रचनाकार दशरथ दादा ससाणे उपाख्य दादा महाराज रचित आधुनिक युगातील 'अग्निज्योत पुराण' प्रकाशित

रचनाकार दशरथ दादा ससाणे उपाख्य दादा महाराज रचित आधुनिक युगातील 'अग्निज्योत पुराण' प्रकाशित
  • Positive News
  • ऑक्टोबर 23 2026

Share on  

रचनाकार दशरथ दादा ससाणे उपाख्य दादा महाराज रचित आधुनिक युगातील 'अग्निज्योत पुराण' प्रकाशित

आधुनिक युगातील अग्निज्योत पुराण दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर प्रकाशित झाले. या पुराणाचे रचनाकार दशरथ दादा ससाणे उपाख्य दादा महाराज हे आहेत. हे पुराण विशेषतः नवीन पिढीला सात्विकतेची दिशा दाखवणारे आहे. नवदाम्पत्यांनी गर्भसंस्कारा पासून बालकांचे पालन पोषण कसे करायचे? जेणेकरून जन्माला येणारे बाळ हे सात्विक मार्गावर चालून समाजाला दिशादर्शक आणि आदर्श ठरेल. अध्यात्माचे नवीन पैलू उजागर करणारे हे पुराण आहे. या पुरणाच्या माध्यमातून आध्यात्मिक उद्बोधनासह सामाजिक प्रबोधनाचे समन्वय साधले आहे.
या ग्रंथाचे संपादन आणि शब्दांकन डॉ. मोनिका ठक्कर यांनी केले असून त्यांनी या पुराणाचे प्रकाशन महाराष्ट्रातील लोकप्रिय कलाप्रकार भारूडाच्या सादरीकरणातून प्रकाशक योगेश्वर लोळगे यांच्या साथीने केले जे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. 
या ग्रंथाचे प्रकाशन लोकायन प्रकाशन संस्था मुंबई यांनी केले. हा सोहळा वज्रेश्वरी येथे हरिओम परिवाराद्वारे आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी दादा महाराजांनी शिवपुराणानंतरचे अत्यंत मौलिक पुराण असल्याचे प्रतिपादन केले.
 

संबंधित बातम्या