फॅमिली फिजिशियन्स असोसिएशन नाशिकचा वार्षिक उजळणी वर्ग उत्साहात

फॅमिली फिजिशियन्स असोसिएशन नाशिकचा वार्षिक उजळणी वर्ग उत्साहात
  • Positive News
  • नोव्हेंबर 21 2025

Share on  

फॅमिली फिजिशियन्स असोसिएशन नाशिकचा वार्षिक उजळणी वर्ग उत्साहात

नाशिक : फॅमिली फिजीशियन्स असोसिएशन चा ३९ वा वार्षिक उजळणी वर्ग (ANNUAL REFRESHER COURSE) FPA-MEDICON 2024, रविवार, दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी हाॅटेल बी.एल.व्ही.डी., नाशिक येथे थाटात पार पडला.
         या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माजी पोलीस अधीक्षक डॉ. संजय अपरांती उपस्थित होते. नाशिक मधील ९ विविध विषयांचे नामांकित तज्ञ डॉक्टरांनी उपस्थितांना  मार्गदर्शन केले. ११० वैद्यकिय बंधू भगिनींनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. 
डॉ. शीतल सुरजुसे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. डॉ. सुनंदा मुंदडा व डॉ. राहुल पलोड यांनी बहारदार सुत्रसंचालन करत कार्यक्रमात रंगत आणली. डॉ. मनिष पवार यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करुन दिला. तर सचिव डॉ. विजय मुंदडा व खजिनदार डॉ. अविनाश पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. 
प्रमुख अतिथी  डॉ. संजय अपरांती यांनी उपस्थितांना फॅमिली फिजिशियन्सचे समाजातील महत्त्व अधोरेखित करून फॅमिली डॉक्टर हे आरोग्यसेवेचा कणा आहेत हे नमूद केले. डॉक्टर हे केवळ सर्जन नाही तर सृजनशील असतात असेही ते म्हणाले
एफ.पी.ए. तर्फे दिला जाणारा २०२५ सालचा "जीवनगौरव" पुरस्कार एफ.पी.ए.चे ज्येष्ठ सदस्य डॉ. संजय कोठावदे व डॉ. सुजाता धारणकर यांना तर "कृतज्ञता" पुरस्कार डॉ. अनय थिगळे यांना प्रदान करण्यात आला.
       जीवनगौरव पुरस्काराची घोषणा डॉ. मुक्तेश्वर जाधव व डॉ. मनिषा मर्दा यांनी केली तर कृतज्ञता पुरस्काराची घोषणा उत्पल राणे यांनी केली.
तसेच वर्षभरातील कार्याचा आढावा घेणाऱ्या एफ.पी.ए.च्या सुसंवाद मासिकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. ज्योती पाटील यांनी स्मरणिकेचे प्रास्ताविक केले. 
संस्थेच्या माजी अध्यक्षांनी सेशन इंचार्ज व चेअरमन पदाची सुत्रे सांभाळली तर एफ.पी.ए. कार्यकारिणी सदस्यांनी को-चेअरमनपदाची सुत्रे सांभाळली. 
डॉ. राकेश शर्मा, डॉ. राखी मुथा, डॉ. मंजुषा व्यवहारे, डॉ. सागर घरटे, डॉ.तेजू सोलोमन, डॉ. अजय पाटील, डॉ. रूपेश मर्दा, डॉ. भागवत सहाणे व डॉ. मुक्तेश्वर जाधव यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

संबंधित बातम्या