वैनगंगा–नळगंगा नदीजोड प्रकल्पाला गती द्यावी!

वैनगंगा–नळगंगा नदीजोड प्रकल्पाला गती द्यावी!
  • Positive News
  • सप्टेंबर 9 2025

Share on  

वैनगंगा–नळगंगा नदीजोड प्रकल्पाला गती द्यावी!

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पासंदर्भात सादरीकरण बैठक संपन्न झाली. 

राज्यातील महत्त्वाकांक्षी वैनगंगा–नळगंगा नदीजोड प्रकल्पाद्वारे विदर्भ आणि मराठवाडा विभागातील पाणीटंचाई दूर करण्यासोबतच शेतीला कायमस्वरूपी पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) दिनांक 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत शासनाकडे सादर करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच आर्थिक नियोजनासाठी केंद्र सरकारकडे निधी मागणीसंदर्भात पत्र पाठवून पाठपुरावा करण्यात येणार असून राज्य सरकारकडून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

प्रकल्पाची तपासणी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीमार्फत करून सविस्तर प्रकल्प अहवाल शासनाकडे सादर करावा. तसेच या प्रकल्पाला कालबद्ध नियोजन करून गती द्यावी. प्रकल्पाच्या किमान 25 टक्के निधी केंद्र सरकारकडून मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून पाठपुरावा केला जाणार आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील गोसीखुर्द ते निम्न वर्धा सर्वेक्षणाचे काम वेळेत पूर्ण झाले आहे. पुढील कामकाजासाठी पर्यावरण मान्यता प्राप्त करून प्रकल्पाचा पहिला टप्पा तात्काळ सुरू करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

यावेळी मंत्री गिरीष महाजन व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
 

संबंधित बातम्या