मविप्रच्या समाजकार्य महाविद्यालयात राष्ट्रीय समाजकार्य पंधरवडा नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे साजरा
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाजाच्या समाजकार्य महाविद्यालयात राष्ट्रीय समाजकार्य पंधरवडा 2025 नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. दि. 8 ते 23 ऑगस्ट दरम्यान राष्ट्रीय समाजकार्य पंधरवडा 2025 सहकार्य, समानता व शांततेच्या या बोधानुसार जगाकडे जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध अंगी मूल्यांचा प्रचार व प्रसार नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे केला गेला. या दरम्यान महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. ज्यामध्ये आदिवासी दिनाच्या पूर्वसंध्येला आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच समाजकार्य पंधरवड्याचे उद्घाटन झाले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी समाजातील कार्यकर्ते देवचंद महाले उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आजच्या आदिवासी समुदायापुढील समस्यांचा उहापोह केला, तसेच आदिवासी समुदायाची निसर्गाप्रती असलेली जबाबदारी व प्रामाणिकपणा याबाबत कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय डॉ. घनशाम जगताप व आदिवासी विकास विभागातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी केले. क्रांती दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयात वादविवाद स्पर्धेचे आयोजन केले गेले त्याबाबत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय प्रा. चंद्रप्रभा निकम यांनी केले. समाजकार्य पंधरवड्याचा निमित्ताने महाविद्यालयातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्षेत्रकार्य भेटीच्या दरम्यान विविध गावांमध्ये व समुदायांमध्ये जाऊन नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले तसेच सद्भावना दिनानिमित्त सद्भावना शपथ देऊन लोकशाही मूल्यांची जनजागृती केली.
19 ऑगस्ट मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत समाज दिन म्हणून साजरा केला जातो, त्या अनुषंगाने मराठा विद्या प्रसारक समाज संचालित समाजकार्य महाविद्यालय, नाशिक व लोकनेते मालोजीराव मोगल व्यवस्थापन, संशोधन व तंत्रज्ञान महाविद्यालय (आय एमआरटी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समाजकार्य पंधरवाडा व समाजदिन प्रसंगी आयोजित कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी डॉ नारायण पाटील यांनी “बहुजन हिताय बहुजन सुखाय” या विषयावर मार्गदर्शन केले .यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ सभासद उद्योजक जोतिराव वाघ होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून नाशिकच्या उपजिल्हाधिकारी आणि म वि प्र च्या माजी विद्यार्थीनी सीमा आहिरे उपस्थित होत्या.म वि प्र शिक्षणाधिकारी तथा समाजकार्य महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ विलास देशमुख, आय एम आर टी चे संचालक डॉ प्रशांत सूर्यवंशी, अंधश्रद्धा मासिकाचे संपादक प्रल्हाद मिश्री, कचरू जाधव, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बाळकृष्ण काळे या प्रसंगी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय डॉ. सुनिता जगताप यांनी केले. 21 ऑगस्ट 2025 रोजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी भीतीचित्र स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा आणि निबंध स्पर्धेचे आयोजन केले गेले. भीतीचित्र व घोषवाक्य यांचे प्रदर्शन भरून सर्व विद्यार्थ्यांनी त्याला भेट दिली या निमित्ताने विद्यार्थ्यांमधील विविध कौशल्यांची ओळख झाली. भित्तीचित्र स्पर्धेचे नियोजन व समन्वय डॉ. प्रतिमा पवार यांनी केले. घोषवाक्य स्पर्धेचे नियोजन व समन्वय डॉ. सोनल बैरागी यांनी, तर निबंध स्पर्धेचे नियोजन व समन्वय डॉ. प्रतिभा पगार यांनी केले.समाजकार्य पंधरवडा २०२५ साठीचे नियोजन समन्वयक डॉ. मनीषा शुक्ल यांनी केले.यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देशमुख यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांना मोलाचे सहकार्य केले.