पायाभूत सुविधांच्या गतीमान विकासासाठी ‘सुयोग्य नियोजना'चा मंत्र!

पायाभूत सुविधांच्या गतीमान विकासासाठी ‘सुयोग्य नियोजना'चा मंत्र!
  • Positive News
  • ऑगस्ट 9 2025

Share on  

पायाभूत सुविधांच्या गतीमान विकासासाठी ‘सुयोग्य नियोजना'चा मंत्र!

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुणे येथे पायाभूत सुविधा विकास प्रकल्प - प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन संपन्न झाले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की रस्ते, रेल्वे, पूल, टनेलसह विविध अभियांत्रिकी प्रकल्पांच्या यशस्वी पूर्णतेचा समृद्ध अनुभव राज्याला आहे; मात्र प्रकल्प वेळेत व दर्जेदार पूर्ण करण्यासाठी उत्तरदायित्व आणि पूर्वनियोजन अत्यावश्यक आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रकल्प आराखडा तयार करताना 'गतिशक्ती', 'जिओ-स्पेशियल (geospatial) डेटा' यांसारख्या व्यासपीठांचा योग्य वापर करून, सर्व विभागांचा समन्वय साधून आणि क्षेत्रीय पाहणी करून सर्वांगीण विचार केला पाहिजे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी वेळेत पूर्ण झालेल्या प्रकल्पांचा अनुभव उदाहरणादाखल देत, प्रकल्पासाठी विकासक निवडताना त्यांच्या क्षमतेचा विचार करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. प्रकल्पांच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी काम सुरू असतानाच काटेकोर पर्यवेक्षण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

भूसंपदनाअभावी प्रकल्पाची किंमत वाढू नये यासाठी भूसंपादन वेळेत पूर्ण होईल आणि त्याचा मोबदला वेळेवर अदा होईल याची दक्षता घ्यावी. भूसंपादन पूर्ण झाल्यावर प्रकल्पाची सुरूवात करावी, असे मुख्यमंत्री म्हणाले.

वित्तपुरवठ्यासाठी विविध पर्याय उपलब्ध असून, त्यांचा विचार करून अधिकाधिक पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात येतील. राज्याची ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल सुरू असल्यामुळे विकास प्रकल्पांना गती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
 

संबंधित बातम्या