नाशिक : डॉ संदीप भानोसे यांचे कार्य गडकोट संवर्धन तसेच पर्यावरण व वाहतूक सुरक्षा जागृती चे मी अनेक वर्षांपासून पाहत आहे. त्यांच्या नावावर 22 जागतिक विक्रम प्रस्थापित झालेले आहेत. समर्थांची कृपा असल्याशिवाय असे सातत्य होणे नाही. त्यांनी पुढे देखील त्यांचे हे सातत्यपूर्ण कार्य असेच चालू ठेवावे व अनेकांना यातून प्रेरणा लाभावी असे प्रतिपादन आबासाहेब मोरे यांनी केले.
*27 जानेवारी रोजी जागतिक कृषी महोत्सवात* पर्यावरण सत्रामध्ये आबासाहेब मोरे यांच्या हस्ते जागतिक विक्रमवीर डॉ संदीप भानोसे यांचा सत्कार संपन्न झाला.