३० सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर गुरु आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. शैक्षणिक आणि व्यवस्थपकीय क्षेत्रात तुम्ही चमक दाखवतात. तुम्ही शांत आणि प्रामाणिक आहात. कृतिशील असूनही अस्वस्थ असतात. तुमच्यात अभिमन आणि तपस्या आहे. धर्मादाय संस्थांमध्ये तुमचा संबंध येतो. वयाच्या ३० नंतर भाग्योदय होतो. क्लब्ज, सिनेमा, नाटक, प्रवास यांची आवड असते. कला आणि संगीत तसेच गृह सजावट यांची आवड असते. तुम्ही प्रेमळ असून अपत्यांबद्दल विशेष प्रेम असते. तुमचा उत्साह दांडगा असतो. तुमच्या भोवती एक प्रकारचे वलय असून लोकांना मोहित करू शकतात. पुरुष व स्त्रिया या दोघांमध्ये तुम्ही लोकप्रिय असतात. वडिलोपार्जित संपत्तीत तुम्हाला वाटा मिळतो. आध्यत्मिक वृत्ती असते. इतरांना तुम्ही योग्य सल्ला देतात. आयुष्यात उशिरा प्रसिद्धी आणि मन सन्मान मिळतात. तुमचा कल सुखासीन जीवनाकडे असतो. इतरांचे बारीक दोष तुम्ही सहजगत्या काढू शकतात. तुम्हाला आपोआप अधिकार आणि प्रतिष्ठा मिळते. इतरांच्या कारस्थानाला तुम्ही बळी पडतात. तुमच्यात अति महत्वाकांक्षा असते. जास्त बडबड केलेली तुम्हाला आवडत नाही. अनाठायी काळजी कर्णयचा तुमचा स्वभाव असतो. विवाहानंतर भाग्योदय होतो. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून मान मरातब आणि प्रतिष्ठा या गोष्टींची जपणूक करतात. तुम्हाला शुद्ध प्रेम आणि न्याय आवडतो. तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. स्वतःबद्दल तुम्हाला पूर्ण विश्वास असतो. तुम्ही धर्माची चिकित्सा डोळसपणे करतात. तुम्ही टापटीप, व्यवस्थित आणि काटेकोर असतात. तुमची बुद्धिमत्ता व्यवहारात उपयोगी पडते. इतरांसाठी तुम्ही कष्ट करतात. तुम्हाला क्रीडा प्रकार आणि गुढविद्या आवडतात तसेच धर्म आणि तत्वज्ञान याची देखील आवड आहे. जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन विशाल असून तुम्ही त्याकडे संयमाने बघतात. तुमची उपस्थिती इतरांना आवडते. तुम्ही सावधपणे पावले टाकतात आणि उत्तम सल्लागार असून जीवनातील समस्यांवरती योग्य मार्ग शोधून काढतात.
व्यवसाय:- राजकीय नेते, न्यायाधीश, सचिव, धार्मिक शिक्षक, डॉक्टर, केमिस्ट, शैक्षणिक क्षेत्र.
शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार.
शुभ रंग:- पिवळा, जांभळा आणि हिरवा.
शुभ रत्न:- पुष्कराज, अमेथीस्ट आणि लसण्या.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
बुधवार, ३० सप्टेंबर २०२६. भाद्रपद कृष्ण चतुर्थी / (दुपारी २.५६ नंतर) पंचमी. पराभव नाम संवत्सर. शके १९४८. वर्षा ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
"आज वर्ज्य दिवस आहे."
नक्षत्र - भरणी / सकाळी ७.३७ नंतर कृत्तिका. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मेष / दुपारी १.१४ नंतर वृषभ. (वज्र योग)
(चतुर्थी - पंचमी श्राद्ध)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
चंद्र लाभ मंगल, चंद्र लाभ नेपच्यून.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) वर्ज्य दिवस आहे. कामात काही अडथळे येऊ शकतात. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा. महत्त्वाचे निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) दिवस संमिश्र आहे. कामाचा ताण जाणवेल. दुपारनंतर परिस्थितीत सुधारणा होईल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) दिवस वर्ज्य आहे. कामे पूर्ण करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. अनावश्यक खर्च टाळा. महत्त्वाच्या व्यवहारात घाई करू नका.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. कामात अडथळे येऊ शकतात. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) दिवस चांगला असला तरी आजचा दिवस वर्ज्य आहे. कामात प्रगतीसाठी प्रयत्न करावे लागतील. आर्थिक व्यवहार जपून करा.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक बाबतीत सावध राहा. कामात विलंब होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. अनावश्यक वाद टाळा.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) दिवस संमिश्र आहे. काही कामे मार्गी लागतील, तर काही कामांसाठी प्रतीक्षा करावी लागेल. खर्चाचे नियोजन करा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) कामात अडथळे येऊ शकतात. संयमाने निर्णय घ्या. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. कौटुंबिक सहकार्य मिळेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) दिवस वर्ज्य आहे. नवीन कामे सुरू करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. प्रवासात काळजी घ्या. आर्थिक बाबतीत घाई करू नका.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) कामाचा ताण वाढू शकतो. वरिष्ठांशी व्यवहार करताना संयम ठेवा. आर्थिक स्थिती स्थिर राहील. कुटुंबासाठी वेळ द्याल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र दिवस आहे. मित्रांचे सहकार्य मिळेल. कामातील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) दिवस संमिश्र आहे. कामात काही अडथळे येतील, मात्र प्रयत्न सुरू ठेवा. आर्थिक व्यवहार जपून करा. कौटुंबिक वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.