभ रत्न:- पाचू, हिरा, मोती.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*

*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

सोमवार, ५ ऑक्टोबर २०२६. भाद्रपद कृष्ण दशमी. पराभव नाम संवत्सर. वर्षा ऋतू. शके १९४८. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

चंद्र नक्षत्र - पुष्य. आज जन्मलेल्या बाळाची राशी - कर्क.

"दुपारी ३.०० वाजेपर्यंत चांगला दिवस आहे." राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००

दशमी श्राद्ध.

रवी लाभ चंद्र, चंद्र युती मंगळ, चंद्र केंद्र बुध, चंद्र केंद्र शुक्र, चंद्र त्रिकोण शनी, चंद्र लाभ हर्षल, चंद्र त्रिकोण नेपच्यून.

मेष:- अनुकूल दिवस आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कुटुंबातील व्यक्तींशी संवाद चांगला राहील. मात्र भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका.

वृषभ:- शुभ ग्रहमान आहे. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. व्यवसायात नवीन संधी मिळतील. आर्थिक स्थिती सुधारेल. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रवासाचे योग येतील.

मिथुन:- संमिश्र दिवस आहे. कामाचा ताण जाणवू शकतो. आर्थिक व्यवहारातून लाभ होतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका.

कर्क:- तुमच्याच राशीत चंद्र असल्याने दिवस उत्साहवर्धक आहे. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक लाभ होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मात्र रागावर नियंत्रण ठेवा.

सिंह:- अनुकूल दिवस आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील. वरिष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. आर्थिक लाभ होतील. रखडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्याची काळजी घ्या.

कन्या:- लाभदायक दिवस आहे. व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक व्यवहारातून फायदा होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस चांगला आहे. अनावश्यक खर्च टाळा.

तुळ:- शुभ दिवस आहे. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळेल. कामात यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. महत्त्वाचे निर्णय दुपारी ३.०० वाजेपर्यंत घेणे हिताचे ठरेल.

वृश्चिक:- अनुकूल दिवस आहे. धाडसी निर्णय घ्याल. व्यवसायात नवीन संधी मिळतील. आर्थिक लाभ होतील. वरिष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. मात्र रागावर नियंत्रण ठेवा.

धनु:- संमिश्र दिवस आहे. काही महत्त्वाची कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ होतील. प्रवासाचे योग येतील. मानसिक ताण जाणवू शकतो. कुटुंबातील व्यक्तींशी संवाद साधताना संयम ठेवा.

मकर:- दिवस चांगला आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. नवीन जबाबदाऱ्या मिळतील. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.

कुंभ:- लाभदायक दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. व्यवसायात प्रगती होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. नवीन कामांना सुरुवात करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. मात्र खर्चाचे नियोजन करा.

मीन:- अनुकूल दिवस आहे. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आहे. धैर्याने निर्णय घ्याल. आर्थिक लाभ होतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. वरिष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल.

-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521.

संबंधित बातम्या