आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत ताण (Stress) हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग झाला आहे. थोडा ताण हा नैसर्गिक असून कधी कधी प्रेरणादायी ठरतो. मात्र, सततचा व दीर्घकाळ टिकणारा ताण (Chronic Stress) हा हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो.
झोपेचा अभाव : झोप कमी झाल्यास शरीरात सूज येते व धमनींमध्ये प्लाक तयार होतो, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो.
वजनवाढ : ताणामुळे तयार होणारे हार्मोन्स (अॅड्रेनालिन, कॉर्टिसॉल) भूक वाढवतात व मेटाबॉलिझम मंदावतात.
वाईट सवयींची वाढ : धूम्रपान, मद्यपान किंवा अंमली पदार्थांचा वापर ताणामुळे वाढतो, ज्याचा हृदयावर थेट परिणाम होतो.
सूज (Inflammation) वाढते
रोगप्रतिकारक शक्ती कमी होते
हृदयाचे ठोके जलद होतात
रक्तदाब, साखर व कोलेस्टेरॉल वाढते
धमनींमध्ये प्लाक साठतो (Atherosclerosis)
छातीत दुखणे (Angina), हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक होऊ शकतो
सतत धडधड जाणवणे (Palpitations)
श्वास घेण्यात त्रास
अनियमित किंवा वेगवान ठोके
छातीत दडपण किंवा वेदना
(ही सर्व लक्षणे एकत्र आढळल्यास तात्काळ आपत्कालीन सेवा घ्यावी.)
ध्यान, प्राणायाम व श्वसन तंत्रांचा सराव करा
पुरेशी झोप घ्या
संतुलित आहार व नियमित व्यायाम करा
सामाजिक व कौटुंबिक नातेसंबंध जपा
गरज असल्यास समुपदेशक (Therapist) किंवा सपोर्ट ग्रुपचा आधार घ्या
वरील माहिती ही केवळ जनजागृतीसाठी दिलेली आहे. ताणामुळे उद्भवणाऱ्या लक्षणांचा त्रास होत असल्यास किंवा हृदयविकाराचा संशय असल्यास तात्काळ तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.