नाशिकच्या सुमेध जाधवची राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक कामगिरी 

नाशिकच्या सुमेध जाधवची राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक कामगिरी 
  • Positive News
  • नोव्हेंबर 24 2025

Share on  

नाशिकच्या सुमेध जाधवची राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक कामगिरी 

मविप्रच्या वावरे महाविद्यालयाचा विद्यार्थी : तायक्वांदो स्पर्धेमध्ये कांस्यपदक

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सिडको कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे महाविद्यालयातील विद्यार्थी कुमार सुमेध मुकेश जाधव याने ६९ व्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो क्रीडा प्रकारात ऐतिहासिक कामगिरी करत कांस्यपदक पटकावले आहे. नाशिकच्या क्रीडा क्षेत्रासह मविप्रसाठी ही आनंदाची आणि अभिमानास्पद कामगिरी आहे.
जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात ९ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ही प्रतिष्ठेची राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. देशभरातील सर्वोत्कृष्ट शालेय आणि महाविद्यालयीन खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत, सुमेध जाधवने आपल्या उत्कृष्ट खेळाचे आणि कसलेल्या कौशल्याचे दर्शन घडवत, महाराष्ट्राचे आणि नाशिकचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले. सुमेधच्या या यशाने मराठा विद्या प्रसारक समाज आणि कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे महाविद्यालयाची मान अभिमानाने उंचावली आहे. सुमेध जाधवला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा. हेमंत काळे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. 
सुमेधच्या या लक्षणीय कामगिरीबद्दल मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड, डॉ. प्रसाद सोनवणे, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपान कुशारे आणि शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा. हेमंत काळे, सर्व पदाधिकारी यांनी सुमेध जाधवचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
कोट
सुमेधच्या या राष्ट्रीय पदकामुळे नाशिक जिल्ह्यातील व मविप्रच्या तरुण खेळाडूंना प्रेरणा मिळाली आहे, हे यश केवळ सुमेधचे नसून, नाशिकच्या क्रीडा संस्कृतीचे आणि त्याला आधार देणाऱ्या शिक्षण संस्थेचे आहे. या कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
-    ॲड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र समाज, नाशिक.
--------
फोटो ओळी 
नाशिक : ऐतिहासिक कामगिरीबद्दल सुमेध मुकेश जाधवचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना मविप्र समाजाचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड, डॉ. प्रसाद सोनवणे, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव, प्राचार्य डॉ. सोपान कुशारे, क्रीडा संचालक प्रा. हेमंत काळे आदी मान्यवर.

संबंधित बातम्या