शोनेस्ट टॉवरमध्ये आज दि. ०९ ऑगस्ट २०२६, रविवार रोजी आयोजित नेत्र तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले . हे आयोजन यशस्वी करण्यासाठी सोसायटीचे अध्यक्ष श्री. नीलेश खोब्रागडे, सचिव श्री. योगेश कारंजे खजिनदार श्री. जगदीश जगताप तसेच सर्व माननीय समिती सदस्यांचे, आणि सोसायटी मॅनेजर चे यांनी प्रयत्न केले होते.
या उपयुक्त आणि सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल श्री. योगेश कारंजे यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.
श्री कारंजे यांच्या पुढाकारामुळे सोसायटीतील रहिवाशांना त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण अशा नेत्र तपासणीची सुविधा आपल्या परिसरातच उपलब्ध झाली.
संपूर्ण शिबिरा दरम्यान अत्यंत उत्तम सेवा, सहकार्य आणि मार्गदर्शन दिल्याबद्दल Vision Express Global Eyewear Express यांचेही आभार मानले जात आहेत.
या नेत्र तपासणी शिबिरात सोसायटीतील १०० हून अधिक सदस्यांनी या नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला.आरोग्यविषयक अशा उपयुक्त उपक्रमांमधून आपल्या सोसायटीमध्ये आरोग्यजागरूकता, सामाजिक बांधिलकी आणि परस्पर सहकार्याची भावना अधिक दृढ होते असे प्रतिपादन जवाहर व्यास यांनी केले आहे.