मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'धरती आबा लोकसहभाग मोहिमे'चा भव्य शुभारंभ, विविध विकास कामांचे लोकार्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'धरती आबा लोकसहभाग मोहिमे'चा भव्य शुभारंभ, विविध विकास कामांचे लोकार्पण
  • Positive News
  • जून 17 2025

Share on  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'धरती आबा लोकसहभाग मोहिमे'चा भव्य शुभारंभ, विविध विकास कामांचे लोकार्पण

पालघर | मनोर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पालघर जिल्ह्यातील मनोर येथे 'प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत' सुरू करण्यात आलेल्या 'धरती आबा लोकसहभाग मोहिमे'चा भव्य शुभारंभ केला. या उपक्रमाचा उद्देश आदिवासी भागातील समावेशक विकास घडवणे आणि जनतेच्या सहभागातून गावांच्या समृद्धीकडे वाटचाल करणे हा आहे.

कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि उद्घाटन केले. हे लोकार्पण प्रत्यक्ष आणि ऑनलाईन पद्धतीने पार पडले.

 वसई-विरार शहर महानगरपालिका अंतर्गत

सर डी. एम. पेटीट रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतीचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले, ज्यामुळे आरोग्यसेवा अधिक सक्षम होणार आहे.

 मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत नवे विभागीय कार्यालयांचे उद्घाटन:

  • पोलीस उप आयुक्त परिमंडळ-3, विरार कार्यालय

  • सहायक पोलीस आयुक्त, विरार विभाग कार्यालय

  • वाहतूक शाखा, विरार विभाग कार्यालय

  • भरोसा सेल, वसई-विरार कार्यालय

  • विशेष शाखा, वसई-विरार कार्यालय

  • दळणवळण व तंत्रज्ञान विभाग, वसई-विरार कार्यालय

या नव्या कार्यालयांमुळे पोलिसिंग अधिक प्रभावी होणार असून नागरिकांना जलद आणि पारदर्शक सेवा मिळणार आहे.

 आदिवासी विकास विभाग अंतर्गत आश्रमशाळांचे उद्घाटन:

  • शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, चास (ता. मोखाडा)

  • शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, गुहिर (ता. वाडा)
    या दोन्ही आश्रमशाळांच्या नूतन इमारतींचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.

प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत:

  • बहुउद्देशीय केंद्रांचे उद्घाटन मौजे रायतळे व आपटाळे (ता. जव्हार) येथे करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात आदिवासी भागातील विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, या भागातील नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्यासाठी केंद्र व राज्य सरकार संयुक्तपणे प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

 या उपक्रमांमुळे पालघर जिल्ह्याच्या सामाजिक व प्रशासनिक विकासाला मोठी गती मिळणार असून, आदिवासी भागाचा सर्वांगीण विकास हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे.

 

 

 

संबंधित बातम्या