असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य, २८ सप्टेंबर २०२६.

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य, २८ सप्टेंबर २०२६.
  • Positive News
  • सप्टेंबर 28 2026

Share on  

  असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य, २८ सप्टेंबर २०२६.

२८ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

     तुमच्यावर रवी आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची वृत्ती स्वप्नाळू असून वृत्ती गंभीर आहे. शैक्षणिक संस्था, दवाखाने यांच्याशी तुमचा संबंध येतो. तुमच्याभावना तुम्हाला सहजपणे व्यक्त करता येत नाहीत. इतरांचा त्यामुळे गैरसमज होतो. सामाजिक आणि वैयक्तिक जीवनात तुम्हाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. व्यावसायिक जीवनात अनपेक्षित बदल होतात.  तुमचा जन्म चांगल्या आणि श्रीमंत घराण्यात होतो.  तुम्हाला संशोधन करण्याची आवड असते.  तुमचं स्वभाव तापट आणि हेक्त असू शकतो. स्वभाव उतावळा असल्याने प्रेमप्रकरणात अपयश येऊ शकते. तुम्हा अधिकार आणि प्रतिष्ठा मिळतात. इतरांची लुडबुड तुम्हाला सहन होत नाही. तुम्ही इतरांची परीक्षा उत्तमपणे करू शकतात. मित्र आणि नातेवाईक यांच्या गुप्त गोष्टी तुम्ही बाहेर बोलत नाहीत. तुमचा सल्ला व्यावहारिक असतो. घराकडे फारसा ओढा नसतो. तुमच्या कामात तुम्ही अभयसू असतात. तुमचा स्वभाव  धडपड्या, बढाईखोर आणि अति महत्वाकांक्षी असतो. व्यवसायात आणि नोकरीत तुम्हाला उत्तम यश मिळते. इतरांकडून तुम्हाला योग प्रतिसाद मिळत नाही. तुमची अभिरुची अत्यंत उच्च असते. तुम्ही हुशार, बुद्धिमान, शास्त्राची आवड असलेले आहात. तुमची वृत्ती व्यापारी आहे. तुमचा कामाचा झपाटा मोठा असतो. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असून क्रीडा प्रकारांची आवड आहे. स्वतःचे विचार तुम्ही मित्रांना उत्तम प्रकारे समजून सांगू शकतात. एखाद्या कार्यात यश कसे मिळवावे याचे तुम्ही उत्तम पूर्वनियोजन करतात. तुम्हाला गूढ विद्या आवडतात. तुम्ही एक कलाकार आहात आणि जीवनाच्या सौंदर्याबद्दल तुम्हाला ओढ आहे. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. नीती अनीती आणि परंपरा याच्या कल्पना तुमच्या जरा वेगळ्या असतात. तुम्ही सतत उद्योगप्रिय असतात. तुमच्यामध्ये उत्साह आहे तुम्ही इतरांचा आदर करतात. इतरांच्या गुप्त गोष्टींचा तुम्ही बाहेर उच्चार करत नाहीत. तुमच्याशी सल्लामसलत केल्यास तुमचे मित्र निराशा आणि तणाव यापासून मुक्त राहतात. तुम्ही एक उत्तम सल्लागार आहात. सर्व प्रकारच्या लोकांमध्ये तुम्ही मिसळतात. तुम्ही फारसा सखोल अभ्यास करत नाहीत मात्र वक्तृत्व चांगले असते. तुमच्या संशोधनातून जगाला फायदा होतो. इतरांच्या कल्याणासाठी तुम्ही काम करत असतात. तुमची स्मरणशक्ती चांगली आहे. तुमचे व्यक्तिमत्व दुहेरी आहे. तुम्ही एकाच वेळी व्यवहारी देखील असतात आणि ध्येयवादी सुद्धा असतात. मोठेपणा आणि प्रसिद्धी याची हाव टाळली पाहिजे. 
     

व्यवसाय:-  जाहिरात माध्यम, वृत्तपत्र, इंटरियर डेकोरेटर, चित्रपट निर्माते, चित्रपट दिग्दर्शक, स्टुडिओ मॅनेजर, वेशभूषा सल्लागार, प्रोग्रॅम डायरेक्टर, बँकिंग, औषध, वैद्यकीय क्षेत्र, वकील.

शुभ दिवस:- रविवार आणि गुरुवार.

शुभ रंग:- सोनेरी, पिवळा, नारंगी आणि जांभळा.

शुभ रत्न:- पाचू आणि माणिक.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*

*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

सोमवार, २८ सप्टेंबर २०२६. भाद्रपद कृष्ण द्वितीया/तृतीया. वर्षा ऋतू. पराभवनाम संवत्सर. शके १९४८.

नक्षत्र - रेवती / सकाळी १०.१६ नंतर अश्विनी. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मीन / (सकाळी १०.१६ नंतर) मेष.

ध्रुव / व्याघात योग. 

द्वितीया श्राद्ध.

"आज शुभ दिवस आहे."

रवी ष चंद्र, रवी त्रिकोण हर्षल, चंद्र केंद्र मंगल, चंद्र प्रतियुती बुध.

मेष:- अनुकूल दिवस आहे. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल.

वृषभ:- दिवस चांगला आहे. आर्थिक व्यवहारातून फायदा होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

मिथुन:- शुभ दिवस आहे. नवीन संधी मिळतील. महत्त्वाचे निर्णय घेता येतील. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल.

कर्क:- संमिश्र दिवस आहे. कामात यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. मात्र कौटुंबिक बाबतीत संयम ठेवावा.

सिंह:- अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायात प्रगती होईल. नवीन कामे सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. आरोग्याची काळजी घ्या.

कन्या:- दिवस चांगला आहे. कामात यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल.

तुळ:- शुभ दिवस आहे. मन प्रसन्न राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक:- अनुकूल दिवस आहे. कामात प्रगती होईल. नवीन संधी मिळतील. मात्र खर्चाचे प्रमाण वाढू शकते.

धनु:- दिवस लाभदायक आहे. व्यवसायात वाढ होईल. नवीन ओळखी उपयोगी ठरतील. धाडसी निर्णय घेताना विचारपूर्वक पाऊल उचलावे.

मकर:- दिवस चांगला आहे. कामात यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. कुटुंबातील एखादी शुभवार्ता आनंद देऊ शकते.

कुंभ:- संमिश्र दिवस आहे. कामे पूर्ण करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा.

मीन:- अनुकूल दिवस आहे. मोठी कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. आत्मविश्वास वाढेल आणि नवीन कामांना सुरुवात करण्यास उत्साह राहील.

-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521.

संबंधित बातम्या